Enter your Email Address to subscribe to our newsletters
( Maryada Purushottam Shriram ) सूर्यवंशात दिलीप नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदक्षिणा. त्यांचा पुत्र रघु ज्याने ९९ अश्वमेध यज्ञ केलेत. शंभराव्या वेळी इंद्राने प्रसन्न होऊन घोड्याशिवाय यज्ञ पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आणि तेंव्हापासून चक्रवर्ती साम्राज्याच्या या वंशाला रघुवंश म्हणतात. रघुचा पुत्र अज ज्याने विदर्भ देशाचा राजा भोज याच्या इंदुमती नावाच्या कन्येशी विवाह केला. याच अज आणि इंदुमतीचा पुत्र म्हणजे राजा दशरथ. दशरथाला तीन राण्या होत्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी पण तिघींनाही पुत्
Read More
Shriram Panchali पश्चिम बंगालची भूमी म्हणजे साहित्य, संगीत, कलेचे माहेर आहे. बंगाली भाषेला फार मोठी देदीप्यमान साहित्य परंपरा आहे. ‘गीत गोविंद’ लिहिणारे कवी जयदेव, मालाधर बसु, विप्रदास, विजयगुप्त, चंडीदास, चैतन्य प्रभु, लोचनदास, रवींद्रनाथ टागोर अशी कवी-महाकवींची थोर परंपरा हे बांगला भाषेचे वैभव आहे. या कवींच्या मांदियाळीमधील 14 शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला, कृत्तिवास ओझा यास ‘आदि महाकवी’ म्हणून ओळखले जाते. या थोर पंडित महाकवीचे रामायण, ‘कृत्तिवास रामायण’, ‘श्रीरामपांचाली’ अशा विविध नावाने विख्यात आहे. बंगाल
सणासुदीच्या हंगामात ट्रक भाड्यात वाढ झाली असून ऑगस्टपर्यंत वाढीचा कल कायम ठेवला आहे. श्रीराम मोबिलिटी बुलेटिन नुसार सलग दुसऱ्या महिन्यात वाढला. सणासुदीच्या हंगामाचा दृष्टिकोन व निवडणुकीनंतरच्या वाढलेल्या सक्रियतेसह विविध वाहतूक मार्गांवर मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा विजय झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील अशी मुख्य लढत झाली. दि. ४ जून रोजी झालेल्या मतमोजणीत सकाळपासून रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. सध्या रक्षा खडसे यांना ६ लाख २७ हजार ६७२ मते मिळाली आहेत. तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार ६२४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संजय बरामाने हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीने आपला तिमाही निकाल केला आहे. कंपनीला जानेवारी ते मार्च तिमाहीत १२१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला करोत्तर नफा (Profit After Tax) १५८ कोटी झाला आहे. मागील वर्षाच्या या तिमाहीत कंपनीला १५६ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
बाबरी मशिदीचे पुनर्निमाणाचे काँग्रेसचे दिवास्वप्न पूर्ण न होऊ देण्यासाठी मतदानाद्वारे राष्ट्रविरोधी षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा श्रीराम मंदिराचा निकाल फिरविण्याचा मनसुबा आहे, असा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. त्यावर विहिंपचे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी काँग्रेसवर टिका केली आहे.
येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उत्तर मुंबईचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल यांची प्रचार रॅली काढण्यात आली.
रामाच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द विवेकधिष्ठित असल्याने तो निश्चियात्मक असतो. तो शब्द फिरवण्याची वेळ कधी रामावर येत नाही. म्हणून रामाला ‘एकवचनी’ म्हणून ओळखतात. कोणत्याही परिस्थितीत राम आपल्या वचनावरून मागे फिरत नाही.
आपलेही भाग्य की इतक्या महान सर्वश्रेष्ठ मर्यादापुरुषोत्तमाच्या पावन भूमीत आपण जन्माला आलो. पुराणकारांनीदेखील म्हटले आहे की, धन्यास्तु ते भारतभूमिभागे! पण, श्रीरामांचे चरित्र हे केवळ भारतापुरतेच किंवा तथाकथित हिंदूजनांपुरतेच मर्यादित नाही, तर ते समग्र विश्वातील प्रत्येक राष्ट्रात वसणार्या प्रत्येक मानवासाठी आहे. मग तो हिंदू असो की मुस्लीम, इसाई असो, बौद्ध असो, पारशी असो, शीख असो किंवा चिनी, अमेरिकी.. कोणीही असो.. जो कोणी मानव आहे, त्यासाठी प्रभू श्रीराम आणि त्यांचे उज्वल व्यापक जीवन!
रामायण आणि महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथांचे भारतीय समाजाशी अतूट नाते आहे. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांच्या या ग्रंथांनी भारतीय जीवनात हजारो वर्षे आदर्श निर्माण केले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतीयांचे जीवन व्यापून टाकले आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये खगोलशास्त्रीय घटनांचे जे दाखले दिले गेले आहेत, ते आश्चर्यकारकच आहेत. अनेक संशोधकांना या खगोलशास्त्रीय दाखल्यांनी भुरळ पाडली आहे. घटनांचा काळ ठरविताना, संशोधकांना खगोलशास्त्रीय संदर्भ उपयोगी पडले आहेत. आज आपण वाल्मिकी रा
Ram Temple Ayodhya | कारसेवक कोण होते? | कम्युनिस्ट, काँग्रेस आणि कोळीवाडा | श्रीराम जन्मभूमी मुक्ती गाथा| MahaMTB Gappa Ep 9 | राम मंदिर | Truth of Karsevaks | Marathi Podcast
माणूस जन्माला आल्यानंतर जीवनात त्याला अनेक स्थित्यंतरे पाहावी लागतात. त्यातून त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती तयार होत जाऊन व्यक्तिमत्व तयार होते. त्यात संगतीचा मोठा परिणाम दिसून येतो. मन वायूरूप असल्याने चंचल, अस्थिर असते. तथापि मनाची एक विशेषता म्हणजे एखादी गोष्ट मनाला पटली, तर मन तो विचार सहसा सोडत नाही. आपल्या जीवनातील ध्येय निश्चिती झाली की त्या ध्येयाकडे जाण्याचे जे मार्ग असतात, त्यावर सारासार विचार करून आपण अनुरूप मार्गाची निवड करतो. मनाला ध्येयविचाराची खात्री पटली की, त्याप्रमाणे आचरण घडू लागते आणि ध्येया
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Radhika Wedding) यांच्या लग्नापूर्वी आयोजित केलेला प्री-वेडिंग सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी रिहानाचा डान्स चर्चेत असतानाच आता शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान 'जय श्री राम' म्हणत प्री-वेडिंगला उपस्थित असलेल्या लोकांना शुभेच्छा देताना ऐकू येतो.
आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नवीन गुंतवणूकदार सदस्यतेची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. २९ फेब्रुवारीला एनएससीमध्ये सदस्यांची संख्या ९ कोटी पार झाली आहे. आजपर्यंत एकूण १६.९ कोटी ग्राहकांची कोड नोंदणी दाखल झाली आहे. आता ग्राहक एकाहून अधिक कोडची नोंदणी स्टॉक एक्सचेंजबरोबर करू शकतील.
मुंबई महापालिकेने दि. २५ जानेवारी २०२४ रोजी मोहम्मद अली रोडवरील अतिक्रमण हटवत कारवाई केली. या कारवाईत ४० दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले. यातील काही दुकाने १९३० मध्ये बांधण्यात आली होती. याआधी दि. २४ जानेवारी रोजी मीरा भाईंदर महापालिकेने मीरा रोड, ठाणे येथील १५ इमारतींवर कारवाई केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमंत्रांच्या घोषात १४० कोटी भारतीयांच्या वतीने अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अवघ्या हिंदू समाजाच्या मनात “विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी” अशी भावना दाटून आली होती.
ती बघू शकत नाही, तरी प्रभू श्रीरामांप्रति असलेल्या श्रद्धेमुळे तिने रामाचे सुश्राव्य गीत गायिले आहे. अशा जन्मतः अंध असलेल्या श्रेया शिंपी या हरहुन्नरी विद्यार्थिनीबद्दल...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मंगळवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राम काय खात होते? हे सर्व बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खाता, हे आता आमच्या लक्षात आले आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रविवारी ठाणे येथे आयोजित राम जन्मभुमी आंदोलनात सहभागी कारसेवकांच्या सन्मानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अनेक विकास कामांच लोकार्पण ते करणार आहेत. सकाळी सुरुवातीला नाशिक आणि दुपारी नवी मुंबई चा दौरा ते करणार आहेत. पंतप्रधान सकाळी नाशिक येथे पोहोचले आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी रामाचा अपमान केला नाही अस म्हणत. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी "राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात राहणारा माणुस शाकाहारी कसा असु शकतो" असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भारतभर हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्य़ा. देशभरातून त्याचा हिंदूंनी तीव्र शब्दात निषेध केला होता
अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी अयोध्येत हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधात निदर्शनेही करण्यात येत आहे. यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आक्रमक झाला असून आंदोलन सुरु केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभु श्रीरामांबद्दल एक वादग्रस्त विधान केले. यावरून सगळीकडूनच त्यांच्यावर टीका करण्यात येत असून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यातच आता आमदार रोहित पवारांनीही जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले आहेत.
इतर महत्वाचे विषय असताना देव देवतांवर वाद होणं अपेक्षित नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधात संपुर्ण राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनीही त्यांना सुनावलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांना घरचा अहेर दिल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभु श्रीरामांबद्दल एक वादग्रस्त विधान केले. यावरून रोहित पवार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले होते.
'संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सडक्या बुद्धीचे केविलवाणे प्रदर्शन केले आहे. सातत्याने हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्ये करून हिंदूंच्या भावना भडकावून राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला आम्ही पुण्यात फिरू देणार नाही' असा कडक इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. परंतू, केवळ रामाबद्दलच नाही तर महात्मा गांधीजींबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गांधीजी ओबीसी असल्याने त्यांची हत्या केली असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.
शरद पवारांच्या व्यासपीठावर त्यांच्या समोर जेव्हा जितेंद्र आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भुमिका आहे, असे म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाडांचे कान पिळले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून यासंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी अयोध्येच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी घेण्यात आली. यादरम्यान विमान धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरवण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या दोनदिवसीय बैठकीस शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे.लोकसभा निवणडणुकीसाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आपल्या तयारीस प्रारंभ केला आहे. पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी या बैठकीस सुरूवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा य
अयोध्येच्या धरतीवर श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य पुर्णत्वास येऊ लागले आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या दिवशी श्रीरामलला मंदिरात विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक दिनी भारतभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी न्यासकडून करण्यात आले आहे.
भाजपने रामभक्तांना अयोध्यावारीच्या दिलेल्या आश्वासनावरुन ठाकरे बंधूंना पोटशूळ उठणे म्हणा साहजिकच. या अयोध्यावारीचा राजकीय लाभ भाजपला होईल, हीच ठाकरेंची खरी पोटदुखी. पण, स्वत:ला सच्चे हिंदुत्ववादी म्हणविणार्या ठाकरे बंधूंनीही राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून, रामभक्तांच्या अयोध्यावारीसाठी पुढाकार घेतला, तर रामभक्तांचे आशीर्वाद त्यांनाही लाभतीलच!
श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ लाख २३ हजार लाख दिव्यांना प्रज्वलित करून गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ३० लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघाली आहे. दीपोत्सव २०२३ द्वारे नवा विक्रम करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात प्रमाणपत्र स्वीकारले आहे.
भारतीय समाज रामनामाच्या माळेत गुंफला गेला आहे. भारतीय समाजाला धर्मश्रद्धा, नीती आणि संस्कृतीच्या एकतेमध्ये संमेलित करणार्या प्रभू श्रीरामचंद्राबाबत देशविघातक समाजद्वेष्ट्या लोकांना आकस असणारच. प्रभू श्रीरामचंद्रांचे माहात्म्य कमी करता येत नाही, म्हणून मग रावणाला महात्मा ठरवण्याचे उद्योग काही जण करतात. कामानिमित्त देशभर फिरताना असले उद्योग निधर्मी, डावे आणि मुख्यतः नक्षल समर्थकांकडून होताना पाहिले आहेत. रावण दहनानिमित्त, त्या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...
हिंदी चित्रपटसृष्टीची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. ८०-९०च्या दशकापासून प्रेक्षकांना आपल्या आभिनय आणि नृत्याच्या अदाकारीने घायाळ करणारी माधुरी आता दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने ‘पंचक’ या तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली असून माधुरी व तिचे पती श्रीराम नेने हे दोघेही या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रे
गाझियाबादच्या एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थांने 'जय श्री राम' असा नारा दिल्यामुळे त्या विद्यार्थ्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एक विद्यार्थी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर खालून काही विद्यार्थी 'जय श्री राम' म्हणतात, त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले विद्यार्थीही 'जय श्री राम' म्हणत त्यांना प्रतिसाद देतो.
नवी मुंबईच्या वाशीमध्ये दि. १२ जून रोजी सेंट लॉरेन्स शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे शाळेने दहावीच्या ६ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता ही कारवाई मागे घ्यावी यासाठी पालक संघटनेने मागणी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत परत नाही घेतल्यास ठिय्या आंदोलनाचा इशआरा संघटनेकडून देण्यात आला आहे. पण यावर शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
ध्या आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटाची बरीच चर्चा भारतभर पहायला मिळत आहे.'सुपरस्टार' प्रभास'ने यात भगवान श्रीरामांची भूमिका साकारली आहे.
अयोध्या : अयोध्येतील संत महातांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहाती प्रभू श्रीरामाचे आयुध असलेला धनुष्यबाण विधिवत सुपूर्त करून धर्माचे राज्य निर्माण करण्याचा आशीर्वाद देण्यात आला. लक्ष्मण किला येथे पार पडलेल्या दर्शन आणि महंत संकल्प महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अयोध्येतील महंतांचा यथोचित सन्मान करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शुभआशिर्वादही घेतले.
हनुमानाला सोपविलेली कामगिरी सीतेचा शोध लावणे, एवढीच होती. तरीदेखील नेमलेल्या जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी तारतम्याने स्वतःकडे घेणे आणि ती पार पाडण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणे, यात हनुमानाची दूतकार्याविषयी प्रगल्भता दिसून येते. आज हनुमान जयंतीनिमित्त श्रीरामदूत हनुमानाचे स्मरण...
आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी. त्यानिमित्त विश्वाचे अभिराम मर्यादापुरुषोत्त्म प्रभू श्रीराम यांच्या अलौकिक कर्तृत्वाचे, पुत्र-पिता-पती अशा सर्वच नातेसंबंधांप्रति त्यांच्या समर्पण आणि निष्ठेचे चित्रण करणारा हा लेख...
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी 'जय श्रीराम', 'जय सियाराम' व 'हे राम'च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले, "जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो. प
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातून अनेक भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येत असतात. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी सुमारे १०० खोल्यांचं प्रशस्त सदन या ठिकाणी आपण उभारणार आहोत. तसेच त्यासंबंधी आदित्य ठाकरे स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शेजारच्या नेपाळमध्ये नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो हिंदूंनी मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात ‘वुई सपोर्ट नुपूर शर्मा’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा लिहिलेले फलक होते. नुपूर शर्मा यांच्यावर मुस्लिमांकडून चहूबाजूंनी हल्ला होत असल्याचे दिसत असताना नेपाळमधील हिंदू समाज नुपूर शर्मा यांच्यामागे उभा असल्याचे या निदर्शनांवरून दिसून आले.
भारतीय समाजाने अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी ५०० वर्षे लढा दिला आणि आता ही संघर्षमय साधना त्याच्या सिद्धीकडे जाताना दिसत आहे. अयोध्येत उभारले जाणारे भव्य श्रीराम मंदिर भारताचे राष्ट्रमंदिर ठरेल,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अयोध्येत केले.
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपा प्रसादाने श्री कालिपीठ संस्थान नैमिषारण्यतर्फे गीतरामायण आणि श्रीराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कालिपीठाधीश प. पू. गोपाळ शास्त्री, नैमिषारण्य यांच्या उपस्थितीत १ जुलै ते १० जुलै या कालावधीत अयोध्या काशी, नैमिषारण्य, प्रयागराजसह अयोध्या येथील जानकी महल येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून गौरवण्यात आलेले प्रतिभावंत कवी ग. दि.माडगूळकर (गदिमा) विरचित गीतरामायण संगीतबद्ध करून ते आपल्या अमृतवाणीने, भावपूर्ण स्वर्गीय स्वरात गीतगायन करून बाबूजीं
काकासाहेब, तुमचे मानलेले माजी पुतणे काल आमच्या थोरल्या साहेबांसारखे भगवी शाल घेऊन होते. ते म्हणे, अयोध्येला पण जाणार आहेत. आता काय करावे?