Enter your Email Address to subscribe to our newsletters
( Donald Trump warning to Iran ) अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या अणुकराराचे पालन न केल्यास इराणावर बॉम्बफेक करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणावर आयातशुल्क लादण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
Read More
गेली वर्षानुवर्षे या पदावर ठिय्या मांडून बसलेल्या लोकांना यंदा वन विभागाकडून घरचा रस्ता दाखवण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. (hon. wildlife warden appointment)
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?
Mr. B, Lincoln 1861 सालच्या मार्चमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर, देशातला सर्वांत यशस्वी फोटोग्राफर म्हणून मॅथ्यू ब्रॅडीचा जेव्हा लिंकनशी परिचय करून देण्यात आला; तेव्हा लिंकन म्हणाला, “मिस्टर बी, याला कोण ओळखत नाही. त्याने काढलेला फोटो आणि ‘कूपर इन्स्टिट्यूट’मधले ते भाषण यांनीच तर मला विजय मिळवून दिलाय.”
इस्रायल-हमास युद्धाची ठिणगी पुन्हा शिलगावली गेली असली, तरी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरती युद्धबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, युद्ध टाळण्यातच दोन्ही बाजूंचा विजय आहे, इतकी साधी गोष्ट या नेत्यांना कोण समजावून सांगणार, हाच खरा प्रश्न.
(Shashi Tharoor admits) गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War)सुरु आहे. या युद्धात प्रचंड विध्वंस झाला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा या युद्धाला तोंड फुटले होते, तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. मात्र आता थरूर यांनी रशिया आणि
हा लांब पल्ल्याचा हिवाळी स्थलांतरी पक्षी असून तो पूर्व पॅलेआर्क्टिकपासून आग्नेय आशियात स्थलांतर करतो. (pallas grasshopper warbler)
Marathi literary भारताच्या तिन्ही सीमांवर शत्रू कायमच कुरघोडी करत असतो. त्यात पाकिस्तान हा नित्याचाच झाला आहे. बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, हा या देशासमोरील मोठा प्रश्न. चीन तर गेली कित्येक वर्षे भारताशी आधुनिक पद्धतीचे युद्ध डावपेच खेळत आहेच. त्यामुळे साहजिकच भारतासमोरील आव्हाने ही प्रचंड मोठी आहेत. मात्र, मराठी साहित्यविश्व या सगळ्यापासून कोसो दूर आहे. देशासमोरील सुरक्षेच्या समस्या आणि त्याविषयीची मराठी साहित्यातील निर्मिती याचा घेतलेला आढावा...
मराठी भाषेमध्ये भारतीय सैन्याच्या पार्थपराक्रमाची कथा सांगणारी साहित्यनिर्मिती काही प्रमाणात झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. निवडक अशा युद्धाच्या कथाच पुढे आलेल्या आहेत. त्यातील अनेक पुस्तके तर, प्रत्यक्ष सैनिकांनीच लिहिलेली आहेत. त्यामुळे संशोधन करून, नवसाहित्य निर्मितीसाठी या क्षेत्रात बराच वाव आहे. लष्कराच्या पराक्रमाचे वर्णन करणार्या साहित्यकृतींचा लेखाच्या उत्तरार्धात घेतलेला आढावा...
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच “युरोपने अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनचे संरक्षण करण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे,” असा विचार मांडला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे आर्थिक सहकार्य रोखल्यानंतर मॅक्रॉन यांनी युक्रेनबाबत त्यांचे मत मांडले आहे. अर्थात, मॅक्रॉन यांचे हे वक्तव्य म्हणजे युरोपीय स्वायत्ततेच्या कल्पनेला राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न जरी असला, तरी ही कल्पना सत्यात उतरेल का, हाच खरा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्
बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा तसा मोठा आहे. पण, बरेचदा या चित्रपटांमध्ये इतिहासाचे एकांगी चित्रणदेखील पाहायला मिळाले. विशेषतः मुघल साम्राज्याचे उद्दातीकरण ते स्थानिक योद्ध्यांच्या पराक्रमाला तुलनेने कमी लेखण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नही झाले. पण, २०१४ नंतर हा प्रवाह बदललेला दिसतो. मराठा इतिहासावर आधारित ‘तान्हाजी’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. याच पार्श्वभूमीवर ‘छावा’ या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपटांचा नवा अध्याय सुर
Israel च्या तेल अवीव शहरात तीन बस वाहनांमध्ये स्फोट झाला असल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हे स्फोट बात याम परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत कोणतीही एक जिवीतहानी झाली नाही. पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी कट असल्याचे म्हटले आहे. या संबंधित स्फोटानंतर काही वेळानंतर इस्रायलने काही बँकेतील काही अड्ड्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काच्या निर्णयामुळे, जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी बँका लंडन येथून अब्जावधी डॉलर्स मूल्याचे सोने, अमेरिकेत नेत आहेत. येणार्या काळात आर्थिक संकट तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळत आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला, पण त्याचा शेवट अजूनही अंधारात आहे. हे युद्ध संपवण्याऐवजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्सकी स्वतःच्या सत्तेचा अहंकार जपत, युरोपला युद्धाच्या आगीत ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अमेरिका सौदी अरेबियामध्ये रशियाशी शांतता वाटाघाटी करण्याच्या विचारात असताना, झेलेन्सकीं मात्र थेट युरोपातील देशांनाच युद्धात उतरवण्यासाठीचे आवाहन करत आहेत. युरोपने जर वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर झेलेन्सकींच्या खुर्ची वाचवण्याच्या हट्टापायी, संपूर्ण युरोपच
Israel आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामानंतर युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना सोडले जात आहे. युद्धानंतर झालेल्या कराररानंतर युद्धविराम मिळाला असून यामध्ये आता हमास या दहशतवादी संघटनेने १५ फेब्रुवारी रोजी आणखी ३ इस्त्रायली नागरिकांची सुटका केली आहे.
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार आहे. यंदा बडोदा, बंगळुरू, लखनऊ आणि मुंबई या ४ शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या समिटनंतर काल दि. १२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेला येथील माझारग्युस वॉर सेमेटरी (mazargues war cemetery) येथे भेट दिली.
Israel-Hamas War यांच्यात गेल्या १६ महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. याच युद्धजन्य परिस्थितीस पूर्णविराम भेटला आहे. हमासने ४ इस्रायली महिला सैनिकांची सुटका केली आहे. लिरी अलबाग, डॅनिएला गिलबोआ, करीना एरिव्ह आणि नामा लेव्ही अशी सैनिकांची नावे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नहल ओझ तळावरील हल्ल्यादरम्यान हमासने त्यांचे अपहरण केले होते.
Hamas-Israel war यांच्यातील युद्भबंदीच्या घोषणेनंतर रविवारी २० जानेवारी २०२५ रोजी गाजा पट्टीतून तीन इस्रायली मुलींची सुटका करण्यात आली आहे. रोमी गोनेने वय वर्षे २४ असून एमिली डमारी वय वर्षे २८ आहे. तर ३१ वर्षांची डरॉन अशा सुटका झालेल्या युवतींची नावे आहेत.
सीरियामध्ये ( New Syria ) गेल्या महिनाभरात ११६ बालके मृत्युमुखी पडली. म्हणजे, दिवसाला सरासरी चार बालके! पण, या बालकांवर कुणीही हल्ला केला नव्हता. हळूहळू सीरिया गृहयुद्धातून बाहेर पडतो आहे. मात्र, या गृहयुद्धातील न वापरलेली किंवा न फुटलेली विस्फोटके अजूनही सीरियाच्या भूमीत विखुरलेली आहेत. परिसरातील सुप्त अवस्थेतील बॉम्ब, विस्फोटक शेल्स, ग्रेनेड किंवा क्लस्टर म्युनिशनच्या स्फोटाने ही बालके मुत्युमुखी पडली. ‘युनिसेफ’सह संपूर्ण जगाने याबाबत शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. आधीच अनेक दशके सुरू असलेल्या सीरियामध्ये
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सुमारे १०.३० वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता त्यांच्या हस्ते खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
भारतावर बिनबुडाचे सतत आरोप करणार्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो ( Justin Trudeau ) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील जनतेच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी, तुष्टीकरण आणि सत्तेला चिकटून राहण्यासाठी लांगूलचालन करण्याचा प्रयत्न ट्रुडो करत होते. मात्र, अखेरीस त्यांना राजीनाम्याचा निर्णय घ्यावाच लागला आहे.
(Sheikh Hasina) बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील विद्यमान अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. शेख हसीना यांच्यासह आणखी ९७ जणांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती, महाराष्ट्र आयोजित रौप्यमहोत्सव पालखी सोहळा दि. ५ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. कॉटनग्रीन येथील राम मंदिरातून सकाळी ८ वा. ही दिंडी ( Warkari Dindi ) सुरु करण्यात आली. मुंबईतील कॉटनग्रीन, परळ गाव, भोईवाडा, नायगाव असे पायी चालत वारकरींनी प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आपल्या दिंडीची सांगता केली. तीन हजार पेक्षा जास्त वारकरी या दिंडीत, व पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
चीनशी संबंध म्हणजे एक शून्याचा पाढा आहे. भारत-चीन सीमेबाबत चीन घुसखोरी केलेल्या भागातून परत गेल्यानंतर भारत-चीन संबंध सुधारतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, चीन सतत भारतावरती मानसिक दबाव टाकत राहील. सीमा विवाद करार झाल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारताला आठवण करून दिली की, चीन भारताविरुद्ध जलयुद्ध सुरुच ठेवेल. त्याची आठवण म्हणून एक घोषणा करण्यात आली की, एक महाकाय धरण चीन ब्रह्मपुत्रेवर भारत-चीन सीमेवर बांधत आहे. चीन भारताकडे केवळ एक आर्थिक बाजारपेठ म्हणून बघतो, एक बरोबरीचा देश म्हणून नाही, त्याचेच हे आणखी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ( Navy ) ताफ्यात येत्या १५ जानेवारी रोजी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या तीन युद्धनौकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
नवी दिल्ली : आजच्या सतत बदलणाऱ्या काळात लष्करी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या सैनिकांना सुसज्ज आणि सज्ज करण्यात लष्करी प्रशिक्षण केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधील अधिकाऱ्यांना संबोधित करताना केले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लहान मुलांचा आवडता सुपरहिरो म्हणजे क्रिश. ह्रतिक रोशन याने क्रिश चित्रपटात साकारलेली भूमिका आजही तितकीच आवडते. आणि आता याच चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्यावर्षी 'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच चाहते 'क्रिश ४’ च्या प्रतिक्षेत आहेत. राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली असल्यामुळे क्रिश ४ येणार की नाही अशीच शंका निर्माण झाली होती. पण आता लवकरच क्रिश ४ येणार असून चित्रिकरण देखील लवकर सुरु होणार
दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी १९७१ सालच्या भारत-पाक युद्धातील भारताच्या निर्णायक विजयाला ५३ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने...
ठाणे : कारगिल युद्धाला ( Kargil War ) यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या युद्धात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून ‘कारगिल-द टेल्स ऑफ वेल्लर’ या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. ’शारदा एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आनंद विश्व गुरुकूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
अणुयुद्धाची तयारी करणे नंतर होऊ शकते. मात्र, संशोधन व आधुनिकीकरण चालू ठेवावे. जगात सध्या विविध ठिकाणी ६० हून अधिक युद्धे सुरू आहेत. संरक्षणदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या राष्ट्रावर दुसरी राष्ट्रे आक्रमण करण्यास धजावत नाहीत. आपल्याला शांतता हवी आहे. पण, आपणास सर्व प्रकारच्या लढाईकरिता सदैव तयार राहणे जरुरी आहे.
सीरियामध्ये बशर अल असद यांची राजवट वाचवण्यासाठी इराण आणि रशिया कोणत्याही थराला जातील. दुसरीकडे ‘हयात अल तहरीर’ला यश मिळावे, म्हणून तुर्की प्रयत्नशील असून यात पाश्चिमात्य देशही मदत करु शकतात. गेल्या १४ वर्षांच्या यादवी युद्धामध्ये सीरिया होरपळला असला, तरी बशर अल असद स्वतःची खुर्ची सोडण्याची शक्यता तशी कमीच.
दमास्कस : सीरियामध्ये बंडखोरांनी पुन्हा डोके वर काढले असून, सीरियाची सुरक्षा दले आणि बंडखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यातच ‘तहरीर अल-शाम’ या ‘अल-कायदा’ या दहशतवादी गटांतून विभक्त झालेल्या गटाने सीरियाच्या अलेप्पोवर अचानक हल्ला करून या शहराचा ताबा घेतला होता. बंडखोर गटांच्या या हल्ल्यामुळे पुन्हा सीरियामध्ये युद्धसदृश ( Civil War ) परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने खलिस्तान्यांशी संबंधित १० हजार ५०० हून अधिक युआरएल ब्लॉक केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजमाध्यमे आणि इंटरनेटवर पसरवलेला खलिस्तानी प्रचार रोखण्यासाठी गेल्या ३ वर्षांत ही कारवाई केली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील धान्य साठवण ( Grain Storage ) क्षमता वाढविण्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विविध तालुक्यांतील सात सहकारी संस्थांसोबत ‘धान्य साठवण योजनें’तर्गत ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन’ (एनसीसीएफ) या भारत सरकारच्या धान्य खरेदी संस्थेकडून पुढील सात वर्षांसाठी कराराला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. केंद्रात स्वतंत्र सहकार खाते सुरू झाल्यानंतर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अन्न धान्य साठवण क्षमता वाढविण्यासाठी सहकार
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ( Mahayuti ) विजयामागे अनेकांचे सुप्त हात होते, तर काही संघटना, संप्रदाय प्रत्यक्ष मैदानात उतरून धर्मजागरणासाठी प्रचार करत होते. त्यांपैकी वारकरी संप्रदायाने महायुतीच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. साधी राहणी, मुखामध्ये श्री विठ्ठलाचे नाव कोणाच्या आल्यात नाही की गेल्यात नाही, ही वारकरी संप्रदायाची ओळख. मात्र, या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.
ठाणे : प्रसूतिनंतर कमी वजनाची बालके जन्मल्यावर त्यांची काळजी घेणे तारेवरची कसरत असते. मात्र, खासगी प्रसूतिगृहाप्रमाणेच सुसज्ज प्रसूतिगृह सिव्हिल रुग्णालयात ( Civil Hospital ) आहे. गेल्या ११ महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनाची ३६ बालके प्रसूतिगृहात जन्मली आहेत. सिव्हिल रुग्णालयातील एसएनसीयू कक्ष कृश बालकांसाठी देवदूत ठरत असून, बर्याच बालकांची प्रकृती सुधारून माता आणि बाळ सुखरूप घरी जात आहेत.
(Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
Russia Ukraine युद्धात #DeepState ची नवी खेळी!
जगात दुसर्याच्या भांडणात नाक खुपसून स्वार्थ साधणारा एकमेव देश म्हणजे अमेरिका होय! सूक्ष्म अभ्यास केल्यास असे स्पष्ट दिसून येईल की, आजवर जगात झालेल्या कोणत्याही संघर्षात कायमच अमेरिकेचा स्वार्थ दडलेला आहे. सध्या धुमसत असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातदेखील अमेरिकेने युक्रेनला केलेली सर्व प्रकारची मदत कारणीभूत आहेच.
मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वी हा काहीसा दुर्लक्षित मतदारसंघ. येथील ७५ टक्के लोकसंख्या ग्रामीण असून, बेरोजगारीची समस्या भीषण आहे. शेती, सिंचन, आरोग्य, उच्च शिक्षणात हा मतदारसंघ मागे दिसतो. ब्रिटिशकाळात संपन्न असलेला हा विभाग राजकीय दुर्लक्षामुळे मागे राहिला. परंतु, या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ‘आर्वी’चा ७५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार सुमित वानखेडे ( Sumit Wankhede ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद
न्यूयॉर्क : ( Hamas ) हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने वर्षभरापूर्वी गाझा पट्टीवर हल्ले चढविले होते. आता जवळपास ८० टक्के गाझापट्टीतील इमारती विदीर्ण अवस्थेत आहेत. हमासचे दहशतवादी या हल्ल्यांचे लक्ष्य असताना गाझातील ७० टक्के महिला आणि मुले या युद्धात ठार झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ या चित्रपटातील सर्कीट हे पात्र आजही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे. त्या चित्रपटामुळे एक नवी ओळख मिळवणारा अभिनेता अर्शद वारसी याने काही दिवसांपूर्वीच ‘कल्की’ चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने आणखी एका चित्रपटावर भाष्य करत लोकांचे कान स्वत:कडे वळवले आहेत. ‘स्त्री २’ चित्रपटाबद्दल अर्शदने आपले मत एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
Israel Vs Iran War इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर असंख्य क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता २६ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलने जबरदस्त पलटवार केला आहे. अशातच इराणची महत्त्वाची लष्करी केंद्रे उद्ध्वस्त केली होती. आता इस्त्रायलने केलेल्या जबरदस्त हल्ल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणवर इस्त्रायलने क्षेपणास्त्र डागत शाहरौद स्पेस सेंटर उद्धवस्त झाली आहे.
( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, आता हिजबुल्लाहाला इस्रायलने चांगलाच धडा शिकवण्याच्या निर्णय घेतला आहे. बेरुत मधील हिजबुल्लाहाच्या शस्त्रसाठ्यांच्या आवारात हल्ला करत, इस्रायली सुरक्षा दलाने ३५ जणांचा खातमा केला आहे.
Israel-Iran War : युद्धभूमीवर न उतरता इस्त्रायलनं इराणला चितपट कसं केलं?
Russia-Ukraine War युद्धामुळे वाद तात्पुरते मिटल्यासारखे वाटत असले, तरी ते संपुष्टात येत नाहीत. वादांवर चिरस्थायी तोडगा काढण्यासाठी अखेरीस चर्चेचा मार्गच अवलंबावा लागतो. आपल्यावर आक्रमण करणार्या देशांशीही भारताने चर्चा सुरू ठेवली आहे, त्याचे कारण केवळ युध्दाने प्रश्न सुटत नाही. २१ वे शतक हे भारताचे आहे. भारताच्या भरभराटीचा लाभ केवळ भारतापुरताच मर्यादित राहणार नाही, तर तो सार्या जगाला होईल. समर्थ आणि समृध्द भारत ही जागतिक शांततेसाठी आवश्यक बाब आहे.
इराण - इस्त्रायल युद्धामुळे जगावर येणार गडद संकट
भारत हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक देशांपैकी एक आहे. भारतातून विविध प्रकारचे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जात असल्याच्या बातम्यांनी चर्चेला उधाण आले आहे. त्यानिमित्ताने या विषयाचा घेतलेला हा सखोल आढावा...