सामाजिक आंतरीक आणि पारिवारिक सर्व प्रकारच्या समरसतांचे उदाहरण कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही. पण अयोध्येचे राजा रामचंद्र यांनी आपल्या जीवनातील त्याग, विनम्रता, नियम यांचा आदर्श घालून दिला आहे आणि तेच आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. ते केवळ भारतीय समाजासाठीच नाही, तर पूर्ण जगासाठी आदर्श आहेत. असे म्हटले जाते की जीवन असावे तर प्रभू श्रीरामचंद्र यांच्यासारखे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासीच्या रूपात वनात गेले, तेव्हा त्यांच्यातील समजूतदारपणा आणि समरसता वाखाणण्यासारखी होती. वनवासात असताना सुद्धा ते, त्यांना पावला पावलावर जे लोक भेटत असत त्यांना आपलंसं करून घेत असत. इतकच नाही तर तेथील लोकांना सांगतही असत की, सगळ्यांनी एकत्र रहा, जाती जातींमध्ये भेदभाव करू नका, कोणाशीही भांडण तंटा करू नका. एकत्र रहाल तरच तुम्हाला कोणी त्रास देणार नाही.
प्रत्येक माणूस बाहेरून जरी वेगळा असेल तरी सगळ्यांचा आत्मा एक आहे. त्यामुळे जाती जातीत काहीही भेद नाही. हल्ली बाहेरच्या देशातून लोक येतात आणि आपल्या लोकांना भडकवतात आणि आपल्या समाजाला आणि राष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या हुशारीने लोकांमध्ये जाती आणि धर्म यांच्यामध्ये फरक दाखवून वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी श्रीरामचंद्रानी समरसतेसाठी काय केले ते जाणण्याची आपल्याला आवश्यकता पडते. काही लोक प्रभू रामचंद्रांचं जे उज्वल आणि आदर्श चरित्र आहे त्याची निंदा करतात. अशा लोकांविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत.
शबरीची ऊष्टी बोरे खाऊन प्रभू रामचंद्र यांनी दाखवून दिले की सगळी माणसे एक आहेत. रामचंद्रांच्या जीवनातील १४ वर्षे वनवासतच गेली. जंगलातील आदिवासी, भिल्ल आणि वानरांबरोबर एकत्र होऊन रावणाचा त्याच्या कुळासहित नाश केला. साधू संत तपस्वी या सगळ्यांना रामचंद्रांनी आपले अंग मानले. त्यांच्यावर प्रेम केले त्या लोकांना आपले भाऊ मित्र मानले. वनातील सगळ्या लोकांवर प्रेम केले त्यामुळे हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवंत यांच्यासारख्या मनात राहणाऱ्यांबरोबर ते अगदी समरसून गेले. प्रत्येक पावला पावलावर श्रीरामचंद्राने एकता आणि समरसतेचा संदेश दिला. शबरीची उष्टी बोरे खाणे हेच सगळ्यात चांगले उदाहरण आहे. भगवान रामचंद्र यांनी आपल्या समरसतेतून राक्षस वृत्ती नष्ट करून समाजाला निर्भय बनवले आणि त्यांना जीवनाचा चांगला मार्ग दाखवून दिला. त्यामुळेच समाजातील भिन्न भिन्न प्रकारचे लोक एकत्र येऊ लागले. भारताची समृद्धी आणि संस्कृती टिकवण्यासाठी श्रीरामचंद्र कारणीभूत झाले आहेत. त्यांनी आदिवासी, कातकरी, भिल्ल अशा अनेक जातीतल्या लोकांना आपल्याच परिवारातले समजून त्यांचे मन जिंकून घेतले. गिधडांचा राजा जटायू याचा अंतिम संस्कार प्रभूनी स्वतःच्या हाताने केला. तसेच अपराधांच्या ओझ्याखाली दबलेल्या कैकयी मातेला कौशल्या मातेपेक्षा जास्त प्रेम आणि मान देऊन त्यांना अपराधाच्या ओझ्यातून मुक्त केले.
भावा भावांमध्ये प्रेम निर्माण केले. त्यांना आनंद मिळवून दिला. ऋषींमध्ये जी विरुद्ध मते होती ती मते बदलून त्यांच्या मतांमध्ये एकता निर्माण केली, त्यांच्यात चेतना निर्माण केली, जागृती निर्माण केली. संपूर्ण भारत सगळ्या महाशक्ती ना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धात सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या मार्गाचे अनुकरण करू लागले आहेत. जेव्हा केव्हा संकटात येतील तेव्हा प्रभु रामचंद्रांची आठवण काढू लागले आहेत. शक्तीने सगळं साध्य करता येत असं नाही, तर संयम पाळल्यानेही सगळं साध्य होतं. प्रभू रामचंद्र खूप शक्तिशाली होते. तरीही पाण्यातून मार्ग काढण्यासाठी ते समुद्राची प्रार्थना करायचे तेव्हा समुद्र त्यांच्या विनंतीला धुडकावून लावायचा. तेव्हा फक्त रामचंद्र आपल्या शक्तीचा उपयोग करायचे.
प्रभू रामचंद्रांनी अशी शिकवण दिली आहे की समाजातली माणसं जर एकत्र चालली तर कितीही मोठे संकट आले तरी आपण ते निभावू शकतो. त्यामुळे आपण दुर्बल होत नाही आणि कोणीही आपल्याला वाकवू शकत नाही आणि कोण जर आपल्याला त्रास देत असेल तर त्याला कठोर शिक्षा करावी. बली चा नाश केल्यानंतर श्रीराम सुग्रीवाला किशकिंधाचे राज्य देतात. बलिपुत्र अंगदला त्याचा उत्तराधिकारी घोषित करतात. श्रीराम लंकेत त्यांचा विजय झाल्यावर लक्ष्मणाला सांगून बिभीषणाचा राज्याभिषेक करतात. तसेच बिभीषणाच्या घरातील सगळ्या बायकांचे सांत्वन करतात. प्रभू रामचंद्र अपराध्याला शिक्षा करतात. पण जो पराजित झाला असेल त्याचे धन संपत्ती राज्य याचा कधीही मोह ठेवत नाहीत. बिभीषण लाजेने त्याचा भाऊ रावण याच्या शवाचा अंतिम संस्कार करत नाही, तेव्हा श्रीराम सांगतात "तू त्याचा अंतिम संस्कार कर". जीवन असेपर्यंतच वैर ठेवावे त्या माणसाच्या मृत्यूनंतर वैराचा अंत होतो. रामचंद्रांचा जन्म कोणाची ही हत्या करण्यासाठी झालेला नव्हता रावणा सारख्या दृष्ट राक्षसाला समाप्त करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. हे श्रीरामांचे आदर्श सगळ्या जगाला सुखमय करतात सगळ्यांना सन्मानपूर्वक जीवन देतात.
सौ. स्मिता शाम तोरसकर,
ठाणे
मोबाईल नंबर - ९९३०५८८९१५