उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या सात पिल्लांची (leopard cub) त्यांच्या आईसोबत पुनर्भेट करुन देण्यामध्ये जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’ टीमला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही सात पिल्ले (leopard cub) केवळ सात दिवसांमध्ये आईच्या कुशीत पुन्हा विसावली आहेत. जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या टीमने गेल्या वर्षभरात आईपासून विभक्त झालेल्या २३ पिल्लांची (leopard cub) पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे काम केले आहे.
Read More
बिबट्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमध्ये मंगळवारी एका नर बिबट्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. धोलवड गावातील एका उसाच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला होता.