वैशाख शुक्ल द्वितीया अर्थात मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजस्तंभ विधिवत स्थापित करण्यात आला.
Read More
Publication of 3 volumes of Dr. Babasaheb Ambedkar Janata newspaper मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड७,८,९ सह इंग्रजी खंड 4चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड २ च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.
(Karnataka) कर्नाटकमधील शिवमोगा येथील सीईटी परीक्षा केंद्रावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांना जानवे आणि रुद्राक्ष काढण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये बुरख्या घालण्यास अडचण नसणाऱ्या सरकारला पवित्र धाग्याची अडचण का असावी, असा सवाल भाजप नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला केला आहे.
( Bhoomi Pujan Palghar District Office of Bharatiya Janata Party ) पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सावरा, आमदार श्री हरिश्चंद्र भोये , भाजपा जेष्ठ कार्यकर्ते माननीय श्री बाबजी काठोले सर यांच्या शुभहस्ते पार पडला.
Lord Shree Ram रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदू
MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे
sexually abused उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील भीमपूरा पोलीस ठाणे क्षेत्रात इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप सपा नेत्यावर आहे. सपा नेत्याचे नाव हे जनार्दन यादव असून ही घटना रविवारी रात्री घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधित आरोपी सपा नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित युवती ही गाजीपुरातील करीमुद्दीनपुरमध्ये वास्तव्यास होती. बासमती सरजू उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या दहावी बोर्ड परिक्षेचे केंद्र हे खरऊपुर होते.
Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई केली
(Pradeep Majhi's Inter-caste Marriage Controversy) ओडिशातील नवरंगपूरचे माजी खासदार आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते प्रदीप माझी (Pradeep Majhi) यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्या भातरा समाजाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला १२ वर्षांसाठी बहिष्कृत केले आहे. प्रदीप माझी यांनी बुधवार दि. १२ मार्च रोजी गोव्यामध्ये केंद्रपाडा जिल्ह्यातील सुश्री संगीता साहू या ब्राह्मण समाजातील महिलेशी लग्न केले. यानंतर अखिल भारतीय आदिवासी भात्र समाजाच्या केंद्रीय समितीने धामनागुडा येथे बैठक घेऊन प्रदीप आणि त्याच्या क
भारतीय जनता पार्टी, अध्यात्मिक समन्वय आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने पवित्र व मंगलमय वातावरण आणि मंत्रोच्चारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडले. या अनुष्ठानात उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातुन आणलेल्या ज्योतीतून होमातील अग्नि प्रज्वलीत करण्यात आला. १५१ दांपत्यांनी या अनुष्ठानात सहभाग दर्शविला. त्यानंतर महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. आचार्य आशिषकुमार जानी यांनी पौराहित्य केलेल्या या कार्यक्रमाला आ.संजय केळकर यांच्यासह अने
२०२४च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या कामगिरीतून धडे घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी चमकदार ठरली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही लालू आणि काँग्रेसवर भाजप कुरघोडी करून विजयी होईल, हे निश्चित.
'साहेब मला माफ करा' असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
विलेपार्ल्यात निर्णय घेणारे राऊत आणि अनिल परब कोण? असा सवाल जितेंद्र जनावळे यांनी केला आहे. उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ज्या निष्पक्षपणे चंद्रचूडांनी रामजन्मभूमी खटल्यात न्याय्य भूमिका घेतली, त्याच परखडपणे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. आस्तिक-नास्तिक या वादात त्यांनी घेतलेल्या पवित्र्याचे कौतुक करायला हवे.
आज दि. ११ फेब्रुवारी... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ५७वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने दीनदयाळजींनी मांडलेल्या ‘एकात्म मानवतावाद’ या चिरंतन तत्त्वज्ञानाचे हे चिंतन...
(Delhi Election Results) दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. त्यांनी यावेळी जंगपुरा मतदारसंघातून ते निवडणूकीच्या रिंगणात होते.
‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’चा हा अहवाल कुणी नाकारण्याची शक्यता फार कमीच. 20व्या आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या ‘जनरेशन झेड’चा जन्मापासूनच प्रगत तंत्रज्ञानाशी संबंध आला. त्यांचे लेखन कौशल्य प्रगल्भ व्हायच्या आतच त्यांचा टंकलेखनाशी संबंध आला. अगदी कमी वयातच त्यांच्या हातातील लेखणीची जागा संगणक आणि मोबाईलच्या कीबोर्डने घेतली. बदलत्या काळात फक्त ‘जेन झी’ नाही, तर मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपशी संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा लिखाणाशी संबंध हळूहळू कमी होत आहे, हे मान्य करणे अयोग्य ठरणार नाही.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी शनिवार, २५ जानेवारी रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मेट्रो सिनेपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून तो आझाद मैदानापर्यंत असेल.
प्रजासत्ताक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रगीतातील ‘जन-गण-मन’ या केवळ पहिल्या तीन शब्दांवर थोडा प्रकाश टाकून ‘विश्वगुरू भारत’ या स्वप्नपर मनोगत मांडत आहे. जेव्हा आपण ‘राष्ट्र’ म्हणतो, तेव्हा तो केवळ एक भौगोलिक प्रदेश नव्हे. केवळ नद्या, डोंगर नव्हे, तर व्यक्ती-व्यक्तींचे राष्ट्र बनते. ‘जन’ हा शब्द संस्कृत ‘जन्’ धातूपासून बनतो. ‘जन्-जनयति इति जन’ अर्थात जो जन्माला येतो तो जन! आपली भाषाच अशी व्यापक आहे. त्यामुळेच असे संस्कार असल्यास व्यापक राष्ट्रभावना मनात येण्यास कष्ट पडत नाहीत. जे जन्मास येते ते जन म्हणजेच
Republic Day संविधानाच्या पहिल्या पानावरील पहिले वाक्य, ‘आम्ही भारताचे लोक.’ ही भारताचे लोक असल्याची भावना भारतीयांमध्ये खर्या अर्थाने जागृत होताना आज दिसते. वरवर सामान्य वाटणार्या घटना, पण त्या घटनातून भारतीय माणूस संविधान जगतो. हक्कासोबतच संविधानाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वेही कसोशीने पाळतो, हे दिसून येते. त्या अनेक घटनांपैकी काही लक्षवेधी घटनांचा मागोवा या लेखात घेतला आहे. आज, दि. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिमान वाटतो की, ‘मेरा देश बदल रहा हैं।’
Ram Janaki temple उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातून (Ram Janaki temple) ३० कोटी रुपयांच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली असल्याचे वृत्त आहे. चोरी झालेली मूर्ती अष्टधातूची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी आता यश आले आहे. समाजवादी पक्षाच्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
(Dharashiv) पैठण, जालन्यानंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनसमुदाय रस्त्यावर उतरणार आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे.
Pradhan Mantri Jan Arogya Yojana कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधील एका रुग्णाला रुग्णालयामध्ये सरकारी योजनेचा (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) लाभ दिला नसल्याची लाजीरवानी घटना घडली आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा रुग्णाला लाभ देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेने स्वत: कर्नाटक सरकारकडे याप्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
(NDA) जनता दल युनायटेड (जदयु) राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच (रालोआ) आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री राजीव रंजन उपाख्य ललन सिंह यांनी गुरूवारी दिले आहे.
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात ( Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ जानेवारी रोजीपासून सुरू होईल आणि सोमवार, दि. १३ जानेवारी रोजीपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे स्वरुप प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासारखेच राहील, ज्यामध्ये विशेष अतिथी, देशभरातील महान संत, मान्यवर व्यक्ती आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
लीपिन्स या देशाच्या मेरी जेन फिएस्टा वेलोसोला इंडोनेशियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तब्बल 15 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर तिची मृत्युदंडाची शिक्षा रद्द झाली. इंडोनेशिया आणि फिलीपिन्स या दोन देशांतर्गत ही घटना मानवी तस्करीचे बळी गेलेल्या जगभरातल्या दुर्बलांचे प्रतिनिधित्व करते.
नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या ( Shri Ram Mandir ) पाच मंडपांपैकी रंगमंडपाच्या कळसाची उभारणी पूर्णत्वास गेली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव गेल्या तीन-चार दिवसांपासून भलतेच चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा घाट घातला होता. आता कोणालाही प्रश्न पडेल की, हे सगळे पराभूत उमेदवाराचेच कारस्थान असावे. पण, नाही, हा सगळा डाव रचला तो चक्क विजयी उमेदवारानेच. माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ. उत्तमराव जानकर. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा १३ हजार, १४७ मतांनी पराभवदेखील केला. म्हणजे हा फरक थोडाथोडका, शे-दोनशेचाही नसून, दहा हजारांहून
(Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
Illegal Construction मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील तासगंज येथील कोटा येथे असलेल्या रामजानकी मंदिराच्या सुमारे ९ विविध जागांवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. आता हे अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत या जमिनीवर १०० कोटी एवढा खर्चांएवढी बांदलेली भिंत आणि इतर बेकायदा बांधकामे शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलडोजझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
(Achalpur Assembly Constituency Result) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ हा बच्चू कडू यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र बच्चू कडूंना स्वतःचाच गड राखण्यात अपयश आले आहे. अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला असून भाजपचे प्रविण तायडे हे विजयी झाले आहेत.
(Shirdi Assembly Constituency Result 2024)राज्यातील लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर समोर आला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखेपाटील यांचा विजय झाला असून प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे यांचा ७० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.
जगप्रसिद्ध वानरवैज्ञानिक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूत डॉ. जेन गुडाल या मुंबई दौर्यावर आल्या होत्या. पर्यावरण, वन्यजीव आणि मानवता यांबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांनी त्यांच्यासोबत साधलेला हा संवाद...
पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे ? Dr. Jane Goodall
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या रिओ दी जनेरिओ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी२०’ परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या दौर्यावर गेले असता, तत्पूर्वी त्यांनी आफ्रिका खंडातील नायजेरिया आणि गयानालाही भेट दिली. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या दौर्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
मानव, प्राणी आणि पर्यावरण हे तिन्ही मुख्य घटक एकमेकांवर अवलंबून असून एकमेकांशिवाय या तिन्ही घटकांच्या संवर्धनाचे काम होणार नाही, असे मतं ज्येष्ठ वानरवैज्ञानिक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीदूत डाॅ. जेन गुडाल यांनी मांडले (Dr. jane goodall). त्या मंगळवार दि. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोलत होत्या (Dr. jane goodall). ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत गुडाल मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. (Dr. jane goodall)
सहृदय असणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. माणसे वयाने मोठी होत गेल्यावर ती कालबाह्य होतात. परंतु, डॉ. जेन गुडाल याला अपवाद आहेत. बदलत्या काळाशी सुसंगत होऊन त्याप्रमाणे वैचारिक ठेवण मांडणार्या तत्त्वज्ञ म्हणून जेन ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनाचा आणि मुंबई भेटीचा घेतलेला हा आढावा...(Dr. Jane goodall Mumbai Visit)
डोंबिवली : “डोंबिवलीकरांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. मला निवडून देणार्या जनतेच्या उपकारांचे ओझे माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे डोंबिवलीचा विकास करणे हीच माझी जबाबदारी आहे,” अशी भूमिका रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी व्यक्त केली.
"वातावरणीय बदलामुळे जगासमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन हे इंटलिजन्स वापरून नाही, तर इंटलॅक्चुअल दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे", असे मत जेष्ठ वन्यजीव संवर्धक, संशोधक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीदूत डाॅ. जेन गुडाल यांनी मांडले. त्या शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘ओशन लिस्ट्रसी डायलाॅग’ या कार्यक्रमात बोलत होत्या. ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत गुडाला या पाच दिवसीय मुंबई दौर्यावर आल्या आहेत.
‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI) ‘पद्मविभूषण’ नानाजी देशमुख यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली दि. ८ मार्च १९६८ रोजी स्थापन करण्यात आली. ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI) अंतर्गत ‘जनशिक्षण संस्थान’ या उपक्रमाद्वारे बीड येथे समाजाभिमुख काम सुरू आहे. भारतीय समाजाचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास आणि पुनर्बांधणी करण्यासाठी विकासाचे मॉडेल विकसित केले गेले आहेत. बीड येथील या उपक्रमाचा आणि ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI)च्या कामाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
( ECI on BVA Symbol Whistle )राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे.
झारखंडच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर आता जागावाटपावरुन इंडी आघाडी मध्ये नाराजीनाट्य बघायला मिळते आहे. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या जागावाटपावरुन, मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD)ने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा ८१ पैकी ७० विधानसभा जागांवर उमेदवार उभे करतील अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे.
पवार इंदापूरच्या जनतेला भावनिक साद घालत होते. पण, दुसरा गणंग मराठी माणसाच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल जे बोलला, ते तर या इसमाचा पायातले खेटर काढून समाचार घेण्यासारखे होते.
शरद पवारांचा तुतारी पक्ष हा मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का? असा सवाल भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना गणपती बाप्पाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून नितेश राणेंनी शरद पवार गटावर निशाणा साधला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अगदीच अंतिम टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. परंतु, त्याआधी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातून या सीझनमध्ये बाहेर गेलेल्या सदस्यांनी घरात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. आजच्या भागात सर्व सदस्यांचे रियुनियन दिसणार असून यात निक्की आणि अरबाज यांची भेट विशेष लक्षवेधी असणार आहे.
ज्युनियर एनटीआरची प्रमुख भूमिका असणारा 'देवरा १' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच, या चित्रपटात मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्याी मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनापुर्वीच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलं होतं. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या गाण्यातील त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण तुम्हाला माहित आहे काचित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने पावले उचलून व्यापार सुधारणा कृती योजना (बीआरएपी) २०२४ देशभरात एक अखंड व्यापार नियामक फ्रेमवर्क स्थापन करणार आहे, ज्यामुळे व्यवसाय करणे सुलभ होईल.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या अंतिम टप्प्यात पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला. आता घरात केवळ ७ सदस्य राहिले असून घरात आपलं स्थान अधिक पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार असून घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
(Pradhan Mantri Janjatiya Unnat Gram Abhiyan) देशातील आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता “प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान” ही योजना राबविण्यात येत आहे.