राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल गोटे यांचा दावा
Read More
धुळे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकित 31 जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर शेंदुर्णी नगरपंचायतीत भाजपाची 9 जागांसह विजयी घौडदौड सुरु आहे.
राज्याचे लक्ष्य वेधलेल्या धुळे महापालिकेत भाजपची बहुमताकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत भाजपने ३८ जागांवर आघाडी घेतली आहे.
धुळे महापालिकेत पक्षाची ताकद वाढावी यासाठी पक्षात प्रवेश करणाऱ्यावर विविध आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटे यांनी अधिवेषण सुरू असताना सभागृहात प्रश्न विचारला. यावेळी गुंड प्रवृत्तीच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याचेही गोटे म्हणाले. भाजपमध्ये निवडणूकांच्या दरम्यान प्रवेश करणाऱ्यांवर ही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
धुळे जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. केंद्र सरकारकडून आवश्यक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल तसेच या परिस्थितीचा जिल्हास्तरावर प्रशासकीय यंत्रणेने आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहेत.
विजयादशमीनिमित्त रा.स्व.संघातर्फे येथील वाखारनगरातील अरिहंत मंगल कार्यालयासमोरील भव्य प्रांगणातून सकाळी ७ ला सघोष पथसंचलनाला सुरुवात झाली.जिल्हा संघचालक संजय चौधरी, शहर संघचालक डॉ.पंकज देवरे, प्रसिद्ध सराफ व्यवसायी अजय नाशिककर यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले.वाखारकरनगर, अरिहंत मंगल कार्यालय परिसर, गजानन कॉलनी अशा सुमारे ४-५ कि.मी. मार्गावर हे सघोष पथसंचलन काढण्यात आले. मूळ स्थानी समारोप झाला.
तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या सर्व योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या एलपीजी गॅस सिलिंडर जोडणीचे उद्दिष्ट डिसेंबर पर्यंत साध्य करावे, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे दिले.