( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
Read More
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या गुजराती विभागाला १ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १२ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा पुरस्कार देण्यात आला.
भाजप आपल्या संघटनेत कार्यकर्त्यांमधून नेतृत्व तयार करते, आणि काँग्रेस नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवते! मग पक्षाच्या अधोगतीला जबाबदार कोण? भाजप की राहुल गांधी? खरं तर, हा प्रश्न आता काँग्रेसच्या उरलेल्या निष्ठावंतांनी स्वतःला विचारायला हवा. राहुल गांधी यांची एकूणच नेतृत्वशैली बघता, काँग्रेसचा भविष्यकाळही अंधारातच जाणार, हे निश्चित! why rahul gandhi says congress leaders working for bjp ?
Ramdan गुजरात राज्यातील द्वारका येथे खंभालियात २ मार्च रोजी श्रीनाथ हवेली मंदिराच्या प्रांगणात फटाखे फोडण्यात आले. यामुळे काही कट्टरपंथींनी हिंदूंवर हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. मकसूद, तौसीफ, मोईन आणि फूलकंद अशी हल्लेखोरांची नावे आहेत. हल्लेखोरांनी रमजान सुरू असताना फटाके फोडल्याने हल्ला केला असल्याचे कारण सांगितले. यावेळी आरोपींनी संबंधित हिंदू कुटुंबावर हल्ला केला. यामुळे इतर दोन अल्पवयीन मुलं जखमी झाली आहेत.
मुंबई-अहमदाबाद शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरात मध्ये पाचव्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गुजरात दौऱ्यावर
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार आहे. यंदा बडोदा, बंगळुरू, लखनऊ आणि मुंबई या ४ शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.
Gautam Adani यांचा धाकटा लेक जीत ७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये दिवा शाहसोबत विवाह करणार आहे. यापूर्वी जीत अदानी यांनी मंगल सेवा करणार असल्याची शपथ घेतली आहे. अदानी समूहाच्या अध्यक्षांनी एक ट्विट करत संबंधित प्रकरणाची माहिती शेअर केली आहे.
Imran Pratapgadi काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने प्रतापगडी यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवल्यानंतर इम्रानने एका कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर जामनगर पोलिसांनी इम्रान प्रतापगडी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-४८ वर २१० मीटर लांबीचा चौथा पूल बांधण्यात आला आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील दाभान गावात राष्ट्रीय महामार्ग-४८ (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी डिझाइन केलेला २१० मीटर लांबीचा PSC (प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट) पूल दि.९ जानेवारी २०२५रोजी पूर्ण झाला.
अभिनेता विक्रात मेस्सी याची प्रमुख भूमिका असणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. शोभा कपूर, एकता आर. कपूर, अमूल व्ही. मोहन आणि अंशुल मोहा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ZEE5ने 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे.
Helicopter accident Gujrat भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर येथे कोसळले असल्याची घटना दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ५ जानेवारी २०२५ रोजी घडली. या अपघातामध्ये एकूण ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. १०३ किलोमीटर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूंना २,०६,००० नॉईज बॅरियर्स (आवाज प्रतिबंधक) बसविण्यात आले आहेत. प्रत्येकी १ किलोमीटर अंतरासाठी, व्हायाडक्टच्या प्रत्येक बाजूस २,००० नॉईज बॅरियर्स धोरणात्मकदृष्ट्या बसविण्यात आले आहेत.
गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये २००२ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट पंतप्रधानांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पाहिला असून चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विक
1970 साली भारतात पहिली मेट्रो कोलकाता येथे धावली. आज मे 2024 सालच्या आकडेवारीनुसार भारतात तब्बल 902 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आहे. जे भारताला मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत जागतिक पातळीवर पहिल्या पाच देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करणारे आहे. आज जलदगतीने भारतातील मेट्राचा विस्तार पाहता, भारत भविष्यात जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असणारा देश ठरेल. त्यानिमित्ताने भारतातील जलदगतीने विस्तारणार्या मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा धावता आढावा घेणारा हा लेख...
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या या दोन्ही राज्यात प्रगतीपथावर आहे. अशावेळी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील आणंद जिल्ह्यात माही नदीच्या साईटवर कामादरम्यान काँक्रीट ब्लॉक पडण्याची दुर्घटना घडली. मात्र या दुर्घटनेनंतर काँग्रेस पक्षाने आपल्या सोशलमिडीया हॅण्डलवरून चुकीची माहिती पसरविली. अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्या काँग्रेसला एनएचआरसीएलने तात्काळ प्रतिसाद देत खडे बोल सुनावले.
"भारताच्या विकासामुळे आता काही जणांना अडचण निर्माण झाली आहे. केवळ राजकारणासाठी आणि स्व:ताचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काही लोक देशाच्या एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत"असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात आपल्याला आता लढायचे आहे असा संदेश मोदींनी दिला. राष्ट्रीय एकत्मता दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी गुजरात मधल्या केवाडीया येथे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर जोर देत भारताच्या या गुणविशेषांचा गौरव केला. भारत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला वंदन पंतप्रधान मोदी यांनी वंदन केले. त्याच बरोबर, भारत देश एक देश एक निवडणूक या संकल्पनेकडे वाटचाल करीत आहे जेणेकरून, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेता येतील.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमावेत गुजरात मध्ये ते विविध प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. या दरम्यान, त्यांनी वडोदरा येथील टाटा एरक्राफ्ट कॉम्पलेक्सचे उद्धाटन देखील केले.
National flag contempt गुजरात येथील अहमदाबाद येथील दानिलिमडा येथे शुक्रवारी ४ ऑक्टोबर काही कट्टरपंथी समाजातील दोन अल्पवयीन मुलांना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी त्याला राष्ट्रध्वजाच्या कापडाचा पतंग घेऊन जाताना पकडले. पोलिसांनी या दोघांविरूद्ध एफआरआय दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील सुरत येथे ‘जल संचय जन भागीदारी’ उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमांतर्गत पावसाच्या पाण्याचा संचय वाढविण्यासाठी आणि दीर्घकाळ पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात अंदाजे २४,८०० रेनवॉटर हार्वेस्टिंग, अर्थात पावसाचे पाणी साठवणाऱ्या संरचना बांधल्या जाणार आहेत.
गुजरातच्या पोरबंदर तटावर भारतीय तटरक्षक दलाचे अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर (ध्रुव) अरबी समुद्रात कोसळले.
Gujarat Rain Update गुजरात राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. या अतिवृष्टीमुळे एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १८ जिल्हे हे जलमय झाले असून राज्याला मोठा हदरा बसला आहे. कच्छ, द्वारका, जामनगर, राजकोट ते वडोदरा पाण्यामध्ये बुडाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी थाटामाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्याला हिंदीसह दाक्षिणात्य कलाकारांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच, अनंत-राधिकाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींपासून जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईत शाही विवाह झाल्यानंतर आता नवं जोडपं जामनगरमध्ये पोहोचलं आहे. राधिकाचं गुजरातमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. याच यादीत २००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ की,... हे शब्द ऐकण्यासाठी, ’रालोआ’चे कार्यकर्ते झटत होते. या सर्वांची स्वप्नपूर्ती दि. ९ जूनच्या संध्याकाळी झाली. मोदींच्या तिसर्या कार्यकाळात पंतप्रधानाव्यतिरिक्त ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात योग्य समतोल साधत अनोखा मिलाप साधला आहे. खर्या अर्थाने हे मंत्रिमंडळ ’सबका साथ सबका विकास’ या तत्त्वाचं पालन करणारे आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणुकीची अर्धी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एनडीए ३०० चा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे. लोकसभा निवडणूक २०२४
गुजरातमधून मुंबईच्या दिशेला येणारी एक रेल्वे रुळावरून घसरली आहे. ही घटना दि. २८ मे २०२४ रोजी दुपारी घडली. मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ही मालवाहतूक रेल्वे पालघर स्थानकादरम्यान घडली. त्यामुळे बोईसरकडून विरार- चर्चगेटकडे येणाऱ्या लोकलवर ही याचा परिणाम झाला. तरी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वेचे डब्बे जे रुळावरून घसरले होते त्यांना उचलण्याचे काम करण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्याच्या एकूण लांबीपैकी १६ किलोमीटरचे खोदकाम तीन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) द्वारे केले जाणार आहे, तर उर्वरित ५ किलोमीटरचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती (एनएटीएम) वापरून केले जाणार आहे.
मिल्क सिटी ऑफ इंडिया म्हणून परिचित असणारे गुजरात राज्यातील आणंद शहर आता आगामी काळात बुलेट ट्रेनमुळेही प्रसिद्धीस येणार आहे. मिल्क सिटी अशी ओळख असणारे आणंद शहर बुलेट ट्रेन स्थानकाचे अंतरंग आणि बाह्यरंग दुधाच्या थेंबांचे द्रवरूप स्वरूप, आकार आणि रंगाची प्रतिकृती असेल.
भाजप खासदार मनेका गांधी यांनी अमूलवर गंभीर आरोप केले असून, ते अमूलने फेटाळून लावले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, एका मुलाखतीदरम्यान मनेका गांधी म्हणतात की, अमूल शेतकऱ्यांना मदत करते यावर मी सहमत नाही. अमूल फक्त गायींचे पालनपोषण करत नाही तर त्यांची विक्री आणि त्यांना मारण्यात मदत करते. त्यामुळे अमूलवर अनेक गाईंच्या हत्येचा आरोप असल्याचे ही त्या म्हणाल्या. गांधी म्हणाल्या की, जैन समाजाची सर्वाधिक लोकसंख्या गुजरातमध्ये आहे, अमूलही गुजरातमध्ये आहे आणि सर्वाधिक गोहत्याही गुजरातमध्ये होतात.
गुजरातमधील एक अब्जाधीश उद्योजक आणि त्यांच्या पत्नीने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन जैन भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश भंडारी असे त्यांचे नाव असून त्यांच्याकडे जवळपास २०० कोटींची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरात विद्यापीठात झालेल्या गोंधळाविषयी अफवा पसरवणाऱ्या मोहम्मद जुबेर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद जुबेरवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे. वकील चांदनी प्रीती विजयकुमार शाह यांनी सायबर विभागात ही तक्रार दाखल केली आहे. झुबेर जातीय तेढ भडकवण्यात गुंतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ऐन तारुण्यात संधिवातासारख्या दुर्धर आजाराचे निदान झाले तरी न खचता, स्वतःच्या हिमतीवर ‘मोत्यांची शेती’ करणार्या पूजा भानुशाली यांची ही यशोगाथा...
गुजरातमधील वडोदरामधील अजवा रोडवर असलेल्या एकतानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली म्हणून कट्टरपंथी जमावाने विरोध केला. त्यानंतर मंदिर परिसरात दगडफेक केली. या दगडफेकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यापैकी 2 प्रकल्प गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये आहे. भारत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत असून सेमीकंडक्टर चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन, द्वारकानगरी जिथे पाण्याखाली गेली होती, त्या ठिकाणी प्रार्थना केली. समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या द्वारकानगरीला पंतप्रधानांनी यावेळी आदरांजली वाहिली. त्यानिमित्ताने श्रीकृष्णाने उभारलेल्या द्वारकानगरीचे महत्त्व आणि त्यावरील शोधांचा आढावा घेणारा हा लेख...
सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाआधीचे महत्वपुर्ण विधी अर्थात प्री-वेडिंग कार्यक्रम नुकतेच १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये संपन्न झाले.यावेळी संपुर्ण चंदेरी दुनियेतील कलाकार जामनगरमध्ये अवतरले होते. अगदी अमिताभ बच्चन पासून ते सलमान खान पर्यंत सर्वच दिग्गज कलाकार मंडळींनी आवर्जून या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांचा आनंद द्विगुणित
आजपासून अदानी समुहाकडून गुजरातमधील अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी व अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी लिमिटेड या दोन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू होणार आहे. गुजरात मधील खवडा येथील प्रकल्पाचा लवकरच श्रीगणेशा होत कामकाज प्रकियेत येणार असल्याचे कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये मी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने १०० रुपये किमतीचे घडयाळ चोरले. त्यानंतर मदरशाचे मौलाना सय्यद उमर अली यांनी चोरीच्या आरोपीमुळे विद्यार्थ्याला 'क्रूर शिक्षा' देण्याचा निर्णय घेतला. १६ वर्षीय़ मुलाला अर्धनग्न करून त्याच्या सहकारी मित्रांना त्यांच्यावर थुंकायला लावले. एवढेच नाही तर त्याला बेदम मारहाणही केली.पीडित विद्यार्थी हा गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद भागातील जामिया बुरहानुल उलूम मदरशात दाखल करण्यात आले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहित
सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात लग्नसराईची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली आहे.Anant Ambani Radhika Merchant हिच्यासोबत १२ जुलै रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. पण त्यापुर्वी गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे आयोजन १ ते ३ मार्च मध्ये करण्यात आले आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत हजारोंच्या संख्येने पाहूणे मंडळी येणार आहेत.
गुजरातमध्ये हिंदूंच्या विरोधात विष पसरवणाऱ्या मुफ्ती सलमान अझरी यांना असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला आहे. दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे झालेल्या एका सभेत जलील यांनी मुफ्ती अझरी यांच्या भाषणाने संतप्त झालेले लोक स्वतःला 'कुत्रे' का समजतात, असा सवाल केला. 'आज कुत्तों का वक्त है, कल हमारा दौर आएगा' ह्या अझरी यांच्या विधानाला त्यांनी केवळ एक शेर असल्याचे सांगितले.
गुजरातमध्ये आतापर्यंत १०८ बेकायदेशीर मजारी जमीनदोस्त केल्या आहेत. अशी माहिती गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. त्यांनी या मजारी कट रचून बांधण्यात आल्या होत्या, असा आरोप देखील केला. ते म्हणाले की, " कट रचून बांधलेली प्रत्येक इमारत पाडण्यासाठी आमचा बुलडोझर तयार आहे."
गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने लव्ह जिहाद प्रकरणी मुलगा आणि वडिलांना शिक्षा जाहीर केली आहे. हिंदू असल्याची बतावणी करून जनजाती समुहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या इम्तियाजला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याचे वडील शब्बीर यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना दंडही ठोठावला आहे. याआधीही इम्तियाजने एका हिंदू मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा (२२ व २३ फेब्रुवारी) उत्तर प्रदेश आणि गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी दोन्ही राज्यांमध्ये अनुक्रमे ४८ हजार आणि १३ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी करणार आहेत.पंतप्रधान आज अहमदाबाद येथे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी महेसाणा येथे वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रु
वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजहरीविरुद्ध हा गुन्हा अरावली जिल्ह्यातील मोडासा टाउन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अजहरीने मोडासा येथे सभा घेतली होती. त्यात त्यांनी भडकाऊ भाषण केले होते.
हिंदू धर्माविरोध वादग्रस्त वक्तव्य करणारे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. अझहरीवर भाषणातून द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. एटीएसने अझहरीला मुंबईतील घाटकोपर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलानाविरुद्ध कलम १५३ (ए), ५०५ यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या वास्तवदर्शी चित्रपटांना प्रेक्षक मोठा प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळेच देशात घडलेल्या सत्य घटना आजच्या प्रेक्षकांसमोर आल्या पाहिजे असा अट्टहास अनेक दिग्दर्शकांनी करत सत्य घटनांवर आधारित चित्रपट केले जातात. याच यादीत गुजरातमध्ये २००२ साली घडलेल्या ‘गोधरा’ हत्याकांडावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार ‘गोधरा’ हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मनाचे काळीज पिळवटून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित झाला.
'साहेबगंजचा रावण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गुन्हेगाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे खरे नाव राम नरेश साहनी आहे. त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. राम नरेश सहानी हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता. तो सध्या ५० हून अधिक चोरट्यांची टोळी चालवत आहे.