Enter your Email Address to subscribe to our newsletters
ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही अन् काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांवर केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read More
ठाणे : ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या ठाकरे गटाच्या केदार दिघे ( Kedar Dighe ) यांच्यासह आठ जणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरीच्या अष्टविनायक चौकात पकडलेल्या वाहनात विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळल्याचे तक्रारीत नमुद आहे. दरम्यान, गाडीच्या तपासणीत काहीही आढळले नसताना जाणीवपूर्वक आपले नाव या प्रकरणात गोवल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे.
Uddhav Thackeray राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम आहे. अशातच एकाबाजूला युती, आघाडी हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी बेताल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांनाही माहितीये की माझे हिंदुत्व वेगळे आहे आणि भाजपचे हिदुत्व वेगळे आहे. उद्धव ठाकरे यांच्या या बेताल वक्तव्याने आपले राजकीय अस्तित्व रसातळाला घालवले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
ज्या पध्दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे म्हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्द आदित्य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत, असे गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीचा घाट घातला गेला. जिल्ह्यातील विविध जागांसाठी ६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये सर्वाधिक ११ इच्छुकांनी नाशिक मध्यची जागा मिळण्यासाठी मुलाखत देत, आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न केला.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. रवींद्र वायकर आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा जबर धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी एसीबीने धाड टाकली आहे. राजन साळवी यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी एसीबीने त्यांच्या घरी धाड टाकली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
संगाशी संग प्राणाशी गाठ’ ही म्हण उद्धव ठाकरेंना अगदी तंतोतंत लागू पडते. दुर्जनांच्या सान्निध्यात राहिले तर नुकसान होतेच, प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो, असा या म्हणीचा गर्भितार्थ. काँग्रेस आणि शरद पवारांसारखे अनैसर्गिक मित्र जोडून ठाकरेंनी असंगाशी संग केला आणि राजकीय विजनवासच पदरात पाडून घेतला. असो. परवा ’वरळी डोम’मध्ये भरलेल्या या जनतेच्या न्यायालयात उपस्थित कोण होते? तर यांचेच चेलेचपाटे.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ही धाड पडली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि इतर चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याशिवाय रवींद्र वायकर यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी मंगळवारी सकाळीच ईडीची धाड पडली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. 'कर नाही त्याला डर कशाला' असे ते म्हणाले आहेत. तसेच आमचं सरकार कुठलाही राजकीय आकस ठेवून काम करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभा मगर य़ांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती बरी नसल्यामुळे काही दिवसांपुर्वीच त्यांना उपचारासाठी नाशिकच्या सुधर्म रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा हिरावाडीतील रेशीमबंध मंगल कार्यालयातून निघेल व पंचवटीतील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी सुरु असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात येत आहे. २१ जूनच्या आमदारांच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपवरून शिंदे गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत आहेत.
अयोध्येत राममंदिर २०२४ साली पूर्णत्वास येणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून येत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असतं. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर घडलेल्या घटनेवरही निषेध व्यक्त केला आहे.
भाजपने रामभक्तांना अयोध्यावारीच्या दिलेल्या आश्वासनावरुन ठाकरे बंधूंना पोटशूळ उठणे म्हणा साहजिकच. या अयोध्यावारीचा राजकीय लाभ भाजपला होईल, हीच ठाकरेंची खरी पोटदुखी. पण, स्वत:ला सच्चे हिंदुत्ववादी म्हणविणार्या ठाकरे बंधूंनीही राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून, रामभक्तांच्या अयोध्यावारीसाठी पुढाकार घेतला, तर रामभक्तांचे आशीर्वाद त्यांनाही लाभतीलच!
तत्कालीन ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल १८ हजार ६७५ कोटींचा 'क्रेडिट नोट' घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी गुरुवारी केला. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना सोमैया म्हणाले, तत्कालीन ठाकरे सरकार आणि मुंबई पालिकेने ३५ हजार प्रकल्प बधितांच्या पुनर्वसनासाठी दोन विकासकांना कंत्राट देण्याची प्रक्रिया २०२१ मध्ये सुरू केली. मार्च २०२२ मध्ये चोरडिया आणि बलवा बिल्डर्सना अशी चार कंत्राटे देण्यात आली. शिवाय, जुहू आणि मालाडच्या दोन करारां
“मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही. नरेश मस्के आणि कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की त्यांना वापस जावं लागलं. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे.
मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेचा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मुंब्र्यातील शाखेवरुन उबाठा गट शिवसेनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची तपासणी करुन उबाठा गट न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. त्या चौकटीतच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला प्रथमदर्शी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पुरावे पाहण्याची गरज नाही,” असा युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. अपात्रतेसंबंधी सुनावणीच्या वेळी करण्यात आलेल्या या युक्तीवादामुळे नार्वेकर संतप्त झाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की, स्वत: निर्णय घ्यायचा, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. ठाकर
उद्धव ठाकरे यांच्या गटाला एकामागोमाग एक धक्के बसतच असून न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळत नसतानाच मीनाताई कांबळी यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मीनाताई कांबळी या रश्मी ठाकरे यांचा उजवा हात समजल्या जात होत्या. त्या रश्मी ठाकरे यांच्या दौर्याचे नियोजन करायच्या.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुंबईच्या शिवाजीपार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या नक्की कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर या प्रश्नाचा निकाला लागला असून ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.
घाटकोपर परिसरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या गुजराती भाषेच्या पोस्टर्स फाडण्याचे कृत्य उबाठा गटाने केले आहे. पण आता या कृत्यामुळे उबाठा गट चांगलाच अडचणीत आला आहे. लोकांनी उबाठा गटाची गुजराती लोकांबद्दल आणि भाषेबद्दल असणाऱ्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केली आहे.
शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद असो की, राष्ट्रवादीतील काका-पुतण्याचा. कोर्टातील कोणत्याही सत्तासंघर्षाच्या लढाईत एका प्रकरणाचा वारंवार उल्लेख होतो. ते म्हणजे, नबाम राबिया प्रकरण. त्यामुळेच सर्वांनाच उत्सुकता लागून असते की नेमकं हे नबाम राबिया प्रकरण आहे तरी काय? तेच आपण या लेखातून जाणून घेऊ.
यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणी करणारे ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही मुंबई महानगरपालिकेला अर्ज दिले होते. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात कुणाची तोफ धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आपला अर्ज मागे घेणार, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला, असे बोलले जात होते.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. यातच आता शिंदे गटाकडून महिला आरक्षणाच्या वेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस दिली असल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाकडून महिला आरक्षणाच्या वेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्ये शिंदे गटाची पाटी कोरी राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना , ठाकरे गट , Shiv Sena, Thackeray Groupच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही दि. १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची अखेर सुनावणी पार पडली असून झालेल्या या पहिल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचे आमदार स्वतः हजर होते. यावेळी शिवसेना आमदारांनी केलेल्या मागणीनंतर आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी अवधी मिळाला आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे, ऐन उत्सवात ठाकरे गटाला दहीहंडीची परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाचे लालबाग परिसरातील माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना भारतमाता परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास भोईवाडा पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली असून यामुळे लालबाग परिसरातील उत्सवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची गळती अद्याप सुरूच आहे. यानंतर आता पंढरपूरमधील ठाकरे गटाचे जवळपास ३०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाने आज मोर्चा काढला आहे. केईएम रुग्णालयाच्या कारभाराविरोधात रुग्णालयाबाहेर हा मोर्चा काढण्यात आला आहे. रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असल्याचा ठाकरे गटाने आरोप केला आहे. परळच्या शाखेपासून ते केईएम रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आमदार अपात्रेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांपासून सुनावणी सुरु होणार आहे. दररोज एक सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. दोन्ही गटांनी आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिनसेना पक्ष मानलं. आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल. निवडणूक आयोगाच्या याचं निर्णयाविरोधात उबाठा गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीक घडामोडींना वेग आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उबाठा गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नीलम गोऱ्हे या ठाकरे परिवाराच्या अतिशय विश्वासू समजल्या जातात.
पहिल्याच पावसात मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केला. ‘जिकडे नाले तुंबतील, तेथील अधिकार्यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर कारवाई करू’ आणि जिथे नाले तुंबणार नाही, त्या अधिकार्यांचा सत्कार करू, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, ‘तक्रार काय करता पहिल्या पावसाचे स्वागत करा,’ असेही ते म्हणाले. त्यावर ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख मात्र चांगलेच संतापले.
महाराष्ट्रात तोडफोडीचे राजकारण करून निवडणुकीनंतर जमवलेल्या आमदारांच्या आधारे उद्धव ठाकरे अपघाताने सत्तेत आले आणि तशाच प्रकारे सत्तेतून हद्दपारही झाले. नव्याने कारभारी झालेल्या फडणवीस-शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठाकरे गट न्यायालयात गेला आणि १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी याचिकेद्वारे केली. आज त्यावर सर्वोच्च न्यायालयात निकाल अपेक्षित आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा राजकीय धक्का बसला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अमेय घोले समजले जातात. त्यामुळे ठाकरे गटाला वडाळा विधानसभेत आणखी एक धक्का बसला.
मुंबई : शिवसेना ठाकरे गट प्रमुख उध्दव ठाकरे उद्या मुंबईत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दादरच्या शारदाश्रम शाळेत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्याचा ठाकरे गटाचा मेळावा हा विशेषकरुन कोकणवासीयांसाठी असणार आहे. यात मुंबई, ठाणे, विरार या शहरातले शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची चिन्हे आहेत. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते उपस्थित असणार आहेत.
राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेचं भूजबळ यांनी देखील समर्थन केलं आहे. आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यासारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत १४ राजकीय पक्षांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी दि. ५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
आदित्य ठाकरे : माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात अनधिकृत प्रकार समोर आला आहे. वरळीच्या लोअर परेल भागातील एक मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अनधिकृतपणे दारुसाची सरेआम विक्री होत झाल्याचा दावा स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांनी केला आहे. तसेच याबाबतचा एक व्हिडीओ देखील भाजपचे पदाधिकारी दीपक सावंत यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. यापूर्वीही मुंबईत अनधिकृत दारू विक्री, कोरोनाकाळात आयोजित करण्यात आलेला बांद्रा ख्रिसमस फेस्टिवल आणि वरळीतील पबम
चंद्रशेखर बावनकुळे : भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. तथापि, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी असो वा इतर त्या पक्षाला फोडण्याची गरज नसून ते त्यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे स्वतःहून राजकीयदृष्ट्या बुडतील,' अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच, आगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश झालेले दिसतील, असे सूचक विधानही त्या
जयदत्त क्षीरसागर : आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी आणि अखेरीस शिवसेना असा प्रवास करून शिवसेनेत स्थिरस्थावर झालेले मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीडच्या स्थानिक शिवसेनेतील ठाकरे गटाच्या नेत्यांनी याबाबत शनिवारी संकेत देत क्षीरसागरांचा ठाकरे गटाच्या सेनेशी काहीही संबंध राहिलेला नसल्याचे म्हटले आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे ग
मराठमोळा दीपोत्सव : मुंबईत साजऱ्या होत असलेल्या दिवाळीच्या अनुषंगाने मुंबई भाजपकडून विविध कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपने आयोजित केलेल्या 'आपला मराठमोळा दीपोत्सव' कार्यक्रमावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे वरळीतील दुसरे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. तर ठाकरे गटाच्या आरोपांना भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा दावा खोडून का
ऋतुजा लटके : कायदेशीर बाबींचा अभ्यास न करता लटकेंना उमेदवारी जाहीर करून त्यांना लटकवण्याचा डाव कुणी रचला ? हा सवाल विचारला जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे : 'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. आता शिवसेनेतील चिन्हाच्या वादानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती मशाल पंजाच्या हातात असून त्यावर पंजाची पकड आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही,' अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर केली आहे.
शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा जाहीर मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे ऐवजी ठाकरे गटातील नेते - उपनेते उपस्थित राहणार असुन हा मेळावा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यासह नागरीकांसाठीही असणार आहे.अशी माहिती प्रवक्ते चिंतामणी कारखानिस यांनी दिली.