मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ५०८.१७ किमीच्या पॅकेज P1(C) साठी त्यांच्या पहिल्या ओपन वेब गर्डर (OWG) ट्रस ब्रिजचे लॉन्चिंग पूर्ण करण्यात यश आले आहे. एम जी कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.ने मागील आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण केले.
Read More
शांघाय सहकार्य परिषदेत नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसणार आहेत. ते कोणाच्या नेत्यांशी व्यक्तिगत भेटी घेणार आहेत, हे अद्याप स्पष्ट नसले तरी व्लादिमीर पुतीन आणि इब्राहिम रईसी यांच्याशी ते भेटतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ही परिषद संपूर्ण जगभरात औत्स्युक्याचा विषय ठरली आहे.
सप्टेंबर महिन्यातील दुसरा आठवडा ब्रिटनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. आठवड्याच्या प्रारंभी एकीकडे अटीतटीच्या लढाईनंतर भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करत हुजूर पक्षाच्या लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यामुळे मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर ट्रस या ब्रिटनच्या तिसर्या महिला पंतप्रधान ठरल्या. त्यांचा शपथविधीही सोहळाही पार पाडला. एकीकडे लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि दुसरीकडे ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96व्या वर्षी गुरुवार
गेल्या 12 वर्षांत उपसचिव ते सचिव ते मंत्री अशी वाटचाल करताना लिझ ट्रस यांनी पर्यावरण, व्यापार, महिला विकास ते परराष्ट्र व्यवहार अशी महत्त्वाचे विभाग सांभाळले आहेत. पण, आता ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून ‘ब्रेक्झिट’ पश्चात ब्रिटनला नवीन दिशा देण्याचे सर्वात मोठे आव्हान लिझ ट्रस यांच्यासमोर असणार आहे.