Waliv Police

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे

Read More

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई केली

Read More

बिजू जनता दलाच्या माजी खासदारानं केला आंतरजातीय विवाह, समाजाने घातला १२ वर्षे बहिष्कार! काय आहे प्रकरण?

(Pradeep Majhi's Inter-caste Marriage Controversy) ओडिशातील नवरंगपूरचे माजी खासदार आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते प्रदीप माझी (Pradeep Majhi) यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्या भातरा समाजाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला १२ वर्षांसाठी बहिष्कृत केले आहे. प्रदीप माझी यांनी बुधवार दि. १२ मार्च रोजी गोव्यामध्ये केंद्रपाडा जिल्ह्यातील सुश्री संगीता साहू या ब्राह्मण समाजातील महिलेशी लग्न केले. यानंतर अखिल भारतीय आदिवासी भात्र समाजाच्या केंद्रीय समितीने धामनागुडा येथे बैठक घेऊन प्रदीप आणि त्याच्या क

Read More

ठाण्यात महाशिवरात्रीनिमित्त उजैनच्या पवित्र ज्योतीच्या अग्नितून होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान

भारतीय जनता पार्टी, अध्यात्मिक समन्वय आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने पवित्र व मंगलमय वातावरण आणि मंत्रोच्चारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडले. या अनुष्ठानात उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातुन आणलेल्या ज्योतीतून होमातील अग्नि प्रज्वलीत करण्यात आला. १५१ दांपत्यांनी या अनुष्ठानात सहभाग दर्शविला. त्यानंतर महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. आचार्य आशिषकुमार जानी यांनी पौराहित्य केलेल्या या कार्यक्रमाला आ.संजय केळकर यांच्यासह अने

Read More

स्वत:च्या 'इन्व्हार्यमेंटल फूटप्रिंट'ची काळजी घ्या ! - डाॅ. जेन गुडाल | Maha MTB

पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे ? Dr. Jane Goodall

Read More

पर्यावरणीय समस्यांची उकल इंटलॅक्चुअल दृष्टिकोनातूनही करा - डाॅ. जेन गुडाल

"वातावरणीय बदलामुळे जगासमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन हे इंटलिजन्स वापरून नाही, तर इंटलॅक्चुअल दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे", असे मत जेष्ठ वन्यजीव संवर्धक, संशोधक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीदूत डाॅ. जेन गुडाल यांनी मांडले. त्या शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘ओशन लिस्ट्रसी डायलाॅग’ या कार्यक्रमात बोलत होत्या. ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत गुडाला या पाच दिवसीय मुंबई दौर्यावर आल्या आहेत.

Read More

‘देवरा १’मध्ये जान्हवी नाही तर मराठमोळी श्रुती मराठे आहे Jr NTR ची हिरोईन

ज्युनियर एनटीआरची प्रमुख भूमिका असणारा 'देवरा १' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच, या चित्रपटात मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्याी मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनापुर्वीच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलं होतं. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या गाण्यातील त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण तुम्हाला माहित आहे काचित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य

Read More