"शांतता, पुणे वाचत आहेत"

पुणेकरांचा एक तास "वाचनासाठी” समर्पित

NewsBharati    09-Dec-2023 09:56:50 AM
Total Views |
 
 
वाचणं हे पेरणं असतं
तर लिहिणं हे उगवणं असतं ,
उगवण्याची चिंता करण्यापेक्षा
पेरणी सुरू करा,
एक दिवस तुमचं उगवलेलं
लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
 
आणि आजपर्यंत पुणेकरांनी संपूर्ण जगाला पेरणी करूनच जे काही देता येईल ते दिलेले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात १६ ते २४ डिसेंबर कालावधीत नऊ दिवसीय पुणे पुस्तक महोत्सव 2023 ची सुरुवात होत असताना त्याची उत्सुकता प्रत्येक पुणेकर व्यक्तीला लागली आहे.
 

Pune Book Festival 
 

पुस्तक महोत्सवाचे उद्दिष्ट काय ?

 
या साहित्यिक सोहळ्याची मांडणी करण्यासाठी ‘ पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत, "शांतता, पुणेकर वाचत आहेत" हा उपक्रम राबवला जाणार आहे. "शांतता, पुणेकर वाचत आहेत" हा अनोखा उपक्रम पुणेकरांसाठी त्यांच्या व्यस्त दिवसातील एक तास 'वाचनासाठी’ समर्पित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
 
सर्व पुणेकरांसाठी एक तासाकरिता संपूर्ण शहर शांत होईल आणि पुणेकर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी / कथा वाचतील. यामुळे वाचनलहरींची एक लाट बनेल ज्यामुळे एकत्रितपणे संपूर्ण शहरात शब्दतीर्थ प्रत्येकाच्या मनात वाहताना पाहायला मिळेल.
 

कधी आणि कुठे आहे हा उपक्रम?

 
गुरुवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत पुणेकरांनी “ आपण जिथे असाल तिथे सहभागी होवून ” या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे पुणेकरांना जिथे मिळेल तिथे वाचन संस्कृती आत्मसात करण्याने प्रत्येकजण रोमांचित होऊन जाईल.
 

आपला सहभाग का महत्वाचा आहे?
 

पुण्यातील प्रत्येक व्यक्तीचे साहित्याप्रती असणारे प्रेम पाहता या उपक्रमाला पुण्यातील विविध 5,000 संस्थांकडून पाठिंबा मिळाला आहे ज्यामुळे वाचनाचा आनंद वाढण्यास नक्कीच मदत होईल.
 
घर असो वा कार्यालय असो किंवा सार्वजनिक ठिकाण. पुणेकरांना दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी पुस्तकांच्या परिवर्तनीय सामर्थ्यावर भर देऊन, वाचनासाठी एक तास समर्पित करण्याचे आवाहन करत आहोत.
 
"शांतता, पुणेकर वाचत आहेत" हा उपक्रम सर्व वयोगटांमध्ये शहरव्यापी वाचन संस्कृती जोपासण्याचा एक अलौकिक प्रयत्न आहे. हजारोजण सहभागी होणार याची खात्री असून 'पुणे पुस्तक महोत्सव २०२३' साठी १६ ते २४ डिसेंबरपर्यंत पुस्तक वाचन आणि कथा वाचनात मंत्रमुग्ध होवून जाण्यासाठी पुणे शहर सज्ज आहे.
 
तर, पुणेकरांनो, तुमच्या पुस्तकांच्या कपाटातील तुम्हाला वाचायला आवडणारे पुस्तक उचलण्याची आणि पुणे पुस्तक महोत्सव 2023 च्या प्रतीक्षेत असलेल्या साहित्यिक उत्सवाच्या उत्साहात सहभागी होण्यासठी तुम्ही सज्ज व्हा.
 
"शांतता, पुणेकर वाचत आहेत" या उपक्रमाबरोबर पुणे पुस्तक महोत्सव २०२३ च्या प्रतीक्षेत असलेल्या साहित्यिक मेजवानीसाठी उत्साह निर्माण करून शब्दरंगात न्हाऊन निघण्यासाठी आपण पुणेकर निश्चितच तयार आहात आणि त्यासाठीच आपला सहभाग महत्वाचा आहे.