नवी दिल्ली: ( Bhushan Gavai 52nd Chief Justice of India ) भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी औपचारिक नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून अधिकृतपणे शिफारस केली आहे आणि हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे पाठवला आहे. सध्या, न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
Read More
Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. य
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की " हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
चीन सोबत असलेले भारताचे सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी चीनमध्ये अनेक ठिकाणी योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. शांघई सारख्या शहरात १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. परंतु भारताचा हा समृद्ध वारसा जतन करण्यात महत्वाचा हातभार लावला आहे झेजियांग विद्यापीठाचे प्राध्यापक वांग झिचेंग यांनी. नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्र लिहून त्यांच्या याच कार्याचे कौतुक केले.
Dr. Babasaheb Ambedkar यांचे कार्य व्यापक असेच आहे. विविध क्षेत्रातील धोरणनिर्मितीमध्ये त्यांचे स्वातंत्र्यपूर्व योगदान अतुलनीय असेच. देशाच्या समोर आलेल्या कोणत्याही समस्येकडे, समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना शोधण्याच्या वृत्ती त्यांच्या ठायी होती. देशासमोरील आव्हानांवर त्यांनी सांगितलेल्या उपायांचा त्यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेला मागोवा...
Money lenders भारतामध्ये सावकारी आणि वेठबिगारी प्रदीर्घकाळ या समाजामध्ये पाय रोवून आहे. वास्तविकत: ती या समाजासमोरची एक समस्याच. यासमस्येमुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते, तसेच त्याची सामाजिक आणि आर्थिक पतही ढासळते. यावरच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र आणि राज्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
तहव्वुर राणा भारतात परत आला! काय असेल पुढची प्रक्रिया? काय आहे राणाचा इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून
देशाची ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून गणल्या गेलेल्या ईशान्य भारताचा बराचसा भाग हा काही दशके अतिशय संवेदनशील होता. तेथील आंदोलनांना शमवण्याचे अनेक प्रयत्न गेल्या सात दशकांत झाले. मात्र, त्यात अनेकदा अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळून आल्या. मात्र, 2014 नंतर मोदी सरकारच्या काळात ही परिस्थिती बदलली. ईशान्य भारतातील या बदललेल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा....
भारताच्या ईशान्य भागाचा विकास हा भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा महत्त्वाचा घटक आणि या प्रक्रियेत जपानने सातत्यपूर्ण व सकारात्मक सहभाग नोंदवला आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे जपानने ईशान्य भारतात आपली उपस्थिती ठळकपणे अधोरेखित केली आहे. त्याचे आकलन...
(Air India Airlines 'Pee-gate' 2.0) एअर इंडिया एअरलाईन्सच्या विमानातील गैरवर्तनाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक विमानामध्ये एका भारतीय नागरिकाने जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात केबिन क्रूने यावर तातडीने कारवाई केली असून भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाला ही बाब कळवल्याचे म्हटले आहे.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशावेळी या प्रकल्पासाठी १० हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लाँच करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन डीएफसीसीआयएल ट्रॅकवर ७० मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लाँच करण्यात आला. मंगळवार, दि.८ एप्रिल २०२५ रोजी हा ‘मेक इन इंडिया स्टील पूल लॉन्च करण्यात आला.
(Tahawwur Rana Extradiction) मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात येत आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतीय पथक त्याला आणण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन जाणारे विशेष विमान दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरले आहे. येथून तहव्वूर थेट एनआयएच्या मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Mahavir Jayanti भगवान महावीर यांची २६२४ वी जयंती राजस्थानात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरी करण्यात आली आहे. जयपूर, अजमेर, सिकर, भिलवाडा, उदयपूर आणि कोटामध्ये राज्यातील अनेक शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. या शोभायात्रांमध्ये भाविकांची अलोट गर्दी लोटल होती. यामुळे एक धार्मिक उत्साह शिकेला गेलेला दिसून आला होता. याचपार्श्वभूमीवर जैन धर्मातील प्रतिष्ठीत आणि प्रचलित असणाऱ्या मुनी भट्टारक प्रमेय सागर यांनी राम महावीर यांचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच जैन आणि सनातन धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आह
New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.
बारताने फ्रान्सकडून २६ Marine Rafale लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीने ९ एप्रिल रोजी संबंधित करारास मंजूरी देत हिरवा कंदील दर्शवला. भारताला ६४ हजार कोटी रुपयांमध्ये २६ सागरी लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे. यानंतर, फ्रान्स भारतीय नौदलाला २२ सिंगल-सीटर आणि ४ ट्विन-सीटर जेट सोपवण्यात आले होते. त्यानंतर महासागरात चीनसोबत युद्ध करण्यासाठी आयएनएस विक्रांतवर तैनात केले जातील.
आजच्या काळात शाश्वत ऊर्जाविकास ही केवळ घोषणा नसून, राष्ट्रांच्या विकासनीतीचा अपरिहार्य घटक आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या मर्यादा, त्यांचे दुष्परिणाम आणि हवामानबदलाचे भयावह संकेत लक्षात घेतले, तर नवकरणीय ऊर्जेचे महत्त्व लक्षात येते. कार्बन उत्सर्जन कमी करतानाच, ऊर्जासुरक्षेचा पाया भक्कम करणे, रोजगार निर्मिती करणे आणि स्वावलंबन घडवून आणणे, शाश्वत ऊर्जाविकासातून शक्य आहे. म्हणूनच, हरितऊर्जेची दिशा ही आज ‘विकास’ आणि ‘जबाबदारी’ यांचा संगम ठरत आहे आणि त्याच वाटेवर भारत आत्मविश्वासाने आगेकूच करताना दिसतो.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम
( Nanasaheb Peshwa II Architect of India First War of Independence of 1857 ) ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ पुणे, ‘वेद वासुदेव फाऊंडेशन’, ‘इतिहासप्रेमी मंडळ’ पुणे, ‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’ पुणे, उत्तर प्रदेशातील अनेक संस्था आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी 1857च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे शिल्पकार नानासाहेब पेशवे द्वितीय यांची 200वी जयंती संयुक्तपणे साजरी केली. हा कार्यक्रम दि. 28 मार्च ते दि. 30 मार्चदरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील बिठूर येथील नानासाहेब पेशवे पार्क येथे पार पडला. संपूर्ण कार
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहेच. मात्र, जागतिक व्यापारात भारतीय व्यापारी नौदलही विक्रमाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. याच व्यापारी नौदलाचा भारतातील इतिहास आणि स्वदेशी नौदलाची प्रवास याचा घेतलेला हा आढावा...
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Poonam Gupta यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्या सध्या आर्थिक धोरण थिंक टँक नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक आहेत. गुप्ता यांची नियुक्ती आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती अंतर्गत आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाज पाहिले. आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाज पाहिले.
यापूर्वीच्या लेखांतून भारतातील खगोलशास्त्र, गणितशास्त्र आणि एकूणच वैज्ञानिक प्रगतीचा आपण आढावा घेतला. पण, परकीय आक्रमणांच्या पलीकडेही भारतीय विज्ञान परंपरा विस्मृतीत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या लेखातून या विज्ञान परंपरेच्या विस्मृतीच्या कारणांचा केलेला हा उहापोह...
म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर
( amit shah on Naxalism in the india ) “भारतातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे. देशातील अतिनक्षलप्रवण जिल्ह्यांची संख्या घटून केवळ सहावर आली आहे,” अशी माहिती केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी द ‘एक्स’वर दिली आहे.
आर्थिक असमानता ही केवळ भारताची चिंता नसून, संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावत आहे. स्वित्झर्लंडसारख्या श्रीमंत देशातही, मूठभरांच्या हाती देशाची संपत्ती एकवटली आहे. भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी, म्हणूनच केंद्र सरकार ठोस उपाययोजना राबवताना दिसून येते.
( Reserve Bank of India 90th foundation day today ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेचा ९०वा स्थापना दिन साजरा होणार आहे.
मी कठोर परिश्रम, इमानदारी आणि समर्पण यावरच सतत विश्वास ठेवत, काम करत गेलो असे म्हणत दिल्ली न्यायालयाचा स्वत:च्या बाजूने लागलेला निकाल विनम्रपणे स्वीकारणारे आणि एकाचवेळी भारतीय हॉकी आणि आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये विविधपदे सांभाळत हॉकीमध्ये आधुनिकता आणणार्या नरिंदर बत्रा यांच्याविषयी...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
काँग्रेसमधील नवे अर्थतज्ज्ञ राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, बँकिंग क्षेत्र संकटात असल्याचा आरोप केला असून, मोदी सरकार या स्थितीला जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. तथापि, आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा दावा दिशाभूल करणाराच ठरतो. भारतीय बँकिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जांच्या समस्येने ग्रासले होते आणि याची मुळे काँग्रेसच्या काळातील अनियंत्रित आणि बेजबाबदार कर्जवाटप धोरणांमध्येच सापडतात.
India अमेरिकेच्या टेरिफमुळे जगामध्ये व्यापारयुद्धाचे सावट जमा झाले आहे. त्यातच कॅनडाच्या नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची मनिषा व्यक्त केली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धकाळात जगाच्या पुरवठा साखळीमध्ये, मोलाची भूमिका बजावण्याची नामी संधी भारताकडे आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा घेतलेला आढावा....
( Russia President Putin visit India soon ) “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन लवकरच भारत दौर्यावर येणार असून त्यासाठीच्या व्यवस्था केल्या जात आहेत,” अशी माहिती रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी दिली.
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी आणि सीरियन शरणार्थींनी युरोपीय देशांमध्ये घातलेला हैदोस पाहिल्यावर, सरसकट कोणालाही भारतात आश्रय देणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायकच! म्हणूनच ‘आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक’ संसदेत संमत करुन मोदी सरकारने हिंदू नववर्षारंभापूर्वीच ‘घुसखोरमुक्त भारता’ची उभ
‘बायो-इकोनॉमी’ अर्थात जैव-अर्थव्यवस्था म्हणजेच जीवाणू, शेती, वने, सागरी संसाधने यांसारख्या विविध नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादन, प्रक्रिया आणि सेवांवर आधारित अर्थव्यवस्था. अशाप्रकारची अर्थव्यवस्था ही अधिक पर्यावरणपूरक मानली जाते. सध्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनही सुरू असून, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचाही जैव-अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होताना दिसतो. त्यानिमित्ताने जैव-अर्थव्यवस्थेची वाढ आणि भविष्यातील व्याप्ती यांचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीयांनी वैदिक काळात स्थापत्य, ज्योतिष, खगोलशास्त्र, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये अपार असे ज्ञान आणि कौशल्य संपादित केले होते. दीर्घकाळापर्यंत भारतीय या ज्ञानाचा दैनंदिन वापर करत होते. मात्र, इंग्रजी आक्रमणानंतर त्यात खंड पडला. तेव्हा अशाच काही भारतीय वैज्ञानिक संशोधन परंपरांचा पुनःपरिचय करुन देणारा हा लेख...
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या अर्थअप्रचाराला सणसणीत चपराक बसली आहे.
मुंबई : 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ सहभागींसह, सुरु होणारा हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या रिअॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनाव
( Union Minister Ramdas Athawale visit to Reserve Bank of India Governor Sanjay Malhotra ) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँके ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची निमिर्ति झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय म्हलोत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबईतील रिझर्व
भारतीय हॉकी संघातील अनेक खेळाडू देशासाठी विजेतेपद जिंकून पदकासाठी कित्येकवेळा ‘पोडियम’वर चढते झाले. त्यामुळेच ते अनेकांच्या गळ्यातील ताईतही झाले. हेच भारतीय हॉकीमधील खेळाडू आता बोहल्यावर चढत आहेत. त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होत आहे. खेळाडूंचा परिचय करून देणारा हा लेख...
'भारतीय निवडणूक आयोग’ ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची एक अत्यंत विश्वासार्ह आणि संविधानिक संस्था आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका केवळ निवडणुका पार पाडण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची रक्षण करणारी ती आधारशिला आहे. मात्र, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या संस्थेवर जे आरोप केले आहेत, ते अत्यंत घातक आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर ‘अपयशी आणि निष्क्रिय’ अशी टिप्पणी करताना जे राजकारण केले, ते नेमके विरोधकांची मानसिकता दर्शवते.
उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, रोजगारवाढीचे कामही ती करत आहे.
शहरी भागात नांदणार्या पक्ष्यांच्या काही प्रजाती असल्या, तरी यापूर्वी हरित क्षेत्रात आढळणार्या मात्र आता शहरी अधिवासाशी जुळवून घेतलेल्या काही प्रजाती आहेत. भारतीय राखी धनेश हा त्यामधीलच एक पक्षी. सांगलीतील शहरी भागात नांदणार्या या पक्ष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
प्राध्यापक डॉ. शंकररावजी तत्ववादी हे एक प्रख्यात विद्वान, शिक्षक आणि समर्पित स्वयंसेवक होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या जागतिक मोहिमेसाठी अर्पण केले. १९३३ साली जन्मलेले तत्ववादी राष्ट्रनिर्माण आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी भारतात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या मोठ्या योगदानासाठी ओळखले जात. तत्ववादी यांचे शैक्षणिक जीवन अत्यंत प्रगल्भ होते. त्यांनी नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तून ‘डॉक्टरेट’ प्राप्त केली. त
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, अशा या सर्वाधिक साक्षर राज्याचे भवितव्य म्हणूनच अंधकारमय!
विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार
पुणे महाराष्ट्रातील महत्वाचे शैक्षणिक आणि तंत्रज्ञान केंद्र आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राला देशाच्या इतर भागांशी जोडणारे अनेक महत्वाची रेल्वे स्थानक आहे. पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेले उरुळी स्टेशन टर्मिनस म्हणून विकसित केलं जातंय. तर हडपसर आणि शिवाजीनगर सारखी स्थानके देखील सॅटेलाइट टर्मिनस स्टेशन म्हणून विकसित केली जात आहेत. यामुळे पुणे स्टेशनची क्षमता वाढेल आणि पुण्याहून येणाऱ्या/जाणाऱ्या गाड्या वाढतील.
Bangladeshi Thieve arrested छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी बांगलादेशी चोरी करणाऱ्यांना दोन चोरांना अटक केली आहे. शिवाय एका मानवी तस्कर आणि आणखी एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे, चोरट्यांच्या टोळीतील असणारे चोर बांगलादेशी रहिवासी आहेत. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाख ५२ रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त