Enter your Email Address to subscribe to our newsletters
मुद्रा योजनेने भारतीयांमधील उद्योजकता घडवली आहे. ही योजना सशक्त भारतीय घडवण्याच्या आपल्या प्रयत्नांना साकार करणारी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Read More
जेमतेम परिस्थिती व कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, धाडस आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी युवा उद्योजक ( Young Entrepreneur ) झालेल्या प्रणवकुमार ब्रिजकिशोर अहिरे यांच्याविषयी...
महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या सर्वच उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून, त्यांना त्यांच्या उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात यावे असे आवाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एमएसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल म्हणाले, की भारतातील आध्यात्मिक भावना खूप खोलवर रुजली आहे आणि या भावनेने समाजाची सेवा करू इच्छिणारे लोक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहेत. भारताचे उद्योजकतेचे मॉडेल भारतीय परिस्थितीत असले पाहिजे, आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी स्वावलंबन केंद्राची जबाबदारी स्वीकारून त्या केंद्रात उद्योजकतेसाठी काम केले पाहिजे. Udyamita Sangam New Delhi
धारावी रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल ) धारावीच्या पुनर्विकासासाठी कटीबद्ध आहे. सगळ्या पात्र झोपडपट्टी धारकांना धारावीतच ३५० चौरस फुटाची पुर्णपणे मोफत घरे दिली जाणार आहे. जी मुंबईतील इतर कुठल्याही भागातील एसआरएच्या घरांपेक्षा १७ % मोठी आहे.
"आज माझे मार्गदर्शक रतन टाटा सरांचा वाढदिवस आहे. आज माझ्या आयुष्यात मी जे काही आहे ते त्यांच्याच मुळे आहे. मी फक्त १८ वर्षांचा होतो तेव्हा रतन टाटा सरांनी माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या कच्च्या घड्याला आपल्या हाताने सावरले. त्यांनी आपल्या अनुभवातून मला दिशा दाखवली. त्यांचा आशीर्वाद मला संबल देतो. रतन टाटा यांते स्वप्न होते की, सर्व भारतीयांना स्वस्त दरात औषधे मिळावीत. जेनेरिक आधाराद्वारे आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वचन देतो की, जेन
उद्योजकांना त्यांचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज ओळखून उद्योजकाला मार्गदर्शन करणारे मराठीतील पहिले पुस्तक ‘मेंटॉर’ची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रतिथयश उद्योजक तथा कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
“मराठी युट्यूबर्सना भरपूर संधी आहे याचे संपूर्ण श्रेय आपल्या मराठी प्रेक्षकांचे आहे. मराठी भाषेत उत्तम प्रतिचा कन्टेट दिला तर प्रेक्षक तो उचलून धरतात आणि प्रतिसादही देतात. फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच गोष्टी चालतात हा गैरसमज आहे. मराठी यूट्यूबर्सना भरपूर संधी आहे, या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. गुगल सुध्दा स्थानिक भाषांना प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या भाषेतच कन्टेट बघायला आवडतो. तो कोणीच बनवत नाही त्यामुळे बघितला जात नाही. ही सुध्दा सुरवात आहे अजून बरेच पुढे जायचे आहे”, असंही उर्मिलाने म्हट
शासन-प्रशासन स्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामागचा मुख्य उद्देश हा रोजगार-स्वयंरोजगाराच्या संदर्भात पुरुष आणि महिलांमधील संख्यात्मक तफावत कमी व्हावी, त्याशिवाय गृहोद्योगांसह कुटिरोद्योगांसारख्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग असावा व त्याच जोडीला त्यांना आपल्या रोजगार वा छोटेखानी व्यवसायातून आर्थिक प्राप्ती व स्थिरता लाभावी, हे उद्देश पण होतेच. यातून महिलांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला.
मुंबई : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
डोंबिवली : डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व पुणे येथील व्यावसायिकांसाठी काम करणारी सुप्रसिद्ध संस्था 'दे आसरा' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली मध्ये प्रथमच उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा दिनांक 21 एप्रिल 2023, माधवाश्रम हॉल, रोटरी शाळेजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पुर्व येथे घेण्यात येणार आहे.
राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या फडणवीस-शिंदे सरकारने बेरोजगारांसाठी रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वा. या कालावधीत कल्याणमधील बापसई येथील इंडाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा
राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रूची
महाराष्ट्राच्या संदर्भातच सांगायचे म्हणजे मुंबई-पुणे सोडून एक हजार कोटींहून अधिक उलाढाल असणारे सर्वाधिक उद्योग नागपूर येथे सहा असून त्यानंतर औरंगाबाद येथे चार व नाशिक आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक अशी क्रमवारी आहे. उद्योजकतेचा महानगरांकडून शहरांकडील हा समृद्धी मार्ग नक्कीच विचारणीय ठरला आहे.
आर्थिक आणि सामाजिक इको- सिस्टीम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघुउद्योजकांची ‘बिझनेस जत्रा’ दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे होत आहे. ‘लक्ष्यवेध व ‘ठाणेकर कॅम्पेन पार्टनर अॅडमार्क मल्टीवेंचर’च्या सहयोगाने होणार्या या मेळाव्यात 125 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रिजशी संलग्न संस्था आणि दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, १० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सायंकाळी ४.०० वाजता महासंस्कृती कोकण सन्मान हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर सांस्कृतिक वनमंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
आयटी म्हणजे माहिती - तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा सेवा पुरवठादार देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये भारताकडून या सुविधा पुरवल्या जातात. भारतताही या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या आहेत. या क्षेत्रातील आकर्षक संधींमुळे कायमच हजारो इंजिनीयर्सची या क्षेत्राला पसंतीची असते. पण या क्षेत्राला नजीकच्या काळात मोठ्या उलथापालथींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याला कारण वाढती महागाई आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांची खर्च कपात.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दीपक करंदीकर यांची मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या (MCCIA) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बुधवारी झालेल्या ८८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. २०२२-२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी दीपक अध्यक्षपद सांभाळतील. राज्यात उद्योजकता वाढीसाठी काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स सर्वांनाच सुपरिचित आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई )आपण जास्तीत जास्त काम करू असा विश्वास दीपक यांनी
“आजच्या तरुणांनी उद्योजकतेकडे फक्त स्वतःच्या संपन्नतेचे साधन म्हणून बघण्यापेक्षा, ब्रिटिश येण्यापूर्वी जो संपन्न, समृद्ध असा भारत होता, तो परत कसा तयार करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,” असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी दिला
घरं तर अनेकजण बांधतात. पण, ज्याठिकाणी देवाचा वास आहे, अशा मंदिराचे बांधकाम करणे ही भाग्याचीच गोष्ट. जाणून घेऊया आतापर्यंत शेकडो मंदिरे बांधणार्या शहाजी हाकदळे यांच्याविषयी...
गेले काही दिवस सोशल मीडियावर उद्योजक ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा सगळीकडे एकच चर्चा सुरु होती
ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्यावतीने अंधेरी ‘एमआयडीसी’मधील अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्र येथे शैक्षणिक आणि रोजगार मेळावा शनिवार दि. 23 जुलै रोजी संपन्न झाला
वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...
राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्
कुठल्याही उद्योगाच्या आयुष्यात कायदेशीर गोष्टींना खूप महत्त्व असते. या बाबींकडे दुर्लक्ष करून कधीच चालत नाही. कारण, या गोष्टींमधली एखादी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. त्यामुळेच या गोष्टींना काळजीपूर्वक हाताळणे, गरजेचे असते. परंतु, या गोष्टींना कसे हाताळावे, हे बरेचदा नव्या उद्योजकांना समजतच नाही. यामुळे सातत्याने नवीन उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणींचा सामना करण्यात त्यांचा वेळ, पैसा आणि शक्ती खर्च होत राहते आणि त्यामुळे त्या उद्योजकांना त्यांच्या कामावर, उद्योगावर लक्ष केंद्रित करता ये
फेब्रुवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाने दिव्यांगांच्या संदर्भात विशेष निर्देश जारी केले होते. या नव्या मार्गदर्शक निर्देश-तत्वांनुसार विद्यमान बांधकामाांसह कार्यालयांमध्ये आवश्यक त्या तरतुदींची पूर्तता करण्यासाठी जून २०२२ची कालमर्यादा निश्चित केल्याने या विषयाचे महत्त्व व गांभीर्य सध्या पुनश्च अधोरेखित झाले आहे.
प्रवीण मसाले या सुप्रसिद्ध ब्रँड चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचे आज दि.३ जून रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
“आत्मनिर्भर ‘पॅकेज’ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला दिले. घोषित केलेले पॅकेज प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे पंतप्रधानांचे ध्येय होते. या ‘कोविड’ काळात उद्योगांना अतिरिक्त कर्ज मिळावे, यासाठीही त्यांनी विशेष उपाययोजना केली होती व याचा महाराष्ट्रातील उद्योगांना मोठा फायदा झाला. परंतु, या राज्यातील सरकारकडून उद्योजक, व्यापारी, १२ बलुतेदार यांना एका नव्या पैश्याची ‘कोविड’ काळात यांनी मदत केली नाही,” असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
व्यवसायात नावीन्य शोधणारा ‘इव्हेंटफूल’ उद्योजक
‘स्टार्टअप्स’ना तंत्रज्ञानाचे धडे देणारे योगेश घोरपडे स्वतःच्या कल्पना उद्योगामार्फत सत्यात उतरवणे, हे प्रत्येक तरुण उद्योजकाचे स्वप्न असते.
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कुठलाही व्यवसाय हा तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यातच व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर स्वबळावर काम करणे तसे क्रमप्राप्तच.
केंद्र सरकारने सर्वच सुविधांची मांदियाळी उद्योजकांना निर्माण करून दिली
त्यामुळे जागतिक स्तरावर आणि भारतात स्टीलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. याचा फटका लघुउद्योग क्षेत्राला बसत आहे. स्टीलच्या वाढत्या किमती बघता लघुउद्योगांना काम देणार्या मोठ्या उद्योगांकडून त्या तुलनेने दर वाढवणे अपेक्षित असताना अनेकदा दरवाढीची मागणी फेटाळल्यामुळे एकतर ‘ऑर्डर’ सोडावी लागते किंवा नुकसान सोसावे लागते. त्यामुळे अनेक लघुउद्योजकांनी मर्यादित उत्पन्नावर भर दिला आहे.
भारताच्या वेगाने वाढणार्या लोकसंख्येमुळे, कोणत्याही सरकारसाठी समान संख्येने नोकर्या निर्माण करणे अशक्य आहे. केवळ नोकरी शोधणारे न राहता आवश्यक ज्ञान आणि कौशल्य असलेले अधिकाधिक उद्योजक विकसित करण्यावर म्हणूनच भर दिला पाहिजे. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले प्रयत्न केंद्रित करत आहे.
कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२' अभय योजना आज विधिमंडळात जाहीर केली
स्वतःचा व्यवसाय सुरू करुन त्याला जागतिक पातळीवर यशस्वी करून दाखवणार्या श्वेता मॅकवान यांनी ‘शुभविधी’ ही कंपनी नावारुपाला आणली. तसेच, ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ संघटनेची स्थापना करून उद्योजिकांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्या करतात. तेव्हा, आज जागतिक महिला दिनानिमित्ताने या यशस्वितेच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
भारतात दोन तरुणांनी ‘मोमो’ या नेपाळी खाद्यपदार्थास आपलंसं केलं आणि स्वत:चं ‘मोमो’ साम्राज्यच उभारलं. निव्वळ 30 हजार रुपयांनी ‘मोमोज्’च्या स्टॉलची सुरुवात केली आणि या नेपाळी खाद्यपदार्थानेसुद्धा बहाद्दूरसारखी सोबत करत या दोन्ही भारतीय तरुणांना 860 कोटी रुपयांचं उद्योजकीय साम्राज्य उभारण्यास मदत केली. ही कथा आहे, सागर दर्यानी आणि विनोद कुमार होमगाई यांच्या ‘वॉव मोमो’ची.
डॉ. मिलींद संपगावकर म्हणजे एक अफलातून व्यक्तीमत्त्व. यशस्वी उद्योजक आणि तितकेच समाजशील समाजहितचिंतक. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा घेतलेला मागोवा...
सध्या ३० कोटी भारतीय ‘पेटीएम’चा वापर आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी करतात, असा कंपनी दावा करते. २०१७ मध्ये ते भारतातील सर्वांत तरुण अब्जाधीश होते. ‘फोर्ब्ज’च्या मते, विजय शेखर यांची निव्वळ संपत्ती १७ हजार, ९६३ कोटी रुपये इतकी आहे.
व्यवसायात युवकांनी यशस्वी व्हावे, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील असणार्या मुलुंडमधील उद्योजक मिलिंद मोरे यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...
‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन प्रसारित होणार्या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळातील ते एक परीक्षक. आपणसुद्धा या बदलणार्या काळासोबत बदलायला हवे, असा विचार करत त्यांनी ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो ‘फूड उद्योजक’ घडवले. ही यशोगाथा आहे ‘शेफ चेतक अकॅडमी’चे संचालक चेतक घेगडमल यांची...
कामा असोसिएशनतर्फे उद्योजकांसाठी प्रक्रिया सुरक्षितता या मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
‘फिनिक्स’ नावाचा पक्षी जळून खाक झाला, तरी राखेतून पुन्हा आकाशात झेप घेतो, अशी दंतकथा आहे. ‘फिनिक्स’ पक्षाची कथा खरी की खोटी माहीत नाही, पण महेश सराटे मात्र उद्योगक्षेत्रातले ‘फिनिक्स’ आहेत, हे मात्र नक्की!
कोरोनातून व्यापारी व उद्योजक आता जेमतेम बाहेर पडत आहेत. शिवाय, सणासुदीमध्ये अचानक बंद पुकारणे योग्य नाही. तेव्हा, बंद करून नाहक जनतेला वेठीस धरू नका, असा आक्रोश ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ने (टिसा) रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये जो कोणी येतो त्याची स्वप्ने पूर्ण होतात. मात्र, आपण बाहेर नोकरी करत भटकतोय, हे दिपक यांना कुठेतरी मनात खटकायचं. आयुष्यात जर मोठ्ठं काही करायचं असेल, तर ते नोकरीमध्ये शक्य नव्हतं. त्यासाठी स्वत:चा उद्योग-व्यवसाय करणेच योग्य आहे, हे त्यांना उमजले होते. लग्न झाले होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून उद्योग करणे, खरेतर धाडसाचे होते. घरी सांगितले असते, तर या अनिश्चिततेला त्यांनी नकारच दिला असता. सारासार विचार करुन त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. ती मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली. दिपकना आभाळाएवढ
कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
संयम, चिकाटी, मेहनत, कौशल्य यांचा संगम जिथे होतो, तिथे यश हमखास असतं. मयूरने स्वतःच्या व्यवसायात यशस्वी होऊन हे सूत्र खरं करून दाखवलं आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह १४ जून २०२१ पासून सुरू झाला आहे. हे सप्ताहाचे दुसरे वर्ष असून जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याचे तिसरे वर्ष आहे. मी मराठी व्यवसायिक एकीकरण समितीच्या फेसबुक पेजवर कार्यक्रम लाईव्ह बघता येणार आहे.
बडवे ग्रुप ऑफ कंपनीज्चे चेअरमन शंकर प्रभाकर बडवे यांचे मंगळवारी दि.४ रोजी पुण्यात वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.