Enter your Email Address to subscribe to our newsletters
Australia मध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
Read More
भारतीय विदेशी मुद्रेची नवी आकडेवारी जाहीर झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत (Forex Reserves) मध्ये या आठवड्यात नवीन विक्रम नोंदविला गेला आहे. विदेशी मुद्रेत ४.३०७ अब्ज डॉलर्सने वाढत ६५५.८१७ अब्ज डॉलर्सवर संख्या पोहोचली आहे. मागील आठवड्यात ४.८३७ अब्ज डॉलर्सपर्यंत मुद्रेत वाढ होत ६५१.५१ अब्ज डॉलर्सपर्यंत विदेशी मुद्रेत वाढ झाली होती
भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserves) मध्ये ६५१.५ अब्ज डॉलर्सने आतापर्यंत सर्वाधिक वाढ झाल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना सांगितले आहे. मे २०२४ पर्यंत ६४६.६७३ अब्ज डॉलर्सचा अंतिम अहवाला नंतर आता एकूण विदेशी मुद्रेची संख्या ४.८३ अब्ज डॉलर्सने वाढलेली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलता ना, 'हा नवा उच्चांक' असल्याचे स्पष्ट करत ३१ मे पर्यंत ६५१.५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक वाढ झाल्याचे त्यांनी आज सकाळी प तधोरण जाहीर करताना सांगितले आहे.
चार आठवड्यानंतर भारताच्या विदेशी मुद्रेत मोठी वाढ झाली आहे. वित्तीय समितीने डॉलरच्या खरेदीत वाढ केल्याने भारतीय परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने ३ मे पर्यंत घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची विदेशी मुद्रेचा साठा वाढला आहे. हा साठा ३.७ अब्ज डॉलरने वाढल्याने एकूण साठा ६४१.५९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा साठा मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र त्यानंतर विदेशी मुद्रेत घसरण झाली होती.
भारतीय विदेशी मुद्रेत ऐतिहासिक वाढ झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत ( Foreign Exchange Reserve) मध्ये वाढ होत ६४८.४६ डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत एकूण २.९८ दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने सोने संकलनात लक्षणीय वाढ केली आहे. आठवड्यातील आरबीआयच्या डेटानुसार आरबीआयने ६ टन सोने अधिक खरेदी करून सोन्याचा साठयात वाढ केली आहे. ही वाढ केवळ फेब्रुवारीत झालेली आहे. सोन्याचा साठा आता १३ टनांपर्यंत वाढत एकूण सोने ८१७ टनांपर्यंत पोहोचले असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे.
१ एप्रिलला सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. सेबीने ग्राहकांचे गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी ऑनलाईन तक्रारींचे निवारण करण्यासाठी सेबी कंप्लेंट रिड्रेस सिस्टीम (SCORES) या व्यासपीठाचे अनावरण केले आहे. ग्राहकांना गुंतवणूकीबाबत कुठलीही तक्रार असल्यास गुंतवणूकदार आपली तक्रार युआरएल (URL) व अँपच्या माध्यमातून सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कडे नोंदणी करु शकणार आहेत.
भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserves) मध्ये सलग पाचव्या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे.विदेशी मुद्रा ६३२.६३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे. या आठवड्यात विदेशी मुद्रा १४० दशलक्ष डॉलर्सने वाढल्या आहेत. यापूर्वी देशाच्या विदेशी मुद्रा ६.४ अब्ज डॉलरवरून ६४२.४९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्या होत्या.
'सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)' मध्ये नवीन भरती केली जाणार आहे. सेबीकडून या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशभरात डि-मॅट अकाउंटमध्ये वाढ झाल्यानंतर सेबीकडून नवनवीन निर्णय नव गुंतवणूकदारांसाठी घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता याच सेबीमध्ये काम करण्याची चांगली संधी तरुणांना मिळणार आहे. सेबीकडून रिक्त जागांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली असून या अंतर्गत एकूण ९७ रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे.
तेराव्या इंटरनॅशनल कन्व्हेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर ऑफ इंडियामध्ये सेबीचे अधिकारी कमलेश चंद्र वर्शनी यांनी बोलताना सेबीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करण्यात आल्याचा दुजोरा प्रसारमाध्यमांना दिला आहे. याप्रसंगी बोलताना आर्थिक गैरव्यवहार,घोटाळे,आर्थिक अनियमितता आढळल्यास यावर सेबी ए आय माध्यमातून माहिती मिळवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एआयचा वाढता वापर व उपयुक्तता लक्षात घेता आर्थिक व्यवस्थापनात ए आयचा शिरकाव याबद्दलची नांदी आहे.
साईनपोस्ट इंडिया लिमिटेड या डिजिटल आऊट ऑफ होम जाहिरात स्पेशालिस्ट जाहिरात कंपनीने आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी), नॅशनल टॉक एक्सचेंज (एनएससी) वर आपल्या कंपनी नोंदणीकृत केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. सध्याच्या घडीला डीडीओएच जाहिरात करणारी साईनपोस्ट भारतातील पहिली शेअर बाजारात नोंदणीकृत (लिस्टेड) कंपनी ठरली आहे. ही कंपनी प्रामुख्याने प्रोग्रॅमटिक जाहिरातीसाठी प्रसिद्ध संस्था असून कन्व्हेशनल, ट्रान्झिट मिडिया (स्कायवॉक, बस पॅनल, एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, मोबाईल व्हॅन) अशा विविध वाहतूक माध्यमांवर डि
बिटकॉइनमध्ये दोन वर्षांनंतर वाढ झाली आहे. यावेळी बिटकॉइनमध्ये वाढ ५०००० डॉलर ( सुमारे ४१५०२५० रूपये) झाली असून बिटकॉइने बाजारात पुनरागमन केले आहे असे म्हणायला वाव आहे.याआधी बिटकॉइनने किंमतीत उसळी मारत ५०३७९ डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता. किंमतीबाबत संवेदनशील म्हणून क्रिप्टोकरन्सी कडे पाहिले जाते. बाजारात बदल होत बिटकॉइनने ही मोठी मजल मारली आहे. मिडिया वृत्तानुसार सिंगापूर येथे डिजिटल असेटचा आज सकाळी ४९९६० डॉलरचा व्यवहार झाला आहे. शेवटी दरात नोव्हेंबर २०२१ मध्ये वाढ होत १९००० डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता.
आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याच्या निर्णयावर उद्योगाशी निगडीत लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वैश्विक अडचणींचा सामना करतानाच महागलेले तेल,पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती यानंतर पेटीएम फिनटेकवरील वाढलेल्या अडचणीत मात्र बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीचे भाव मात्र वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे विनिमय मूल्यात कपात झाल्याने त्याचा परिणाम कमोडिटी एक्सचेंज मध्ये दिसून आला आहे.
या पृथ्वीतलावर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूनंतर संपत्तीधारकाला त्याची संपत्ती, त्याला हवी त्या व्यक्तीलाच मिळावी, म्हणून जीवंतपणीच मृत्यूपत्र तयार करण्याचा सल्ला दिला जातो. वारसांमध्ये मयत व्यक्तीच्या संपत्तीवरुन वाद उद्भवू नये, संपत्ती सहज हस्तांतरित व्हावी, म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी, याचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी वांद्रे-कुर्ला येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयात दि. २९ जानेवारी २०२४ सोमवारी ब्रोकर्स इंडस्ट्री स्टँडर्ड्स फोरम (आयएसएफ) च्या सहभागींशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आयएसएफच्या कामाचे कौतुक केले.
एकीकडे अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होत असताना, दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सुवार्ता कानी आली. सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर बाजारमूल्यानुसार, भारतीय शेअर बाजार हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत, चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्यानिमित्ताने भारतीय शेअर बाजाराच्या या कौतुकास्पद कामगिरीचे केलेले आकलन...
भारताचा परकीय चलनाचा साठा मागच्या आठवड्यात ६०४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. चार महिन्यांत प्रथमच परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक पतधोरण जाहीर करताना दिली.
१७ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ५.०८ अब्जने वाढून ५९५.४० अब्ज झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या विदेशी चलन मालमत्ता ४.३९ अब्जने वाढून ५२६.३९ अब्ज झाली आहे.
एशिया सिक्युरिटीज फोरम कॉन्व्हेनची २८ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे यजमानपद बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम ( BBF) यांना मिळाले होते. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. आशिया सिक्युरिटी फोरम ( ASF) या संस्थेच्या अनुषंगाने आर्थिक जगतातील विविध प्रश्न मांडून यावर तोडगा काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्यतः शेअर मार्केट, सिक्युरिटीज, कॅपिटल , बाँड मार्केटशी संबंधित विविध विषयांवर आर्थिक तज्ज्ञ मंडळी आपापसात चर्चा करतात. या
दसरा मुहूर्तावर क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये नवचैतन्य दिसले आहे. त्यातच बिटकॉइन चलनात में २०२२ नंतर प्रथमच ३५००० डॉलर हून अधिक चलनाची ट्रेडिंग पार पडली आहे. १८ महिन्यातील आकड्यांचे हे सर्वात जास्त भावाची नोंदणी बिटकॉइनने केली आहे. मार्केटमध्ये अमेरिका बिटकॉइन ला व्यापार चलनाचा दर्जा देऊ शकते अशी वावटळ बाजारात उठली आहे. तसे झाल्यास या दरात अजून देखील तेजी येऊ शकते.
'सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता परीक्षा सुरु झाली असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत आता बदल करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील परीक्षा याआधीच झाली असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या प्रतीक्षेत परीक्षार्थी असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अ
सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने आपल्या वार्षिक अहवालात,सेबी ही लिस्टेड कंपन्यांची पब्लिक ऑफर आणि माहितीपत्र यांची खातरजमा करेल अस नुकतच म्हटले आहे. उद्योग समुह व मोठ्या कंपनी समुहांनी देखील याची खातरजमा करून आवश्यक ती सगळी माहिती सार्वजनिक करावी असे आवाहन सेबीने केल आहे.
सध्याची अस्थिरता रुपयाला पण मारक असल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी १ युएस डॉलरचा तुलनेत रूपया ७ पैशाने घसरून ८२.२५ झाला आहे. करन्सी ट्रेडिंग मध्ये अमेरिकेन मार्केट मधील तेजीमुळे डॉलर वधारला आहे. तेलाचे भाव ८४ डॉलर प्रति बॅरल डॉलर पर्यंत वाढल्याने रुपयांचा भावात फरक पडल्याचे दिसून आले.शुक्रवारी रुपयाची तुलना ८२.१८ प्रती रुपया इतकी नोंदवण्यात आली.क्रुड तेलाचा भावाच्या आंतरराष्ट्रीय स्थित्यंतराने ०.५३ टक्यांपर्यंत पर बॅरल रुपयाची किंमत घसरली
बदलती व्यावसायिक स्थिती, विभिन्न प्रकारची आव्हाने यावर मात करून स्थायी व दूरगामी स्वरुपात यशस्वी होण्यासाठी ’ईएसजी’ हा एक सार्थ व समर्थ पर्याय ठरू शकतो. यावर अधिकांश प्रतिसाद देणार्यांचे एकमत झाले आहे. कुठलाही नवा व्यवस्थापन पर्याय हा खर्चिक असतोच. मात्र, या वाढीव खर्चावर प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती, गुणात्मक दर्जावृद्धी व व्यावसायिक कार्यक्षमता यांद्वारे मात केली जाऊ शकते.
‘एचडीएफसी’ बँक आणि ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था या दोन संस्थांचे विलीनीकरण होत आहे. ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था येथून पुढे वायदे बाजारामध्ये कार्यान्वित असणार नाही. ही बहुचर्चित अशी एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात तिची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यामुळे अर्थजगतात होणार्या घडामोडींवर टाकलेली नजर...
भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १६ जून २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा २.३५ अब्ज डॉलर्सने वाढून ५९६.०९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : भारत - श्रीलंका यांच्यातील दहावा द्विपक्षीय सागरी सराव (स्लिनेक्स -23) कोलंबो येथे 3 ते 8 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित केला आहे. हा सराव दोन टप्प्यात आयोजित केला जात आहे. सरावाचा हार्बर टप्पा 3-5 एप्रिल 2023 आणि सागरी 6 -8 एप्रिल 2023 होणार आहे.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचा दुरुपयोग सत्ताधारी पक्षाकडून केला जात असल्याचा सातत्याने आरोप केला जातो. इडीने ज्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला त्या प्रकरणात दोषसिध्दीचे प्रमाण तब्बल ९६ टक्के आहे. तर जी मंडळी ईडीविरोधात ओरडत असतात. त्या आजी, माजी आमदार, खासदारांवर केवळ २.९८ टक्के खटले असल्याची माहिती ईडीच्या वतीने देण्यात आली आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसइ) नवनिर्वाचीत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिष कुमार चौहान यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी कामकाज सांभाळणारे विक्रम लिमये यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १६ जुलै रोजी संपल्याने सेबीकडून हा निर्णय रविवारी (दि. १७ जुलै) घेण्यात आला. सोमवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल.
विविध राज्यांतील आणि विविध पक्षांच्या नऊ खासदारांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ ऊर्जा आणि पर्यावरण या विषयावरील ज्ञान विनिमय कार्यक्रमासाठी शिकागो विद्यापीठातील अभ्यासक, धोरणकर्ते आणि नेत्यांना भेट देत आहे.
रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर बघायला मिळत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. प्रती डॉलर ७७ रुपयांच्या नीचांकी पातळीवर रुपया पोहोचला आहे
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीचे दर सातत्याने वाढतच आहेत.सोन्याच्या दरांनी ५० हजारांची पातळी ओलांडली आहे
आर्थिक अनियमितता झाल्याचा अनिल गलगलींचा आरोप
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत.
मागच्या वर्षी पाकिस्तानचा सध्याचा जिगरी दोस्त असलेल्या चीनचा दौरा इमरान यांनी केला. त्यावेळी चीनने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सची म्हणजे १४ हजार, २०० कोटी रुपयांची मदत केली होती.
जगातील महत्त्वाच्या चलनांकडे नजर टाकल्यास असे दिसते की, डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन केवळ आशियाई देशांपुरते मर्यादित नसून युरो, ब्रिटिश पाऊंड, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाचा डॉलर ते जपानचा येन अशा महत्त्वाच्या चलनांतही झालेले दिसते.