भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.
Read More
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी एक अत्याधुनिक ट्रॅक स्लॅब निर्मिती कारखाना स्थापन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेड इन इंडियाला पाठबळ देण्यासोबतच देशातील हाय-स्पीड रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये हा कारखाना मैलाचा दगड ठरणार आहे. प्रगत शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च क्षमतेचे गिट्टीविरहित ट्रॅक स्लॅब तयार करण्यासाठी कारखान्याची रचना करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या रुळांची स्थिरता आणि कामगिरी सुनिश्चित करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडने ५५० स्वदेशी मशीन पिस्तुल ‘अस्मि’ची ( Asmi Shastra ) खरेदी करण्यास हिरवा कंदील दिला आहे. याआधीही ५५० बंदुका खरेदी करण्यात आल्या होत्या. भारतीय लष्कराच्या या मागणीमुळे संरक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. ही बंदूक कर्नल प्रसाद बनसोड यांनी डीआरडीओच्या सहकार्याने बनवली आहे. नंतर ती हैदराबादच्या ‘लोकेश मशीन्स’ नावाच्या कंपनीने बनवली असून पूर्णपणे स्वदेशी आहे.
भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था वाढविण्याच्या उद्देशाने अॅममेझॉन इंडियाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत (एम.आय.बी) लेटर ऑफ एंगेजमेंट (एल.ओ.ई) वर स्वाक्षरी केली आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून अॅामेझॉन आणि एम.आय.बी भारतातील अभिनव प्रतिभेला प्रोत्साहन देता यावे म्हणून मार्ग तयार करण्यात मदत करतील, प्रख्यात चित्रपट आणि टीव्ही संस्थांमध्ये क्षमता निर्माण करतील आणि जागतिक स्तरावर मेड इन इंडिया सर्जनशील आशय प्रदर्शित करतील. भारत सरकारचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आणि वरुणराजाच्या साथीने भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप समारंभ अर्थात ’बीटिंग द रिट्रीट’ सोहळा रविवारी नवी दिल्लीतील विजय चौकात संपन्न झाला. यावेळी खास भारतीय सुरावटी विशेष आकर्षण ठरल्या.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे शनिवारी दिल्लीत आगमन झाले. नाताळच्या कालावधीत यात्रा स्थगित असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होणार आहे.
सिरम इन्स्टटयूटचे मालक आदर पुनावाला यांनी भारतीय बनावटीच्या 'कोव्हीशील्ड' या लसीला आपत्कालीन स्थितीत वापरायची परवानगी मिळाल्याची आनंदवार्ता देण्यास ट्विट केले व यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा आभार
मराठमोळा तरुणाने बनवले भारतीय फाईल शेअरिंग अॅप
चीनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर भारत आता आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहे