Enter your Email Address to subscribe to our newsletters
रेड सी प्रकरणामुळे (Red See Crisis) मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ( Crude) तेलाच्या पुरवठा कमी झाल्यानं किंमतीतही फरक पडला.याच धर्तीवर भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे नवीन आकडे समोर आले आहेत.
Read More
आयएमएफ ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड ) व वर्ल्ड बँक यांनी गाझा पट्टीतील इस्त्रायल हमास युद्ध, व रेड सी जहाज हल्ला या प्रकरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी हमास युद्धाचा मध्य पूर्व, उत्तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले होते अशी स्पष्टोक्ती इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टीटालिना जॉर्जिव्हा यांनी दिली आहे.
'इस्रायल-‘हमास’ युद्धात हुती बंडखोरांनी ’हमास’ला समर्थन देत, लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी या हल्ल्याचा प्रतिकार आक्रमक पद्धतीने केला.
इस्रायल-‘हमास’ युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक राजकारणात पश्चिम आशिया क्षेत्र केंद्रस्थानी आले. इस्रायल-‘हमास’ युद्ध, गाझा पट्टीतील छोट्याशा भूभागावर लढण्यात येत असले तरी, या युद्धाचे राजकीय, आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. पश्चिम आशियातील प्रादेशिक शक्ती विरूद्ध जागतिक महाशक्ती असा संघर्षही इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे उफाळून आला. यात जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात.
भारत स्वायत्त परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून अमेरिकेच्या नेतृत्त्वातील कृतीगटाचा भाग झाला नसला तरी तांबड्या समुद्रातील वाहतुकीच्या सुरक्षेच्या बाबतीत भारताची भूमिका पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेशी सुसंगत आहे. व्यापारी वाहतुकीला लक्ष्य करणे युद्ध नियमांमध्ये बसत नाही. जे देश या युद्धात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी नाहीत, त्यांच्या जहाजांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन करता येऊ शकत नाही.
यमनमधील हुथी बंडखोरांनी दि. २४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात तेल वाहून नेणाऱ्या आणखी एका जहाजाला लक्ष्य केले आहे. या जहाजावर भारताचा ध्वज होता. अशी माहिती अमेरिकेच्या नौदलाने दिली आहे. या जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. ड्रोन हल्लानंतर तेलवाहू जहाजाने लाल सागरात उपस्थित असलेल्या अमेरिकन युद्धनौकेला धोक्याचा इशारा पाठवण्यात आला होता.
हुथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे लक्ष्य केलेल्या गॅबॉन जहाजावर भारतीय ध्वज नव्हता, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. दि.२४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात एक मालवाहू जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची माहिती देताना, अमेरिकी नौदलाने मालवाहू जहाजावर भारतीय ध्वज असल्याचा दावा केला होता. पण आता भारतीय हवाई दलाने अमेरिकी नौदलाचा दावा फेटाळला आहे.