Enter your Email Address to subscribe to our newsletters
कुख्यात गुंड व माफिया मुख्तार अन्सारीचा बांदा येथील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होता. त्याच्या मृत्युनंतर अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, कुख्यात गुंड अन्सारीचा संबंध आता ज्ञानवापी प्रकरणाशी असल्याचे समोर आले आहे. दै. भास्करने एका भाजप नेत्याच्या हवाल्यानुसार अहवालात म्हटले की, मुख्तार अन्सारी ज्ञानवापीला देणगी देत असे आणि त्या पैशातून खटले लढवले जात होते, असा दावा करण्यात आला आहे.
Read More
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी ३१ जानेवारीला एतिहासिक निर्णय देत ज्ञानवापी परिसरातील व्यासजी का तेहखाना ( तळघर ) या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवसांत तळघरात पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे तळघर ज्ञानवापी परीसरात असलेल्या मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता तेथे नियमित पुजा विधी होणार आहेत
ज्ञानवापी संकुलातील कथित वजुखान्यात असलेल्या शिवलिंगाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्यात यावे, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती हिंदू पक्षाचे वकील विष्णूशंकर जैन यांनी दिली आहे.
हिंदू पक्षकारांच्या माणीनुसार, ज्ञानवापीतील वजूखाना स्वच्छ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी दिले आहेत. याच जागेवर हिंदू धर्मीयांचे आस्था असलेले शिवलिंग सापडल्याचा दावा पक्षकारांनी केला हता. दि. १६ मे २०२२ रोजी न्यायालयाच्या सर्वेक्षणात हे शिवलिंग येथे आढळले होते. त्यानंतर लगेचच हा परिसर बंद करण्यात आला होता.
अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या दिवशी रामजन्मभूमी स्थीत राममंदीरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने आज तक या वृत्तवाहीनीशी बोलताना योगगुरू बाबा रामदेव यांनी अयोध्येत न्यायालयाचा निर्णय आला आहे, परंतु आता मुस्लिमांनी काशी विश्वनाथ आणि मथुरा जन्मभूमीचा वाद स्वेच्छेने संपवण्याचा विचार केला पाहिजे. अस म्हटल आहे.
‘ज्ञानवापी’साठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा नुकताच धर्मांधांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत चुकीचा निर्णय दिला, असे म्हणत देशातील न्यायव्यवस्थेवरही यांचा विश्वास नाही, हेच या धर्मांधांनी पुनश्च सिद्ध केले आहे.
वादग्रस्त विधानांसाठी कुप्रसिद्ध मौलाना तौकीर रजा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. तौकीर रजा यांनी ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची घोषणा केली आहे. मथुरा आणि काशीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, कोणी कितीही सर्वेक्षण केले तरी मी आता कोणतीही मशीद देण्यास तयार नाही. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अप्रामाणिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तौकीर यांनी दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी दिल्लीत हे विधान केले.
ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीक्षमतेस (मेटेनिबिलिटी) आव्हान देणाऱ्या मुस्लिम पक्षान दाखल केलेल्या सर्वच्यासर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्याचप्रमाणे हा खटला सहा महिन्यात निकाली काढण्याचेही निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळून लावली. मुस्लिम पक्षकारांने बाजूच्या वतीने ज्ञानवापी प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाऐवजी अन्य उच्च न्यायालयाकडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुस्लिम पक्षकारांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
ज्ञानवापी कॅम्पसच्या एएसआय सर्वेक्षणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या निर्णयानंतर आता ज्ञानवापी कॅम्पसचे एएसआय सर्वेक्षण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतीच एएसआयच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली होती.
ज्ञानवापीमध्ये काय आहे, हे जगजाहिर आहे. मात्र, मुस्लिमांनी ऐतिहासिक चूक न सुधारता ज्ञानवापीस ‘मशिद’ संबोधले; तर वाद होणारच असे रोखठोक प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) या वृत्तसंस्थेस मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी – काशी विश्वनाथ प्रकरणी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली.
“औरंगजेब क्रूर नव्हता. त्याने ज्ञानव्यापी मंदिर उद्ध्वस्त केले नाही,” असा अजब दावा संबंधित मशीद कमिटीने केला आहे. आता ही मशिद समिती इतिहासकार आहे की समाजअभ्यासकी किंवा कायदेतज्ज्ञ की पुरातत्व विभागाशी संबंधित आहे? तर नाही. तरीसुद्धा ते ‘औरंगजेब हा क्रूर नव्हता’ हे सर्टिफिकेट का देत आहेत? आता काही लोक म्हणतात की, औरंगजेब क्रूर नव्हता. हे म्हणणार्यांचे पूर्वज तपासायला हवेत.
नवी दिल्ली : वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मंगळवारी ज्ञानवापी वादाशी संबंधित आठ खटल्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरण पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलामधील मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी आहे का, याची शास्त्रोक्त तपासणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुस्लिम पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा उल्लेख सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर मुस्लिम पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी केला
पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईद-उल-फित्रच्या आधी शुक्रवारी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलात येथे वजू करण्यास परवानगी दिली आहे.
ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणात आढळलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्यात यावी, असा विनंती अर्ज हिंदू पक्षाकडून वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरण पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
हिंदूंनी आताशी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणी सुरू केली आहे, श्रृंगारगौरीचे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचा निकाल आला आहे. यापुढे हिंदू आपल्या आराध्य दैवतांच्या मुस्लिमांच्या कब्जातील इतरही मंदिरांना परत मिळवण्याचा लढा सुरूच ठेवणार आहे. त्या प्रत्येकवेळी धर्मांध मुस्लिमांसह तथाकथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, उदारमतवाद्यांना आणखी रडण्याची संधी मिळणारच आहे, त्यांनी त्यासाठीही अश्रू जपून ठेवावेत.
ज्ञानवापी-काशिविश्वनाथ परिसर परकीय मुस्लीम आक्रमकांनी वेळोवेळी उद्ध्वस्त केला. मात्र, लढवय्या हिंदू समाजाने वेळोवेळी काशिविश्वनाथाचे मंदिर पुन्हा उभारले. राजा तोडरमल ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा देदीप्यमान वारसा हिंदू समाजास लाभला आहे. त्यामुळे आता ज्ञानवापी-काशिविश्वनाथासाठी हिंदू समाज दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा निर्णायक लढा देण्यास सज्ज झाला आहे.
'ज्ञानवापी प्रकरणापासून देशभरात मोठ्या प्रमाणात धार्मिक चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवलिंग - हिंदू मंदिर आणि देवदेवतांशी संबंधित विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून त्यातून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यातच युट्युबवरील एका चॅनलवर हिंदूंचे दैवत असलेल्या भगवान महादेव आणि शिवलिंग यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह टाकण्यात आला आहे.
नागपूर येथे तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी ज्ञानवापी प्रकरणावर बोलताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “ज्ञानवापीशी हिंदूंच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यावर न्यायालय देईल, तो निर्णय आपण प्रत्येकाने मान्य करायला हवा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ज्ञानवापी, शिवलिंग, देशातील मुस्लीम आणि मंदिर आंदोलन या सर्वच प्रकरणांवर परखड मत व्यक्त केले. गुरुवार, दि. २ जून रोजी नागपूरात सुरू असलेल्या संघाच्या तृतीय वर्षाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. "देवस्थळांवर जिथे हिंदूंची श्रद्धा जोडलेली आहे. त्यावर आपापसात सहमतीने निैकाल लागावा. तसे न झाल्यास प्रकरणे न्यायालयात जातात. मग त्यानंतर जो काही निकाल येईल तो सर्व पक्षांनी मान्य करायला हवा", असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
सरसंघचालकांचे संघशिक्षा वर्गासमोरचे भाषण ऐतिहासिक होते. संवादाचे कितीतरी मार्ग यातून खुले झाले आहेत. एका वेगळ्या पर्वाची नांदी ठरू शकेल, असे हे भाषण होते.
काशी विश्वनाथ – ज्ञानवापी प्रकरणाचा खटला दाखल करून घ्यायचा की नाही, याविषयी वाराणसी जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. याविषयी अद्याप मुस्लिम पक्षाचाच युक्तिवाद सुरू आहे
ज्ञानवापी मशीद प्रकरणानंतर हिंदूंना शिवसेनेसारख्या खोट्या, बेगडी हिंदुत्वनिष्ठांविरोधात संघर्षाचा निर्णय घ्यावा लागेल. कारण, शिवसेनेचे हिंदुत्व हिंदूंच्या न्याय, हक्कासाठी लढणारे नव्हे, तर हिंदूंच्या न्याय, हक्काचा गळा घोटणारे आहे. त्याचा दाखला औरंगजेब, अफझलखानाच्या कबर, मजारीला संरक्षण देण्यातून अन् ज्ञानवापी संघर्षाला वादग्रस्त ठरवण्यातून मिळाला आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी ढाचा, मथुरा येथील शाही ईदगाह यांसारख्या हिंदू मंदिरे पडून उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदू संघटनानांनी न्यायालयीन मार्गाने आवाज उठवला आहे
शरद पवार कधी पंतप्रधान होणार नव्हतेच अन् यापुढेही होणार नाहीत. पण, जर झालेच असते, तर औरंगजेबाचे भारताला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते कामाला लागले असते. तसे होऊ नये म्हणूनच नियतीने पवारांना कायम भावीच ठेवले.
प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. अयोध्या हे त्याचे पहिले पाऊल होते.
ज्ञानवापी प्रकरणाचा खटला सुनावणीसाठी दाखल करून घ्यायचा की नाही, (खटल्याची मेन्टेनिबीलिटी), याविषयी मुस्लीम पक्षाकडून गुरुवार, दि. २६ मेपासून वाराणसी जिल्हा न्यायालात युक्तिवादास प्रारंभ होणार आहे.
शहरात कधी काळी अस्तित्वात असलेली पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे आक्रमकांनी पाडून तेथे आज असलेल्या छोटा व बडा शेख सल्ला ही प्रार्थनास्थळे उभारली असल्याचा दावा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकार्याने केला.
काशिविश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणी प्रथम सर्वेक्षणावर मुस्लीम पक्षाचे आक्षेप मागवायचे की प्रार्थनास्थळ कायदा सदर प्रकरणास लागू होतो की नाही, हे तपासायचे; याविषयीचा निर्णय उद्या मंगळवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाद्वारे दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयात केली जाणार आहे. त्यानुसार, सोमवारी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयासमोर सुनावणीस प्रारंभ झाला.
ज्ञानवापी सर्वेक्षणावर दोन्ही पक्ष हरकती नोंदविणार
ज्ञानवापी ढाचाचे सर्वेक्षण सुरु असतानाच शिवलिंग सापडल्याची घटना समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी ढाच्यावर सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तूर्तास ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी २६ मेला करण्यात येणार आहे.
कायदे जर का खरोखरच जनमानसांच्या नैतिक संवेदनांचे मूर्त स्वरूप असतील, तर या बदल्यात काळाला सुसंगत बदलही त्यात करून घेतले पाहिजे. आज जे काही मागितले जात आहे, ते अत्यंत सनदशीर मार्गानेच मागितले जात आहे. मात्र, त्यांच्या भावनांची जर अशी बेअदबी केली गेली, तर कायद्यांवरचा विश्वास उडून जाईल!
२०१५ सालाच्या अहवालानंतर पुन्हा २०२१ साली अशाच एका बंद पडलेल्या वसतिगृहाच्या जागेत २१५ कबरी सापडल्या. ख्रिस्ती संस्कृती आणि धर्मप्रसारणासाठी वनवासी बालकांचा जीव घेण्यात आला, असे म्हणत सगळे जग हळहळले. दि. २१ मे ‘जागतिक सांस्कृतिक विविधता दिवसा’निमित्त तरी जगभरातले दहशतवादी, धर्मांतर मतांतर घडवून आणणारे धर्मांध माणसाला जगणे शिकवतो तो धर्म हे समजतील का? कॅनडातील वनवासींनी चर्चसंस्थेला माफी मागायला सांगितली आहे, चर्चसंस्था माफी मागेल का?
गेल्या जवळपास काही महिन्यांपासून ज्ञानवापीचे नाव चर्चेत आहे आणि नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे ते प्रामुख्याने पुढे आले. वाराणसीत असलेल्या मूळ काशिविश्वेश्वराची ही जागा, ती मुघल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली असे काहीसे हे प्रकरण. अर्थात, या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे, हे बर्याच मराठी लोकांना माहीत नसेल. म्हणूनच, एकंदरीतच ही ज्ञानवापीच्या वादाची गोष्ट काय आहे, ते थोडक्यात पाहू.
ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण न्यायालयात सादर करण्याची मुदत गुरुवारी संपत असून ते गुरुवारीच न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हिंदू पक्षाने आता दोन नव्या मागण्या केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालायने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे. परंतु जो पर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत वाराणसी सत्र न्यायालायाने याबाबत कोणतेही आदेश देऊ नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालायने दिला आहे
काशीतील ज्ञानवापी ढाच्याचा वाद पेटलेला असतानाच आता मथुरेतील मशिदीचा वादही ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. मथुरेतील कृष्णजन्मभूमीच्या जागी मशीद उभारली गेली आहे याविरोधातलं याचिका न्यायालयात दाखल केली गेली आहे. तब्बल ११ याचिका विविध न्यायालयात दाखल केली इल्या आहेत. हिंदू संघटनांकडून या जागी पूजेअर्चेसाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केली गेली आहे.
कारंजा असल्याचा मुस्लिम पक्षाचा दावाही पूर्णपणे फोल
काशी विश्वनाथाच्या देवळाला लागून असलेल्या वादग्रस्त ज्ञानवापी ढाच्याचा सर्वेक्षणात बाजूला असलेल्या विहिरीत शिवलिंग सापडले. याच सापडलेल्या शिवलिंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय
ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीत महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचा खोटेपणा उघड झाला आहे. मुस्लिम आक्रमकांच्या बाजूने सेवादलाने काही दावे केले होते पण हेच दावे खोटे आहेत हे उघड झाले आहे
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षाकडून हा दावा करण्यात आला असून मुस्लिम पक्षाकडून हा दावा नाकारण्यात आला आहे
अयोध्या राम मंदिराच्या निर्णयाबद्दल एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींचं हे भाषण ऐका.... हे महाशय म्हणतायत, एक मशिद तुम्ही आमच्यापासून हिसकावून घेतली तर दुसरी हिसकावू देणार नाही. लांगूलचालनाची आणि विशिष्ट समाजाच्या ध्रुवीकरणाची हद्द ओवेसींनी केव्हाच सोडली आहे. मात्र, ही नवी गरळ ओवेसींनी सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी ढाँच्याच्या निमित्ताने ओकली आहे
ज्ञानवापी परिसर काशी आणि श्रीकृष्ण जन्मभूमि मथुरेच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करणे बंद करावे. तिथले सर्वेक्षण हे न्यायालयाच्या निर्देशाद्वारे सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट प्रत्येकाने पहायला हवी. तसेच न्यायालय जो काही निर्णय देईल त्याचा स्वीकार केला पाहिजे
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या मशीद संकुलाच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
ज्ञानवापी मशिदी मध्ये सुरू करण्यात आलेले व्हिडिओ सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्यांना कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. हे सर्वेक्षण १७ मे पर्यंत पूर्ण करा असे आदेश वाराणसी कोर्टाने गुरुवारी दिले आहेत
मशिदीचे नाव ज्ञानवापी कसे, नंदीचे तोंड मंदिराकडे नव्हे, तर मशिदीकडे कसे? ही हिंदूंना जाचणारी प्रतीकेच नव्हे, तर काय आहेत? मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर आणि शाही ईदगाह मशिदीचा मुद्दाही असाच आहे. अनेक ऐतिहासिक पुराव्यांतून इथली मशीद मंदिर उद्ध्वस्त करून बांधल्याचे समोर आलेले आहे. हिंदूंनी त्या प्रतीकांचे जाच किती दिवस सहन करायचा?
येत्या दि. ८ मे रोजी जम्मू शहरात ‘जम्मू-काश्मीर पीपल्स फोरम’तर्फे ‘पुण्यभूमी स्मरणसभे’चे आयोजन करण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांना आपली मायभूमी सोडल्याने ज्या वेदना झाल्या, त्या एवढी वर्षे झाली तरी अजूनही ताज्या आहेत. अशा विस्थापित काश्मिरी जनतेशी संपर्क साधून त्या सर्वांना या पुण्यभूमी स्मरणसभेस निमंत्रित करण्यात येणार आहे
औरंगजेबाने काफिरांवरील इस्लामी सत्तेचे प्रतीक म्हणून १६६९ साली बांधलेल्या ‘ज्ञानवापी’ मशिदीच्या जाचातून हिंदूची मुक्तता होण्याचा सुवर्णक्षण निकट आल्याचे दिसते. कारण, नुकताच काशीतील दिवाणी न्यायालयाने ‘ज्ञानवापी’ मशीद परिसराचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्याचा निकाल दिला आणि ‘अयोध्या तो बस झाँकी हैं, काशी-मथुरा बाकी हैं’चे तमाम हिंदूंचे शेकडो वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पुढचे पाऊल पडले.
मुघल बादशाह औरंगजेबाने १६६४ साली विश्वनाथाचे मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती.