शांघाय सहकार्य संस्थेच्या सदस्य देशांना एकत्र केले, तर भौगोलिकदृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने तो जगातील सगळ्यात मोठा गट ठरेल. सुरक्षाविषयक सहकार्याच्या उद्देशाने रशिया, चीन, कझाकस्तान, किरगिझस्तान आणि ताजिकिस्तान यांनी शांघाय पाच या गटाची स्थापना केली. २१व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचे अधिक व्यापक संस्थेत रुपांतर झाले, त्याविषयी घेतलेला आढावा...
Read More
“भारतातील लोकशाहीचा वारसा सुमारे 2500 वर्षांचा आहे. त्यामुळे लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाहीमध्ये काय करावे, याविषयी भारताला कोणीही शिकवू नये,” असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) काबुल एयरपोर्टवर झालेल्या बॉम्ब हल्ल्या प्रकरणी आपली भूमिका जाहीर केली आहे. याबद्दल जाहीर केलेल्या एका परिपत्रकातून तालीबानचे नाव हटविण्यात आले आहे. ज्यावेळी काबूलवर तालीबानने कब्जा केला त्यानंतर आता युएनची भूमिका बदलत आहे. यापूर्वी केलेले विधान आणि आत्ताचे विधान यात तफावत आढळल्याने युएनच्या भूमिकेवरच आता साशंकता व्यक्त केली जात आहे.
भारताला नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यामुळे भारताचे शेजारी असलेल्या चीन आणि पाकिस्तानने मात्र आपल्या अकलेचे तारे तोडत वाचाळवीरता करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही देशांनी मागील दिवसांत आपल्या कथनानी भारताच्या या निवडीबद्दल पोटशूळ उठल्याचे वारंवार सिद्ध केले आहे.
येत्या १५ ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यापूर्वीच, भारताची ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’च्या ऑगस्ट महिन्यासाठी अध्यक्षपदी झालेली निवड पंतप्रधान मोदींच्या यशस्वी विदेशनीतीची द्योतकच म्हणावी लागेल. शिवाय, अफगाणिस्तानमधील वाढत्या तालिबानी प्राबल्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे.
पाकिस्तान सरकारने, देशातील दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांची कथित वाईट आर्थिक स्थिती पाहता, बँक खात्यांतून पैसे काढण्याची परवानगी द्यावी, अशा विनंती केली होती. पाकिस्तानी माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, हाफिज सईदसह चार अन्य दहशतवाद्यांची बँक खाती आता सुरु करण्यात आली आहेत.
भारत १५ सामर्थ्यवान देशांच्या परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारेल.
जम्मू-काश्मीरच्या नावावर फक्त पैसे खाणार्यांचा, फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार्यांचा, पाकिस्तानशी संधानबांधणार्यांचा हा भारत नाही, तर समस्येच्या मुळाशी हात घालणारा, घाव घालणारा हा भारत आहे. परंतु, हा भारत जसा पाकिस्तानला नकोय तसाच काँग्रेसलाही नकोय. म्हणूनच तर दोघेही समदुःखी एकाच सुरात गळे काढताना दिसतात!
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव