संसदेत लवकरच वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार असून उबाठा गट याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतू, त्याआधीच संजय राऊतांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून अजब दावा केला आहे. वक्फचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Read More
अतुल सावे म्हणजे मराठवाड्यातील भाजपचा आश्वासक आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्व दिसून येते. यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य अखंड-अविरत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आज दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने
ज्यांचे हात निरनिराळ्या हत्यांच्या रक्तांनी माखलेले आहेत, त्यांनी महाकुभांतील मृत्यूंवर बोलणे हा राजकीय व्यभिचार आहे. ही असली माणसे मृत्यूचे निमित्त बाळगून महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करतात, तेव्हा मस्तकात चीड उठल्याशिवाय राहात नाही. ‘धर्मांध मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान’ नावाच्या पोपटातच या असुरांचा जीव दडलेला आहे.
डॉ. शुभदा जोशी हे एक ज्ञानमार्गी व्यक्तिमत्त्व. विद्यार्थी असताना, अध्ययन-अध्यापन करताना ज्ञानमार्गी असणे, ही स्वाभाविक बाब समजली पाहिजे. पण, त्या सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानसाधनेत मग्न असतात, हे त्यांचे वेगळेपण. ‘नागरी अभिवादन न्यास’ या ४७ स्वयंसेवी संस्थांच्यावतीने, नुकताच त्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
हिंदू म्हणून एकवटायला हवे आयुष्यभर संदेश देणाऱ्या ह.भ.प.श्री शिरीष महाराज मोरेंची #MahaMTB वरील अखेरची मुलाखत
‘सूड सूड’ म्हणालात की, सोड सोड म्हणालात साहेब? आम्हांला वाटले, तुम्ही ‘सूड... सूड... सूड’च म्हणालात. आपल्या पदाधिकार्यांना वाटले की, तुम्ही ‘सोड सोड’ म्हणालात. त्यामुळे पुण्याच्या पदाधिकार्यांनी, मोठ्या संख्येने आपला उबाठा गट सोडला साहेब. साहेब आपले ते पुण्याचे लोक, सूड घेण्यासाठी शिंदेगटात जात आहेत का? ते कोणाचा सूड घ्यायला तिकडे गेले साहेब? हो आपले विश्व प्रवक्ते दूरदृष्टीचे संजय दोनवेळा पुण्यात गेले होते. त्याचा परिणाम हा असा झाला की, आपले लोक शिंदेगटात हौसेने गेली.
‘अखंड भारत व्यासपीठ’ हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे या वर्षभरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या व्यासपीठाचा अध्यक्ष म्हणून येणार्या कालावधीमध्ये आयोजित उपक्रमांचा मागोवा घेणारा हा लेख...
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची ( Prayagraj kumbha Mela ) तयारी सुरू आहे. दरम्यान, खलिस्तानी संघटना ’शीख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा चिथावणीखोर विधान केले आहे. त्यामधून त्याने हिंदुत्ववादी विचारसरणी संपवण्याचे आवाहन केले आहे. “महाकुंभमेळ्यात अडथळा आणण्यासाठी प्रयागराज चलो,” असे त्याने म्हटले आहे. त्याबरोबरच पन्नू याने या व्हिडिओमधून विमानतळांवर समर्थकांना खलिस्तान आणि काश्मीरचे झेंडे फडणवण्यास आवाहन केले आहे. मात्र, बहुतांश लोक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याकडून दिल्या जाणा
नागपूर : मी अजिबात नाराज नसून आधीपेक्षा जास्त जोमाने भारतीय जनता पक्षासाठी काम करणार आहे, अशी भावना आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी व्यक्त केली. मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, आता गोपीचंद पडळकर यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिले आहे. बुधवार, १८ डिसेंबर रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : उद्धव ठाकरे यांचे हिंदूंच्या, हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काय भुमिका निभावली ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेय, अशा परखड शब्दांत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीआधी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे यथोचित प्रयत्न करून झाल्यानंतर, हिंदू विरोधातल्या मुस्लीम मौलवींच्या मागण्या मान्य करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली. त्यामुळे देव, देश आणि धर्म यावरील धोक्याची चाहूल ओळखलेल्या सज्जनशक्तीने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा जागर केला आणि त्याचे फलित म्हणजेच हा निकाल होय.
राष्ट्ररक्षणार्थ आणि हिंदुत्व समोर ठेवून प्रत्येकाने मतदानासाठी मैदानात उतरा : अग्रवाल कुटुंब (Malad East )
लोकसभा निवडणुकीत पृष्ठभागाखाली असलेला धार्मिक मतदानाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आता उघडपणे समोर आला आहे. काही मुस्लीम संघटनांची मजल मतांच्या बदल्यात बेकायदा आणि अवाजवी मागण्या करण्यापर्यंतही गेली. एकप्रकारे राज्यातील हिंदू मतदारांना हे आव्हान दिले गेले. गंमत म्हणजे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणार्या पक्षांनीच या उघड जातीयवादी व घटनाविरोधी आवाहनाला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाला वाचविण्यासाठी हिंदू मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची गरज आहे. मतदान करणे हे क
"लव्ह जिहाद"ची एक लाख प्रकरणे समोर आली आहेत.
प्रविण तरडे दिग्दर्शित-लिखित, मंगेश देसाई निर्मित आणि प्रसाद ओक अभिनित धर्मवीर २ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी देशभरात मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्
नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमणे वाढली आहेत. सदर बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. 14 जुलै रोजीची मुदत दिली होती. मात्र, कारवाई न झाल्याने रविवार, दि. 14 जुलै रोजी विशाळगडाकडे कूच केली होती. दरम्यान, गडावर अज्ञातांनी दगडफेक केली, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (२८ मे) १४१ वी जयंती. आणि याच निमित्ताने अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने सेल्युलर जेलला भेट दिऊन सावरकरांना वंदन केले. सध्या रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांनीही त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच पण आजवर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनकाळ जो कुणीही मोठ्या पडद्यावर मांडला नव्हता तो मांडण्याचे धाडस अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त नुकताच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीपने हा पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना एका रागाच्या भावनेत हा चित्रपट साकारल्याचे म्हटले. नेमकं तो काय म्हणाला
केवळ एक तासाच्या ‘मृत्युंजय सावरकर’ या नाटकात सावरकरांच्या जीवनातील सारे महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे मनोहारी दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच, त्यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान, त्यांची विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी भूमिका, सुभाषचंद्र बोसांना त्यांनी केलेले मार्गदर्शन आदी गोष्टींचाही प्रभावीपणे वेध घेण्याचा प्रयास केलेला आहे. संपूर्ण नाटकभर प्रेक्षक ज्या तन्मयतेने हे नाटक बघतात, ते पाहून खरोखरेच जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
तात्यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा घेतलेला वसा टाकायचा नव्हता. मग मी एक तोडगा काढला. त्यांच्या अर्थपूर्ण गीतांचे व्हिडिओ बनविले, नाट्यप्रसंग चित्रित केले. आर्थिक वाटा मी पूर्णपणे उचलला. नव्या तंत्रज्ञानामुळे हा संच अगदी दोनावर आला. निवेदिका मी आणि तांत्रिक बाजू मजबूतपणे माझे पती डॉ. सतीश यांनी सांभाळायचे ठरले आणि प्रयोग करणे सोपे झाले.
असे म्हणतात की, ‘जे काम हजार व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’ तेव्हा मनाने निश्चय केला की, सावरकरांचे कार्य, प्रखर राष्ट्रवाद, भाषा प्रभुत्व, त्यांनी भोगलेले कष्ट, कारावास यातील जे जमेल ते तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. आपल्या हातात हक्काचे माध्यम आहे रंगमंच! ‘संगीत उत्तरक्रिया’, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’, ‘सहा सोनेरी पाने’ ही पुस्तके पुन्हा एकदा सादरीकरणाच्या दृष्टीने वाचू लागलो.
बाटगा अधिक कडवा असतो, या वचनाचे प्रत्यंतर सध्या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे येत आहे. “गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्यासाठी मते मागितली, ही माझी चूक झाली आणि त्यासाठी मी जनतेची माफी मागतो,” असे वक्तव्य नाशिकमधील सभेत करून उद्धव ठाकरेंनी अव्वल दर्जाचा कृतघ्नपणा काय असतो, त्याचा नमुना दाखविला आहे. पण, माफीच मागायची, तर आणखीही बर्याच गोष्टींसाठी त्यांना माफी मागावी लागेल. आपल्या वडिलांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का?
छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाचे कुलगुरु आणि भारतीय विश्वविद्यालय संघाचे उपाध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या २०० कुलगुरुंनी राहुल गांधी यांना निषेधाचे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ”कुलगुरुंची नियुक्ती गुणवत्तेनुसार नाही, तर एका विशिष्ट संघटनेच्या इशार्यावर केली जाते असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांनी देशभरातील विद्यापीठांची बदनामी केली आहे.” यावर वाटते की, राहुल गांधी कुलगुरुंची, देशातल्या विद्यापीठांची अशी बदनामी का करत आहेत?
कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त यंदा 'न भूतो' अशी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा निघालेली पाहायला मिळाली. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन कडे यंदाच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेचे यजमानपद आले होते. त्यांनी कल्याणातील मराठी बांधवांसह गुजराथी, जैन, पंजाबी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय समाजालाही या स्वागतयात्रेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्याला सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाले होते. तर यावेळी मुख्य स्वागतयात्रेसोबत आणखी दोन भव्य शोभायात्राही कल्याण पश्चिमेत निघाल्याने कल्याणच्या काना कोपऱ्यात हिंदुत्वाचा जयघोष
Ram Temple Ayodhya | कारसेवक कोण होते? | कम्युनिस्ट, काँग्रेस आणि कोळीवाडा | श्रीराम जन्मभूमी मुक्ती गाथा| MahaMTB Gappa Ep 9 | राम मंदिर | Truth of Karsevaks | Marathi Podcast
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित
राहूल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला उद्धव ठाकरेंना 'हिंदू' शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली होती का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. रविवारी झालेल्या राहूल गांधींच्या सभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून शेलारांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
“आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चि
चरित्रपट म्हणजे त्या महान व्यक्तिचे विविध पैलु प्रेक्षकांसमोर मांडणे आणि आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा याने जाणीवपुर्वक ती जबाबदारी निभावलेली दिसून येते. आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटाच्या निमित्ताने रणदीप केवल अभिनेता म्हणून नाही तर पहिल्यांदाच दिग्दर्शक आणि लेखकाच्या भूमिकेतचही दिसून येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातील "हिंद से प्यार करनेवाले हम सब हिंदू है!", हे वाक्य वीर सारवरकरांच्या (Swatantryaveer Savarkar)
मागे नाही का, जड मनाने मुख्यमंत्रिपद सोडल्यावर, मी बंगल्यातून मोठी काळी पेटी बाहेर काढली होती. त्या काळ्या पेटीत काय असेल, असे अनेकांना वाटले होते. काय म्हणता, माझ्या लाल रंगाच्या त्या पर्सबाबत लोकांना उत्सुकता आहे? त्यात काय असेल, असा सगळ्यांना प्रश्न पडलाय? जाऊ दे, मी काय म्हणतोय?
आदर्श हिंदू व्यक्ती कोणत्या गुणांनी युक्त असावयास हवी, याचे ‘ज्ञान’ ज्यांच्या चरित्रातून होते व तसे स्वतःस घडविण्यासाठी जीवनभर पुरेल, अशी ‘प्रेरणा’ ज्यांच्या जीवनचरित्रातून प्राप्त होते, असे श्रीगुरुजींचे चरित्र. आज विजया एकादशी, तिथीनुसार श्रीगुरुजींची जयंती. त्यानिमित्ताने श्रीगुरुजींच्या हिंदुत्वाच्या परिपूर्ण गुणांचे हे विचारपाथेय...
हिंदी चित्रपटसृष्टीत गेले काही काळ चरित्रपट एकामागून एक येताना दिसत आहेत. पण कुणीच अखंड भारताचे स्वप्न पाहत हिंदुना संघटित करणाऱ्या वीर सावरकरांच्या जीवनावर चरित्रपट करण्याचा विडा उचलला नव्हता. परंतु, अभिनेता रणदीप हुड्डा याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून दिग्दर्शन आणि अभिनयाची जोड देखील त्याचे या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveersavarkar) या चरित्रपटाला दिली आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत मोठ्या पडद्यावर येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘मुंबई तर
'अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारल्यामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व आनंदाचे वातावरण आहे. मंदिराच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणून हिंदू समाज नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करेल.', असे म्हणत देशभरातून आलेल्या संतांनी 'राम मन्दिर का उपहार, फिर एक बार मोदी सरकार'चा जयजयकार करत पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनाच विराजमान करण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे. (Phir Ek Baar Modi Sarkar)
नाशिकच्या चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर मजार बांधली जात असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच ही मजार काढून टाका अन्यथा त्याच्या बाजूला बजरंगबलीचे मंदिर उभे करु असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
तेलंगणा भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते टायगर राजा सिंह महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी बुधवारी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. येत्या २५ फेब्रुवारी रोजी मीरा-भाईंदर परिसरात होणाऱ्या त्यांच्या जाहीर सभेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे. (Tiger Raja Singh Mira Bharandar)
उध्दव ठाकरेंच्या ओठावर छत्रपती तर पोटात औरंगजेब आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यासोबत सत्ता स्थापन करणाऱ्यांना शिवराय काय कळणार? असा सवाल भाजप नेते डॉ. संजय पांडे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
"मुंबई कोणाच्या बापाची नाही. आज झालेल्या महाआरतीतून मुंबई ही हिंदूंची आहे हे दिसून आले. मुंबईचा डीएनए फक्त हिंदू!", अशा कडक शब्दांत हिंदुत्ववादी नेते आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मांधांना थेट इशारा दिला. रविवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी भुलेश्वर परिसरातील गोलदेऊळ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती आयोजित करण्यात आली होती. अवैध गतिविधींच्या उद्रेकाच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव या आरतीला उपस्थित होते. (Mumbai's 'DNA' is only Hindu!)
गा कोणता राम खरा आणि वाल्मिकी रामायणच का खरे? मी विचारतोय मी. चालू गेमाडे! काय म्हणता, मी कोण? माझ्या बोलण्याला कुत्राही भीक घालणार नाही? हे बघा असं करू नका, माझ्या मिशांकडे तरी बघा. चारचौघात उठून दिसाव्यात, म्हणून त्या मी ठेवल्यात. त्याचा तरी मान राखा. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून बरोबर मी जातीयतेच्या कळपात शिरतो. जाणता राजा, साहेब साहेब म्हणत त्यांची हांजी हांजी करत हजेरी लावतो.
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असा टोला आता महाराष्ट्र भाजपाने एक्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर लगावला आहे.
आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. हीच जबबादारी अभिनेता प्रसाद ओक याने लिलया सांभाळली आहे.
“हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
भारतीय वंशाच्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने अमेरिकेत हिंदू धर्माच्या प्रचारासाठी ४ दशलक्ष डॉलर्स (३३ कोटींहून अधिक) देणगी देण्याचे वचन दिले आहे. मिहीर मेघानी असे या डॉक्टरचे नाव आहे. दोन दशकांपूर्वी डॉ.मेघानी यांनी हिंदू अमेरिका फाउंडेशनची स्थापना केली होती. ते म्हणतात की, हिंदू हा केवळ धर्म नसून जीवनपद्धती आहे.
गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथील ब्रिगेड ग्राऊंडवर गीता पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ डिसेंबर रोजी होणार्या या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा देण्यात आले असून, यावेळी एका लाखांहून अधिक लोक सामूहिक गीतापठण करतील. परंतु, आता कोलकाता पोलीस आणि प्रशासनाने कार्यक्रम आयोजित करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. विविध मठ, मंदिरे आणि हिंदू संघटनांनी ’गीता पाठ समिती’ स्थापन करून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सामूहिक गीता पठणासाठी आतापर्यंत १ लाख, २० हजार लोकांनी नोंदणीही केल्याची माहित
निवडणुकीत हिंदूत्त्वाचा प्रचार केला म्हणून उबाठा गटप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला तसा मोदी-शाहांचा अधिकार काढून घ्या. मात्र त्यांना ह्याची आठवण नव्हती की, त्यावेळी काँग्रेस सरकारच्या काळात बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार राष्ट्रपतींच्या सल्ल्याने निवडणुक आयोगाने काढला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा मुद्दा नक्कीच केंद्रस्थानी असणार आहे. मात्र, त्यासोबतच आर्थिक न्याय हा नवा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी राजकीय अवकाशामध्ये आणला आहे. आर्थिक न्यायाद्वारेच सामाजिक न्याय साध्य होऊ शकतो, अशी त्यांची मांडणी.
सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीस वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ‘भारतीय विचार साधना’ प्रकाशनाच्यावतीने १०४ पानांचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती लेखक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी दिली आहे. ज्या वाचकांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास त्यांनी आजच नोंदणी करून प्रकाशनपूर्व ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योगी सरकार मदरसा शिक्षणाच्या मुद्द्यावर करत असलेल्या कामांबाबत अनेक संघटनांकडून सकारात्मक वक्तव्ये येऊ लागली आहेत. प्रत्यक्षात मदरशांमध्ये पैसा कुठून येतो आणि कोणत्या कामासाठी पैसा पाठवला जात आहे, याची कोणतीही माहिती सरकारला मिळू शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करण्यात येत आहे.
गरब्याच्या कार्यक्रमात केवळ हिंदूंना प्रवेश द्यावा, या मागणीचा संबंध थेट भाजप, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लीमविरोधी कसे आहेत, याच्याशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करून दै. ‘सामना’च्या संपादकांनी त्यांच्या कालच्या अग्रलेखातून बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शनच घडविले. उलट मोदी यांनी मुस्लीम भगिनींना सन्मानाने जगता यावे, यासाठीच तिहेरी तलाकविरोधी कायदा केला. पण, वैचारिक गोंधळ झाला की, आपल्याच वक्तव्यांतील विरोधाभास आणि भोंगळपणा कसा उघड होतो, त्याचे ‘सामना’चा अग्रलेख हे उत्तम उदाहरण!