पंजाबमधील खदूर साहिब येथील खलिस्तान समर्थक खासदार अमृतपाल सिंह यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू होणार आहे. अशा परिस्थितीत आणखी एक वर्ष तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाही. अमृतपाल सिंह यांच्यावर आणखी एक वर्षांसाठी एनएसए लावण्याचा निर्णय पंजाब आपचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने घेतला आहे.
Read More
Khalistani Amritpal Singh हे लवकर राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. नुकतेच अमृतपाल सिंह यांना आसामच्या दिब्रुगड येथील तुरुगाच जेरबंद करण्यात आले. फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह यांच्यासोबत ते राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत. १४ जानेवारी रोजी त्यांनी एका मेळाव्यामध्ये पंथ बचाओ-पंजाब बचाओ परिषदेमध्ये राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली, असे खालसा यांनी शनिवारीच जाहीर केले आहे. पक्षाचे नाव हे शिरोमणी अकाली दल आनंदपूर साहिब असल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडमध्ये विशेषतः संथाल परगणामध्ये बांगलादेशी आणि बंगाली मुस्लिमांची दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, बंगालमध्येही बांगलादेशी घुसखोरांचा गंभीर प्रश्न आणि पंजाबमध्ये अमृतपाल सिंग या नवखलिस्तानी नेत्याचा उदय, या घटना देशातील फुटीरतावादाच्या नव्या खेळाकडेच अंगुलीनिर्देश करतात.
लिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला लोकसभा खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. दि. ५ जुलै २०२४ रोजी तो लोकसभा खासदार म्हणून शपथ घेईल. अमृतपाल पंजाबमधील खांडूर साहिब येथून खासदार म्हणून निवडून आला आहे. अमृतपाल सिंगला पॅरोल मिळाल्याची माहिती खासदार सरबजीत सिंग खालसाने दिली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिसच्या दोन एजंट्सला अटक केली आहे. भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून निधी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रियाजुद्दीन आणि अमृतपाल सिंग उर्फ अमृत गिल अशी त्यांची नावे आहेत.
ब्रिटनमध्ये राहणारा खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख अवतार सिंह खांडा यांचा मृत्यू झालेला आहे. यापूर्वी त्याला विषबाधा झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता ब्रिटनच्या मेडिकल रेकॉर्डमध्ये अवतारला ब्लड कॅन्सर असल्याची पुष्टी झाली आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांनी अवतार सिंह यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अवतार सिंह यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला होता. त्याला ब्रिटनमधील बर्मिंघम शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौरला दि.२० एप्रिल रोजी अमृतसर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. किरणदीप कौरने यापूर्वी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले होते की, ती अमृतपालच्या संपर्कात नाही.तसेच किरणदीप यूकेची नागरिक आहे त्यामुळे ती लंडनला जात होती. सध्या तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौर हिला बुधवारी अमृतसर विमानतळावर थांबवण्यात आले. किरणदीप कौर विमानतळावरून लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजताच तिची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा खाली खेचण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तान समर्थकांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीस प्रारंभ केला आहे.पंजाब पोलिसांनी खलिस्तानी अमृतपाल सिंग याच्याविरोधात धरपकड मोहिम सुरू केल्यानंतर परदेशातील खलिस्तानवाद्यांनी त्या त्या देशांमध्ये भारतविरोधी कारवायांना प्रारंभ केला होता. लंडनमध्येही तेथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तानवाद्यांनी दंगल माजवून भारतीय तिरंगा खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता.
’वारिस पंजाब दे’ चा प्रमुख अमृतपाल सिंगच्या अतिशय जवळचा सहकारी पपलप्रीत सिंगला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिस आणि सीआयएची ही संयुक्त कारवाई आहे. पपलप्रीत सिंगला होशियारपूरमधून अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग आणि पपलप्रीत हे दोघेही होशियारपूरमधून विभक्त झाले होते. ते फरार होण्याच्या दिवशी सोबतच होते.
अमृतपालने आत्मसमर्पण करू नये. त्याने रावी नदी पार करून पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य लोकसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) प्रमुख सिमरजीत सिंग मान यांनी केले आहे.
संपूर्ण युरोपमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे अभ्यासकांना आढळून आले आहे. स्पेनमधील ‘इस्लामिक कमिशन ऑफ स्पेन’च्या सचिवाने, गेल्या ३० वर्षांमध्ये स्पेनमधील मुस्लिमांची संख्या दहा पटींनी वाढली असल्याचा दावा केला आहे. अनधिकृत आकडेवारीनुसार स्पेनमध्ये ३० लाख मुस्लीम राहत आहेत. पण, या वाढत्या मुस्लीम लोकसंख्येबरोबर वाढती असुरक्षिततता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
पंजाबी भाषेत ‘खालसा’ या शब्दाचा अर्थ ‘पवित्र’ असा होतो. म्हणून ‘खलिस्तान’ म्हणजे पवित्र भूमी! पंजाबात शिखांचा (शिष्यांचा) स्वतंत्र देश अस्तित्वात यावा, यासाठीची चळवळ तशी खूप जुनी नाही. पण, शिखांच्या या मागणीला १९७० आणि १९८० या दशकात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. १९८६ नंतर पंजाब पोलिसांनी या खलिस्तानी दहशतवाद्यांविरूद्ध मोठ्या प्रमाणाव
खलिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी अमृतपाल सिंगचा साथीदार तेजिंदर सिंग उर्फ गोरखा बाबा याला अटक करण्यात आली आहे. गोरखा बाबा हा खन्नाच्या मलौद पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मंगेवाल गावचा रहिवासी आहे. गोरखा बाबा एकेकाळी अमृतपालचा अंगरक्षही होता.दरम्यान, पंजाब सरकारने तरणतारण आणि फिरोजपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केली आहे. मोगा, संगरूर, अमृतसरमधील अजनाला उपविभाग आणि मोहालीच्या काही भागात निर्बंध हटवण्यात आले आहेत.
भारत आणि ब्रिटनचे संबंध अतिशय घनिष्ट आहेत. त्यामुळे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला हा स्वीकारार्ह नाही, असे प्रतिपादन ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवर्ली यांनी म्हटले आहे.
गेल्या चार दिवसांपासून फरार असलेल्या खलिस्तानी अमृतपालसिंग विरोधात पंजाब पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग पंजाबमधून फरार झाला आहे. पंजाबच्या ८० हजार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अमृतपाल गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून देशभरातील गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आश्रयाला आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्कता बाळगत आहेत.
पंजाबमध्ये अमृतपाल सिंग याच्यावर कारवाईचा निषेध म्हणून लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर तिरंग्याचा अवमान करणारा खलिस्तानी समर्थक अवतार सिंग खांडा याला अटक करण्यात आली आहे. खांडा हा प्रतिबंधित गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. तसेच पंजाबमध्ये सुरू असलेल्या तपासात खांडा हा अमृतपालचा हस्तक असल्याचेही निष्पन्न झाले आहे. लंडनमध्ये पकडलेला खांडा हा खलिस्तान लिबरेशन फोर्सशी संबंधित असलेला कुवंत सिंग खुराणा याचा मुलगा आहे.
पंजाबमधून बेपत झालेला खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणार्यांवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येत आहे. अमृतपाल सिंग फरार असून पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहे.
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अद्यापही फरार असल्याप्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे. अमृतपाल हा देशाच्या सुरक्षेस धोकादायक असताना ८० हजार पोलिस त्याला पकडू शकत नाही, हे धक्कादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, अमृतपालविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पंजाब सरकारतर्फे न्यायालयास देण्यात आली आहे. "
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर शेकडो देशभक्त भारतीयांनी हाती तिरंगा घेऊन ‘जयहिंद’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देऊन खलिस्तान्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नव्हे, तर राजकीय अजेंड्यांचेही केंद्र. त्यामुळे साहजिकच आपल्या पक्षाचे, पक्षनेतृत्वाचे विचार हे नेटकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या ‘आयटी सेल’ कंबर कसून असतात. म्हणजे या ‘आयटी सेल’ आणि त्यामागचे चेहरे हे फारसे चर्चेत नसले तरी ‘नरेटिव्ह सेटिंग’मध्ये त्यांचा विशेष हातखंडा! मग अशावेळी साहजिकच त्या त्या राजकीय विचारसरणीला मानणार्यांनाही या खेळात हाताशी घेतले जाते. पण, यामुळे स्वत:ला ‘निष्पक्ष पत्रकार’ म्हणविणारे मात्र या नादात उघडे पडतात एवढेच! असाच किस्स
पंजाबमध्ये दि.१८ मार्चपासून इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद आहे. तसेच २१ मार्चपर्यत दुपारी १२ वाजेपर्यत पंजाबमधील इंटरनेट आणि एसएमएस बंद ठेवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. दरम्यान, कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा शोध सुरू आहे. तसेच अमृतपालला लवकरच अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अमृतपालला अटक केल्याचे वृत्त पसरल्याने जालंधर , अमृतसर ,मोहाली येथे अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी दहशत माजविली त्यामुळेच पंजाबमध्ये तणाव वाढला आणि जमावबंदीचे आदेश जारी करत इंटरनेट आणि एसएमएस सेवा
लंडनमध्ये तिरंगा खाली उतरवणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. लंडनध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर फडकावलेला तिरंगा दि .१९ मार्च रोजी खलिस्तानी समर्थकांनी खाली उतरवला होता. मात्र आता या इमारतीवर पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून https://twitter.com/BhatkhalkarA/status/1637754796466683905खलिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर देण्यात आलं.
खलिस्तानवाद्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कायदा-व्यवस्था राखण्याची जबादारी पार पाडण्यात भगवंत मान सरकारला अपयश येत असल्यास खलिस्तानवाद्यांचा बीमोड करण्यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.
पंजाबमध्ये सत्तास्थानी असलेल्या आम आदमी पार्टीमुळे राज्याची प्रगती खुंटली असतानाच अमृतपाल सिंग यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा कट्टरपंथी वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादाचा विचार पंजाबमध्ये रुजविण्यासाठी ‘मिशन पंजाब’ ही मोहीम हाती घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ‘राज्यव्यापी व्यसनमुक्ती यात्रा’ काढली जाणार आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौर्यांचे नियोजन भाजपच्यावतीने क
‘भिद्रनवाले २.२’ या उपाधीने सजलेला अमृतपाल सिंग पंजाबमध्ये धिंगाणा घालत होता, तेव्हा केजरीवाल व मान उद्धव ठाकरेंचे कौतुक करण्यात मुंबईला व्यस्त होते. रिबेरोंसारख्या अधिकार्याने हे राजकीय वास्तव दुर्लक्षित करून केंद्राने काय करावे, याचा सल्ला दिला आहे.