Enter your Email Address to subscribe to our newsletters
लाडकी बहिण योजनेतून अनेक लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात थेट आकडेवारी जारी करत सडेतोड उत्तर दिले.
Read More
'उबाठा'चे खा. संजय राऊत आणि शरद पवार गटाचे आ. रोहित पवार पुन्हा गोत्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत विधानसभा अध्यक्षांनी ते हक्कभंग समितीकडे पाठवले आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि 'लय भारी' या युट्यूब चॅनलविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवार, दि. ६ मार्च रोजी हा हक्कभंग प्रस्ताव (Infringement breach of privilege motion) स्वीकारत हक्कभंग समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. मात्र हक्कभंग म्हणजे नक्की काय असतं विधिमंडळातील हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय? या अंतर्गत काय कारवाई होऊ शकते? या अंतर्गत कोणत्या शिक्षेची
(Rohit Pawar) हिंदूंना डावलून सत्तेसमीप जाता येत नाही, याची प्रचिती आल्यानं पुरोगाम्यांकडून आस्थेचा बाजार मांडला जात आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीसुद्धा महाकुंभात अमृतस्नान करून परतल्यानंतर आस्थेचा बाजार भरवला आहे. त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा घाट रोहितब्रिगेडकडून घातला जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? रोहित पवारांना आपण हिंदू असल्याचा अचानक साक्षात्कार का झाला? याचाच आढावा
हिंदूना डावलून सत्तेसमीप जाता येत नाही, याची प्रचिती आल्याने पुरोगाम्यांकडून आस्थेचा बाजार मांडण्याचे उद्योग सुरू आहेत. खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही महाकुंभात अमृतस्नान करून परतल्यानंतर आस्थेचा बाजार भरवला आहे. त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा घाट रोहित ब्रिगेडकडून घातला जात आहे.
‘करून करून भागला, देवपूजेला लागला’ ही म्हण, जणू रोहित पवारांसाठीच ( Rohit Pawar At Mah Kumbh ) तयार झाली असावी. काल-परवा त्याचे प्रत्यंतर आले. सनातन धर्माच्या रुढी, परंपरांवर अत्यंत खालच्या पातळीत विधाने करून झाल्यानंतर, हे महाशय थेट दिसले ते कुंभमेळ्यात! ब्रिगेडींचे शिरोमणी, थोरल्या पवारांच्या नातवाला या पवित्रस्थळी पाहून, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आयुष्यभर पवारांनी हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवले आणि पुरोगामित्वाची ‘हिरवी’ शाल पांघरली. पुढे त्यांच्या राजकीय वारसदारांनीही तीच री ओढली. विशिष्ट
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह शरद पवार ( Sharad Pawar ) गटाचा सुपडासाफ झाला. त्याचे खापर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर फोडले जात असून, त्यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांची गटनेते पदी झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार भाकरी फिरवणार, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसाच कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळेही चर्चेत आला होता. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. या निकालांचा अन्वयार्थ घेऊया.
(Ajit Pawar) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असेही म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे सूचक विधान केले. अशातच "अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू", अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्य
थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर काय झालं असतं, असा मिश्कील टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार आणि रोहित पवार प्रीतीसंगमावर गेले होते. यावेळी अचानक त्यांची भेट झाली.
(Amol Mitkari on Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली.या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचे” असं मिश्कीलतेने म्हणाले. त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकार्यांकडून कर्जत-जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या अधिकार्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचे घबाडही सापडले आहे.
विधानसभा निवडणूकीत रोहित पवार, राजेश टोपेंसह ५० उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे, असं विधान ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही मतदान का करायचं? असा सवालही त्यांनी केला आहे.
संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो. त्यांनी जरांगेंना मराठा आरक्षण पाठिंब्याचं पत्र लिहून द्यावं, असं आव्हान आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. सांगलीतील शिराळा येथे रयत क्रांती कार्यालयाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
मिरवणूकीतील खेळाडूंच्या बसवर टीका करणारे सायंकाळी फोटो काढण्यासाठी रोहित शर्माच्या मागे पळत होते, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी रोहित पवारांवर केली आहे. टीम इंडियाच्या मुंबईतील मिरवणूकीकरिता गुजरातवरून आणलेल्या ओपन बसवर विरोधकांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफूटीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. या अधिवेशनात पेपरफूटीविरोधात कायदा आणणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरु असून आगे आगे देखो होता है क्या? असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत मविआवर निशाणा साधला.
आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. यावर आता तटकरेंनी प्रत्युत्तर दिले.
जयंत पाटील रोहित पवारांमुळे पक्ष सोडतील. त्यांना पोहित पवारांच्या हाताखाली काम करावं लागतंय हे दुर्दैव आहे, असा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील असा दावा केला होता. यावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली.
कर्जत-जामखेडमध्ये 'एमआयडीसी'च्या आडून मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आमदार रोहित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या नावाखाली एमआयडीसीच्या आडून उद्योगपतींच्या घशात भूखंड घालण्याचा रोहित पवार यांचा घाट आहे. त्यामुळे या संपूर्ण भूखंड घोटाळ्याची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
ते युवानेता आहेत. शरद पवारांसोबत उत्तम नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांना कशाला उघड करायचं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या 'माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते.
सोशल मीडियावर गैरसमज पसरवणं हे रोहित पवारांचं एकमेव काम आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. निवडणूकीमध्ये अजित पवार गटाने पैसे वाटले असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर आता अजितदादांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बारामती लोकसभेत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार राजकारण तापलं आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची नक्कल केली आहे. तसेच बारामतीकर ही नौटंकी सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत.
राज्यभरात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. रोहित पवारांचे कट्टर समर्थक असलेले अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
रोहित पवारांची चौकशी अयोग्य असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली असून याबाबत त्यांची चौकशी सुरु आहे. यासंदर्भात शरद पवारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवारांचं नाव घेतल्याने भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार केल्याची माहितीही प्रसाद लाड यांनी दिली. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी देणाऱ्या इसमाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून यावरुन गुरुवारी विधानसभेत खडाजंगी झाली. या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव योगेश सावंत असून त्याचा शरद पवार गटाशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच योगेश सावंतच्या अटकेनंतर आमदार रोहित पवारांनी त्याच्या सुटकेसाठी पोलिसांना फोन केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
‘फक्त तीन मिनिटांत महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना संपवून टाकू’ अशी धमकी देणारा तो व्हिडिओ बारामतीच्या ‘तुतारी’ कंपूतील योगेश सावंतने शेअर करावा, हा निव्वळ योगायोग असू शकतो का? काय म्हणावे? इफ्तार, रोजे, १३ बॉम्बस्फोट सगळे ओके वाटते. मात्र, हिंदू समाजातील एक गट नको? मग ते रामदास स्वामी असू देत की, स्वा. सावरकर, केवळ ब्राह्मण म्हणून त्यांच्या महान कर्तृत्वाला नाकारणारे कपाळकरंटेच.
गेली दोन ते तीन महिने मी सांगत होतो. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. मनोज जरांगेंच्या आजूबाजूचे लोकच आता सगळं बोलायला लागले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मनोज जरांगेंवर त्यांचेच काही सहाकारी गंभीर आरोप करत आहेत. यावर आता प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली.
दगडफेक झाल्यानंतर राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी जरांगेंना आणून बसवलं आणि सांगितलं की, शरद पवार येत आहेत. तुम्ही परत येऊन बसा, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. सोमवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर दिली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहेत. बुधवारी ते चौकशीसाठी ईडीच्या न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीया सुळेदेखील गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
योगीजींनी ज्याप्रमाणे बुलडोझर पॅटर्न आणलं तसाच आता महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' नावाचा पॅटर्न सुरु झालेला आहे, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात झाली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. या नेत्यांवर असलेल्या आरोपांबद्दल त्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. यामध्ये उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्याचा खर्च जपानने केलेला नाही, तर तो एमआयडीसीने केला, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. मात्र, हा आरोप तथ्यहीन असून, फडणवीस यांच्या दौर्याचा खर्च जपान सरकारनेच केला, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी शनिवार, दि. 13 जानेवारी रोजी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
रोहित पवार अजून बच्चा आहे त्याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शनिवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती अॅग्रो गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी दि. ५ जानेवारी २०२४ शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून ईडीची कारवाई सुरु आहे. बारामती अॅग्रो गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना गेल्यावर्षी ईडीची नोटीस आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची कारवाई अद्याप सुरु आहे. कारवाई दरम्यान कोणालाही बारामती अॅग्रोच्या कार्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत नाहीये.
१ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशीचे निमित्त तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी लिहले होते की, साहेबांबद्दल समज-गैरसमज खूप पसरवले गेले. स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केले असल्याचे आव्हाडांनी म्हटले होतं. पुढे आव्हाड म्हणतात की, मागील ५० वर्षांपासून जे काम साहेबांनी या देशासाठी, राज्यासाठी, राज्यातील महिलांसाठी केले आहे, ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.
१ मे २०२२ सर्वत्र कामगार दिन जल्लोषात साजारा केला जात होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे व्यासपीठावर आले आणि त्यांनी शरद पवारांचा समाचार घ्याला सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरु झालं. शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी त्यावेळी केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दि. २४ डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या नेत्यांविरोधात उघड उघड बंड पुकारतील.
संजय राऊत कुणाच्या चिन्हावर लढणार हे त्यांनी त्यांच्या मालकाला विचारावं, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. गुरुवारी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लोकं जोड्याने मारतील तेव्हा तुम्हाला तुमची लायकी कळेल, असा घणाघात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंचं लहान बाळ इकडे असताना घाबरतं त्यामुळे ते सोबत येतात, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर केली आहे. तसेच राष्ट्रवादी कांग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले ऑरी आहेत असेही ते म्हणाले आहेत.
आयुष्यात कधी संघर्षात केला नाही आता कशाचा संघर्ष? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पोलखोल केली. कर्जमध्ये अजित पवार गटाकडून दोन दिवसीय वैचारिक मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी या शिबीराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबा शरद पवार आहेत. असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी आग्रही झाला आहे. याच पार्श्वभुमीवर ट्विट करत पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार रोहित पवारांना पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. सरपंच सुभाष आव्हाड यांनी सदस्यांसह राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. तसेच युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
दि. १० जून २०२०. राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन पुण्यात साजारा होत होता. ह्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ह्याचं कार्यक्रमात फुले पगडीचा स्वीकार करायच्या सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला शरद पवार, भुजबळांनी पुणेरी पगडी घातली आणि नंतर फुले पगडीचं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. मग छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनी घातली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसींचा आहे, असा प्रयत्न शरद पवारांनी
तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आश्वासन दिले आहे. आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिकनंतर आता सोलापुरात होणारे काही रणजी सामने डिसेंबरमध्ये सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमवर होणार आहेत.
एखाद्या मुद्द्यावरून धादांत खोटे करून समाजाची दिशाभूल करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आपले आजोबा आणि राज्यसभा सदस्य शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवले असून भारतीय लष्कराच्या अग्नीपथ योजनेबद्दल एक आठवड्यात दुसऱ्यांदा खोटे दावे केले आहेत.
विश्वचषक २०२३ अंतर्गत पुण्यात सामने खेळविण्यात येत आहेत. परंतु, पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांचे तिकीट लोकांना मिळत नसल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, पुणे येथील गहूंजे स्टेडियमवर बऱ्याच कालावधीनंतर विश्वचषकाचे सामने खेळविण्यात येत आहेत.