लहानपणीच्या लोरीपासून ते #Mybookmystory पर्यंत सर्वकाही.....पुणे पुस्तक महोत्सव.

येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालवधीत फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आयोजकांनी #Mybookmystory या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाद्वारे व्यक्तींच्या जीवनावर साहित्याचा होणारा सखोल परिणाम हा केवळ आणि केवळ सकारात्मक असतो.

NewsBharati    09-Dec-2023 10:16:06 AM
Total Views | 53
 
 
 एखादे पुस्तक आयुष्याला कलाटणी देवू शकतं.
पुस्तकाने एक पान , त्यातील एक वाक्य आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं
एवढी ताकद वाचनात आहे...म्हणून रोज एक तरी पान वाचा!
 
“दिसामाजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे” श्री समर्थ रामदास यांच्या ओळीप्रमाणे भारतीय संस्कृतीने वाचन संस्कृतीला फार मोठे पाठबळ दिले आहे. याच गोष्टीचा सातत्याने विचार करत पुणेकर नेहमीच वाचन या विषयाला बळ देत आलेले आहेत. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यातील प्रत्येक उपक्रमात पुणेकर नेहमीच आघाडीवर असतात.
महोत्सव....कधी , कुठे ?
 
My Book My Story 
 
 
येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालवधीत फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आयोजकांनी #Mybookmystory या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाद्वारे व्यक्तींच्या जीवनावर साहित्याचा होणारा सखोल परिणाम हा केवळ आणि केवळ सकारात्मक असतो.
 

लोरी ते स्टोरी

#Mybookmystory या उपक्रमात सहभागी होवून आपल्याला आपल्या आईने ऐकवलेल्या “लोरी” पासून ते आपल्या आवडत्या “स्टोरी” पर्यंत आणि आवडत्या पुस्तकांबद्दल, आपली आवडती गोष्ट इतरांना माहिती करून देण्यासाठी आणि आपल्या मनावर - जीवनावर चिरस्थायी ठसा उमटवलेल्या कथांचा आपण शोध घेता येणार आहे.
 
या अभिनव उपक्रमाद्वारे वाचकांना आपल्या कथाकथनाद्वारे इतरांशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या उपक्रमामुळे विचारांची देवाण घेवाण , आपल्या आयुष्याला मिळालेले चांगले वळण हे कोणत्या पुस्तकामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे लागले हे आपल्या आजूबाजूच्या , आपल्या सहवासातील लोकांना समजण्यास मदत होईल आणि त्यांना आपल्या माध्यमातून प्रेरणा मिळेल. याद्वारे सामुहिक भावना वाढण्यास आणि एक वेगळ्या प्रकारे साहित्यिक अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.
 
पुणे पुस्तक महोत्सवात #Mybookmystory हा उपक्रम एक अत्यंत वेगळा आणि वैयक्तिक पैलू समाजासमोर आणण्याची संधी देत आहे.
 

#Mybookmystory वर आपण काय करायचे आहे?

 
या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना त्यांचे किस्से, आठवणी आणि पुस्तकाशी संबंधित आपले विचार प्रतिबिंब इतरांसमोर मांडण्याचे आवाहन करत आहोत. वाचक म्हणून आपला प्रवास कसा घडला आणि इतरही अशा प्रकारचा प्रवास करू शकतात याची शाश्वती देण्यासाठी #Mybookmystory उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
 
 
 
#Mybookmystory उपक्रमात सहभागी होण्यासाठी, #Mybookmystory हा हॅशटॅग वापरून आपल्या कथा समाज माध्यमांवर प्रसारित करू शकता. या उपक्रमातील निवडक घटकांची महोत्सवादरम्यान निश्चितच दखल घेतली जावू शकते. जे साहित्यिक अनुभवांचा संग्रह इतरांपर्यंत पोहोचवतात ते जीवनाच्या सर्व स्तरांतील पुस्तक आणि वाचन प्रेमींना प्रभावित करतात.
 
पुणे पुस्तक महोत्सव 2023 च्या माध्यमातून #Mybookmystory उपक्रम सोशल मीडियावर नक्कीच दखल घेण्या इतपत मोठा ठरेल. पुस्तक रसिकांना त्यांचे विविध किस्से सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाचन साखळी अमूर्त करण्यासाठी प्रेरणा देईल याची खात्री वाटते.
 

पुणे पुस्तक महोत्सवाविषयी

 
नॅशनल बुक ट्रस्ट (NBT), भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागाच्या माध्यमातून १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन कॉलेज मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या महोत्सवात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि इतर अनेक भाषांतील विविध प्रकाशकांच्या पुस्तकांची पर्वणी आपल्याला मिळणार आहे. यात साहित्यिक सत्रे, लहान मुले आणि तरुणांसाठी वहन कोपरा , टॅलेंट हंट, सांस्कृतिक कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
 
पुणे बुक फेस्टिव्हल आणि #Mybookmystory मोहिमेबद्दल अधिक माहितीसाठी, अधिकृत सोशल मीडिया चॅनेलला भेट द्या किंवा फॉलो करा. इतिहासाचा भाग बनण्याची संधी गमावू नका कारण पुणेकर नेहमीच चांगल्या आणि नव्या उपक्रमाला भरघोस पाठींबा देत असतात. पुण्यातल्या पहिल्या-वहिल्या पुस्तक महोत्सवाचे आपण सर्वजण स्वागत करूयात!
.